क्राईम
-
आधार कीट सुरू न केल्यास “१५ ऑगस्टला आत्मदहन करणार ! बाऱ्हाळीच्या इस्माईल तांबोळींचा इशारा
∆ जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर करत तीव्र नाराजी मुखेड -(ता. प्रतिनिधी) १२ जुलै २५ मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील रहिवासी इस्माईल जाफर…
Read More » -
नांदेडमध्ये तरुणीच्या छेडछाडीप्रकरणी ऑटोचालकाला अटक, पोलिसांकडून १६ तासांत कारवाई
▫️संबंधित तरुणीन नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर केली होती पोस्ट नांदेड प्रतिनिधी:- १० जुलै २५ शहरातील श्रीनगर परिसरात एका प्रवासी तरुणीची छेड काढल्याच्या आरोपावरून एकाऑटोचालकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबंधित तरुणीने ही बाब सोशल मीडियावरपोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. पोस्टची गंभीर दखल घेत नांदेड पोलिसांनी अवघ्या १६ तासांत गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आणि संबंधितआरोपीविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केली. हा प्रकार सोशल मीडियावर आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी उचललेली कारवाईची शहरातीलपहिली घटना ठरली आहे, ज्यातून पोलिस प्रशासनाची तत्परता आणि संवेदनशीलता अधोरेखित होते. या कारवाईमुळे समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश गेला असून, पोलिस दलानेतात्काळ प्रतिक्रिया देत एक महत्त्वाचा आदर्श निर्माण केला आहे.
Read More » -
हाताने उकडला रस्ता! बोगस कामगिरीचा पर्दाफाश बिलोली तालुक्यात युवकांचा संताप; निकृष्ट दर्जाच्या कामावर थेट सवाल
∆ दुगाव-डोंगरगाव रस्त्यावरून गेल्याचा पश्चात्ताप होतोय जनतेला! ∆ रस्त्यावर डांबर आहे की चिखलाचा थर?कागदावर कोट्यवधींचा निधी… आणि जमिनीवर बोगस बांधकाम!…
Read More » -
रमी मध्ये हरला, बीडचा ASI चोर बनला, आधी SP कार्यालयात बॅटरी चोरल्या, आता दुचाकी चोरताना सापडला!
▫️बॅटरींची चोरी केल्यानंतर अमित सुतार यांचं केलं होतं निलंबन ▫️दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी बीड:- ०८ जुलै २५ बीडमध्ये पोलीस…
Read More » -
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या मदतीने तरुणाचा खून
▫️१२ तासांत दोघांना अटक – पोलिसांची वज्रकार्यवाही ▫️पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले तपास पथकाचे विशेष कौतुक हदगाव :- ०५ जुलै २५ हदगाव तालुक्यातील ढोरळी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या मित्राचा खून केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास काटेकर या व्यक्तीला संशय होता की त्याच्या पत्नीचे आपल्या मित्रासोबत अनैतिक संबंध आहेत. या रागातून त्याने काही मित्रांच्या मदतीने त्या व्यक्तीला दारूच्या नशेत ठार मारले. हत्या केल्यानंतर मृतदेह गावाजवळ फेकण्यात आला. पोलिसांनी तपास करत आरोपींना ताब्यात घेतले असून, प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने पोलिसांसमोर सांगितले की, दारूच्या नशेत त्यांनी हा गुन्हा केला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही ठोस धागादोरा नसतानाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांच्या तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने आणि साक्षीदारांच्या माहितीवरून केवळ १२ तासांच्या आत दोघा आरोपींना अटक केली. या जलद आणि अचूक कारवाईबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
Read More » -
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
परभणी : ०५ जुलै २५ परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून सुरूवातीपासूनच केला जातोय. परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथसूर्यवंशीला मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा ४५१ पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगा समोर सादरकेला. आता थेट संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयात बाजू मांडली होती. आता हायकोर्टाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिली आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने ही याचिका दाखल केली होती. याबाबत प्रकाश आंबेडकर हे सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणारआहेत. हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. परभणीत संविधान अवमाननेच्या घटनेनंतर आंदोलन झालेहोते. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी हे देखील सहभागी झाले. यादरम्यान या आंदोलनाने उग्र रूपधारण केले. या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी जानेवारी महिन्यात परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढला होता. राहुलगांधी यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला. न्यायालयीन कोठडीत पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशीला बेदम मारहाण झाली आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला. एका माथेफिरूने १० डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि त्याविरोधात ११ तारखेला परभणीत आंदोलन करण्यात आलं होते. या प्रकरणात तीन पोलिसांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले. आता हायकोर्टाने हे आदेश देतगुन्हा दाखल करा, असे थेट आदेशच दिले आहेत.
Read More » -
बार्टीच्या कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांना १५ हजार रुपयांची लाच घेतांना अटक !
नांदेड :०५ जुलै २५ येथील जिल्हा समाज कल्याण कार्यालयात कार्यरत असलेल्या बार्टीच्या कंत्राटी जिल्हाप्रकल्प अधिकारी सुजाता मधुकर पोहरे ह्या १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडल्याने त्यांनालगेच अटक करण्यात आली असल्याने सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली. यामुळे समाज कल्याणकार्यालयातील बरेच अधिकारी आणि कर्मचारी फरार झाले होते. अनुसूचित जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सुजाता पोहरे यांनी नगदी ३० हजार रुपयेमागितले होते. त्या स्वतः अनुसूचित जातीतील असूनही त्यांनी आपल्याच जातीच्या भगिनीला लाचमागितली याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्यावर मोठमोठी भाषणेद्यायची आणि आपल्याच समाज बांधवांचे आर्थिक शोषण करायचे हे कितपत योग्य आहे ? त्यांच्या यादुष्कृत्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांगलेच वाभाडे काढलेत. लाच स्विकारतांना अटक झाल्यानंतर सुजाता पोहरे यांची व त्यांच्या कार्यालयाची झाडाझडतीघेण्यात आली, त्यावेळी पन्नास हजार रुपये त्यांच्याकडे आढळून आले. यामुळे त्यांच्या पायाखालचीवाळू सरकली. हडको नांदेड येथील त्यांच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली. गरजू व्यक्तीला हे तीस हजार रुपये लाच म्हणून देणे परवडणारे नव्हते व लाच देण्याची त्यांची ईच्छानव्हती म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून भ्रष्ट सुजाता पोहरेवर कारवाईचीमागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोहरे यांच्या कार्यालयात सापळा रचून खात्रीकरुन घेतली व त्यानुसार अचानक धाड टाकली असता सुजाता पोहरे ह्या आपल्या कार्यालयात खुलेआमपंधरा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पोलिसांच्या हाती लागल्या. अचानक पडलेल्या या धाडीमुळे त्यांचाचेहरामोहराच बदलला. त्यांचा स्वभाव भांडखोर व उद्धटपणाचा असून त्यांच्या असंख्य तक्रारी असल्याचेसमजते.
Read More » -
हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून गुटखा जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही नांदेड दि. ४ जुलै २५:- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने…
Read More » -
नांदेडमधील २८ कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही
▫️१२ बियाणे, खत, कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द ▫️१४ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित नांदेड प्रतिनिधी:- दि. 2 जुलै २५ खरीप हंगामाच्या…
Read More » -
देगलूरात नऊ लाखांचा गुटखा जप्त; हिंगोलीतील दोघांवर गुन्हा दाखल
देगलूर प्रतिनिधी:- १ जुलै २५ तालुक्यातील वझरगा येथे सोमवार, दिनांक ३० जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास देगलूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करत एकूण नऊ लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर तात्काळ कृती करत केली. या कारवाईत शेख साजीद शेख जलाल बागवान (वय ३८) व शेख अख्तर शेख गफार बागवान (दोघेही रा. सदर बाजार, जामा मस्जिद जवळ, हिंगोली) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. हे दोघे पांढऱ्यारंगाच्या स्विफ्ट डिझायर (ΜΗ १२ KN ६०३९) कारमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती देगलूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वझरगा येथे सापळा रचून संबंधित कार अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित माल आढळून आला. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात पुढील वस्तूंचा समावेश आहे: विमल केशरयुक्त पान मसाला १५ पोते…
Read More »