विशेष

श्रमिक एकता न्युज वेब पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातमीतील,लेखातील मते ही त्यां संबंधित वार्ताहर/प्रतिनिधी व लेखकांची असे श्रमिक एकता न्युज संपादक, प्रकाशक आणि मालक यांचा या मताशी काहीही संबंध श्रमिक एकता न्युज वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलवर दिलेल्या जाहिराती ह्या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख, जाहिरातीतील मजकूराची वैधता श्रमिक एकता न्युज  तपासून पाहत नाही. बातमी,लेख जाहिराती यामधून होणाऱ्या कोणत्याही वादला श्रमिक एकता न्युज  वेब पोर्टल जबाबदार राहणार नाही. वाद निर्माण झाल्यास न्याय क्षेत्र तालुका मुखेड जिल्हा नांदेड राहिलं.

मुख्यसंपादक :- आसद बल्खी

मो.नं :- 9923907779

  • मुखेडमध्ये शौर्य दिनानिमित्त मोटारसायकल रॅली काढून अभिवादन

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड : दि १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त मुखेड शहरात मोटारसायकल रॅली काढून रॅलीत भीमाकोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. या रॅलीचे आयोजन विजय लोहबंदे व आशिष भारदेयांनी केले. ही मोटारसायकल रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्मारकाजवळ विसर्जित करण्यात आले. या दिवशी १८१८ च्या भीमा कोरेगाव युद्धातील शूरवीरांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या समारोपवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील स्तंभांना वंदन करण्यात आले. या रॅली दरम्यान काही अनुचितघटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. यावेळी विजय लोहबंदे,आशिष भारदे, प्रवीण मोरे, क्षितिज हसनाळकर, विश्वा गायकवाड, नितीन सोनकांबळे, आसद बल्खी, जयभीम सोनकांबळे, प्रशांत भालेराव, किशोर लोहबंदे, सिद्धार्थ कांबळे, मोहन गायकवाड, आशुतोषकांबळे, रियाज शेख,एस के बबलु,कुलदीप कोतापल्ले यासह या रॅलीमध्ये स्थानिक नागरिक, तरुण वर्ग आणि सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्तसहभाग होता. शौर्य दिनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या उपक्रमामुळे ऐतिहासिकवारसा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात यश आले. 

    Read More »
  • सुफीसंत सय्यद साबीर अलीशाह खादरी यांच्या जयंती,उर्स व संदल निमित्य विविधकार्यक्रमाचे आयोजन

    मुखेड प्रतिनिधी:-  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हजरत सुफी संत सय्यद साबीर अलीशहा खादरी यांचे २३ वी उरुस व संदल दि. २९ डिसेंबर ते दि.३० डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये दि. २९ डिसेंबर २४ रोजी दुपारी २.००वाजता अकबरखान दाऊद खान खंडोबा गल्ली मुखेड येथुन संदल व मिरवणुक निघुन बाजार लाईन मेन रोडते बसस्थानक रोड पासुन लोखंडे चौक ते खैरका रोड येथुन निघुन रात्री ८.०० वाजता दर्गा येथे जावुनमिरवणुक समाप्त होईल व तसेच रात्री १०.०० वाजता मौलाना मोहमद अहेमद नक्षबंदी हैद्राबाद यांचेव्याख्यान होईल. तसेच दि.३० डिसेंबर २४ रोजी रात्री ८.०० वाजता लतीफ हैरा कव्वाल जलगाव यांची कव्वालीचा रात्रभरजंगी कार्यकम होईल व कार्यक्रमाचा समारोप होईल सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुनमुखेड–कंधारचे आमदार डॉ. तुषारजी राठोड व माजी नगरअध्यक्ष गंगाधर राठोड, नगर सेवक– पठाणनासेरखान , लक्ष्मण पाटील खैरकेकर पंचायत समिती सदस्य, व इतर मान्यवराची उपस्थिीती ही लाभणारआहे. तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमांची शोभा वाढवावी असेदर्गाचे सज्जादा हाफीज जमालोदीन खादरी व उर्स कमीटीचे अध्यक्ष– हाजी काझी सय्यद साबीर सर, उपाध्यक्ष–सय्यद सुभानी मोहीयोद्दीन, तसेच इतर सदस्य– पठाण अनवर खॉन महेबुबखान, शेख अमीर हाजीअहेमद कंधारी, शेख बाबा मियाँ लाटवाले, सय्यद शमशोदीन, पठाण रुस्तुम खॉ, शेख मौला, अहेमद खा, मुन्ना पेंटर, शेख अहेमदभाई बेलीकर, शेख हसन बेलीकर, ताजोद्दीन बेलीकर, शेख इब्राहीम बल्खी, शेखआमेर आदीनी विनंती केलेली आहे

    Read More »
  • मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी सय्यद नजीर यांची बिनविरोध निवड

    मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या मुखेड  तालुका अध्यक्ष पदी सय्यद नजीर यांची बिनविरोध निवड झाली आहे.  तालूका ग्रामसेवक संघटनेची दि.२६ डिसेंबर २०१४ रोजी दुपारी 2 वाजता  पंचायत समिती मुखेड येथे DNA/ 136 ग्रामसेवक , ग्रामपंचायत आधिकारी संघटना महाराष्ट्र शाखा मुखेड यांची बैठक पंचायत समिती सभागृह मुखेड येथे जिल्हा उपाध्यक्ष पी . जी . नागेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली यावेळी ग्रामसेव ग्रामपंचायत आधीकरी यांच्या उपस्तिथीत निवडीची प्रक्रीया करण्यात आली  ग्रामसेवक , ग्रामपंचायत आधिकारी संघटना ही सदैव न्याय हक्कासाठी राज्यामध्ये कामकरत असते. ग्रामसेवकांना न्याय मिळवून देणे त्यांच्या अडीअडचणी दूर करणे या सर्व बाबीवर ही संघटनासतत प्रयत्नशील असते. मुखेड येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या मुखेड ग्रामसेवकसंघटनेच्या अध्यक्षपदी सय्यद  नजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर इच्छूक बेंद्रीकर राजेश , कल्याणकर वसंतराव व इतर ग्रामसेवकांनी समर्थन दर्शवीले तसेच सूचकएम . डी . शिंदे , सतिष गायकवाड , एम . एम अंबुरे यांनी सुचविल्या नुसार सदर नावावर चर्चा झाली वमणियार एम  . एम . तसेच रेनगुंटवार बालाजी व सर्व महिला ग्रामसेवक यांच्या अनुमोदनाने सर्वानुमते सय्यदनजीर यांची ग्रामसेवक ग्रामपंचायत आधिकारी संघटना तालुका शाखा मुखेडच्या तालुका अध्यक्षपदी निवडकरण्यात आली व त्यांचा संघटनेकडून भव्य सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या व तसेच महिलाग्रामसेविका सो भवर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ग्रामसेवक नजीर सय्यद यांच्या…

    Read More »
  • “अल्पसंख्याक हक्क दिवस” बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन 

    नांदेड दि. 16 डिसेंबर :- अल्पसंख्याक हक्क दिवसा निमित्ताने अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने बुधवार 18 डिसेंबर…

    Read More »
  • नैसर्गिक साधन संपत्ती चे जतन करणे काळाची गरज..प्रा संजीव डोईबळे

    मुखेड प्रतिनिधी:- दि 14.डिसेंबर.24 रोजी शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय मुखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत 14 डिसेंबर हा…

    Read More »
  • ऊसतोड कामगारांची मुलं शाळांऐवजी उसाच्या फडात; केंद्रप्रमुखांनी केले शाळेत दाखल

    मुखेड प्रतिनिधी:- कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल पण उसतोड कामगारांच्या मुलांसाठी हे दरवर्षीचं अवस्था आहे हि अवस्था केवळ या टोळीतील विद्यार्थ्यांचीच नाही. तर महाराष्ट्रात जवळपास पंधरा लाख ऊस तोडकामगार आहेत. ऊस तोडीसाठी हि कुटुंबे साखर पट्यात दरवर्षी स्थलांतरित होत असतात. स्थलांतरित झाल्यांनंतर त्यांच्या मुळगावी फक्त वयस्कर लोक उरतात. आई वडील काम करत असताना लहानअसलेल्या मुलांची जबाबदारी पेलण्यासाठी तसेच शेळी व इतर पाळीव जनावरांची देखभाल करण्यासाठीया मुलाना आईवडील सोबत आणत्तात. यामुळे हि मुले किमान पाच ते सहा महिने शाळे पासून बाहेर…

    Read More »
  • उंद्री प.दे. येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त रविवारी भव्य पालखी सोहळा !

    आज जागरण तर सोमवारी महाप्रसाद व कुस्त्यांची भव्य दंगल मुखेडतालुक्यातील उंद्री प.दे. येथेश्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आज पासून विविध…

    Read More »
  • मुखेड विधानसभा मतदार संघात आज ३६६ केंद्रावर २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती

    १० पोलीस अधिकारी, १०० सीआरपी जवान, ३४७ पोलीस कर्मचारी व ३४५ होमगार्ड कर्मचारी तैनात ५१ बस व ४२ खासगी वाहनांची व्यवस्था  मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड : मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूकीसाठी२० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून मतदार संघात ३६६ मतदान केंद्र असून या मतदान केंद्रापर्यंतकर्मचाऱ्यांना ने–आण करण्यासाठी ५१ बस व ४२ खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सर्वमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून मतदानाच्या राष्ट्रीय उत्साहातसहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी व लोकसभा प्रशासनाने मतदारांच्या पूर्ण सुविधेसह ३६६ मतदान केंद्रे सुरूकेले आहेत. यासाठी लागणारे २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती करण्यांत आली. मतदानकेंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कामी १०पोलीस अधिकारी, १०० सीआरपी जवान, ३४७ पोलीस कर्मचारी व ३४५ होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यातआले आहे. मतदार संघात जिल्हा परीषद हायस्कूल सावरगा येथे अंपग मतदान केंद्र, शहरातील शिवाजी नगर येथीलगुरुदेव विद्या मंदीर येथे सखी मतदान केंद्र, जांब (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत युवा मतदानकेंद्र तर नगर परिषद येथील हुतात्मा स्मारक येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदानकेंदावर अपंग मतदारांसाठी व्हिल चेअर व रॅमची व्यवस्था करण्यांत आलेली आहे व २८३ मतदान केंद्रावरजीपीआरएस व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सदरील निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णयअधिकारी राजेश जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातनिवडणुक विभागाचे नायब तहसीलदार जोहरे, नायब तहसीलदार विलास तेलंग, गट विकास अधिकारी सी. एल. रामोड, गट विकास अधिकारी, पाटील, गट विकास अधिकारी, महेश पाटील, लिपीक प्रशांत लिंबेकर, महाडीवाले, मंडळ अधिकारी जी.एस. गरुडकर, एस.डी. कुसुमकर, देशमुख तलाठी, एन. एस. होनराव, राजुसुवर्णकार, सतिष बेदरकर, शेख गौस, चावरे, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान काम करीत आहेत. 

    Read More »
  • मुखेड-कंधार मतदारसंघातील २९३ दिव्यांग – वयोवृध्द मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क तर १ हजार ३३१ टपाली मतदान

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेडः मुखेड–कंधारविधानसभा मतदारसंघात होऊ घातल्या लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग व ८५ वर्षावरील (वयोवृद्ध) २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी१२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत १ हजार ३३१ यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणुकनिर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी दिली. मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघात सर्व नागरिकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूकविभागाच्यावतीने मतदानाविषयी विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. या अनुषंगाने १७ नोव्हेंबररोजी निवडणूक विभागाच्या स्वीप कक्षामार्फत तालुक्यातील कोळगाव येथे प्रत्येक घरोघरी जाऊन मतदानजनजागृती करून सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आव्हान करण्यातआले आहे. त्यासोबत जनजागृती मध्ये ‘मी मतदान करणारच‘ या घोषवाक्य समोर मतदारांची स्वाक्षरी घेतमतदार जनजागृती करण्यात आली आहे. सदरील मतदान जनजागृती अभियान हे निवडणुक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूकनिर्णय अधिकारी राजेश जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण, निवडणुकविभागाचे नायब तहसीलदार जोहरे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार विलास तेलंग, गट विकासअधिकारी सी. एल. रामोड, गट विकास अधिकारी पाटील, गट विकास अधिकारी महेश पाटील, लिपीकप्रशांत लिंबेकर, महाडीवाले, एस. डी. कुसुमकर, देशमुख तलाठी, स्वीप कक्ष प्रमुख एस. एस. करेवाडमुजावार सर, एन. एस. होनराव, राजु सुवर्णकार, सतिष बेदरकर, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान काम करीत आहेत. 

    Read More »
  • शेकोट्या पेटल्या;शहरासह तालुक्यातील भागात थंडी वाढली 

    राजकीय वातावरण तापले! मुखेड प्रतिनिधी:- थंडीने मुखेड शहरासह तालुक्यात हुडहुडी भरली आहे. थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपूर्वी हातरुण परिसरात…

    Read More »
Back to top button