सामाजिक

मराठवाडा विभागीय “होलार समाज चिंतन परिषद”मुखेड येथे संपन्न…

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०५ जून २६
३१ मे २६ रोजी मुखेड सुनंदा मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय होलार समाज संघटनेची मराठवाडा विभागीय “होलार समाज चिंतन परिषद” घेण्यात आली. या परिषदेच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून परिषद सुरुवात करण्यात आली.परिषदेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष पँथर मा. नंदकुमार केंगार साहेब तर उद्घाटक म्हणून राष्ट्रीय नेते तथा प्रमुख मार्गदर्शक मा. अँड. किरण जावीर साहेब हे होते. मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय महासचिव हैदर जी केंगार, प्रदेशाध्यक्ष रणजीत दादा ऐवळे-पाटील, समाज नेते पांडुरंग आयवळे, नारायण दादा जावीर, मराठवाडा अध्यक्ष प्रा.वैजनाथ सुरनर, संदीप गुळवे हे होते. प्रमुख उपस्थिती सुनील ढोबळे, मधुकर भंडगे,प्रा. एम. एम. सुरनर, सतीश उर्फ मुन्ना केंगार, भारत अण्णा गुळीग, बालाजी मांगदरे, सटवाजी गेजगे, माधवराव केजगीर, सर्जेराव टाळकुटे, राजेंद्र देवकत्ते सर, नामदेवराव देवकत्ते, अँड.मिलिंद हेगडे, नामदेव बाजगिरे व मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष तसेच स्वागताध्यक्षपदी अण्णासाहेब जाहीरे जुन्नेकर हे होते. या परिषदेमध्ये पुढील प्रमाणे ठराव पारित करण्यात आले आहेत.
1) जातनिहाय जनगणना 2027 व जातीच्या चुकीच्या नोंदी संदर्भात मा. मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांची शिष्टमंडळासह भेट घेणे.
2) अनुसूचित जाती उपवर्गीकरण विषयी चर्चा संवाद करून उपवर्गीकरण विरोधी ठराव पारित करण्यात आला.
3) होलार समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. उप कंपनी मुंबई आर्थिक निधी तरतुदी करिता मा. सामाजिक न्याय मंत्री व मुख्य महाव्यवस्थापक, मुंबई यांची शिष्टमंडळासह भेट घेणे.
4) होलार समाज अभ्यास आयोग नेमणे करिता मा. मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री व राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेणे.
5) मराठवाडा व विदर्भ विभाग संघटना बळकटीसाठी युवक व ज्येष्ठांना संघटनेमध्ये जबाबदारी देऊन सहभागी करून घेणे.
या परिषदेचे संयोजक, श्री माधवराव होनमाने व श्री राजाराम येळगे यांनी केले होते. सुत्रसंचालन श्री बालाजी येळगे सर यांनी केले तर आभार श्री संजय टाळीकोटे यांनी मानले. परिषदेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुखेड येथील युवक व जेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी समाज बांधवांनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button