राजकीय

मुखेड तालुक्याला दुष्काळ ‘ट्रिगर-१’ मध्ये तातडीने समाविष्ट करा; शेकापचे एक दिवसीय उपोषण, तहसीलदारांना निवेदन सादर

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०२ ऑक्टोंबर २६

मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत संकटात आणि अडचणीत सापडला आहे. असे असतानाही शासनाने जाहीर केलेल्या ‘ट्रिगर-१’ दुष्काळ यादीत मुखेड तालुक्याचासमावेश न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) वतीने एक दिवसीय उपोषण करून मुखेड तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील पावसाच्या अनियमितेमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेअसून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाने तालुक्याकडे दुर्लक्ष करून दुष्काळी यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या तीव्रजन भावनेचा आदर करून मुखेड तालुक्याचा तात्काळ दुष्काळ ‘ट्रिगर–१‘ मध्ये समावेश करावा आणिशासनाकडे तशी शिफारस पाठवून दुष्काळी सवलती व उपाययोजना तत्काळ लागू कराव्यात, अशी ठाममागणी यावेळी करण्यात आली.

मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास शेतकरी हितासाठी पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाईगोविंद डुमणे,तालुका चिटणीस भाई राजू पा सुरनर,राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद बल्खी,माजी नगरसेवक नासर खा पठाण ,भाई पांडुरंग लंगेवाड,बालाजी बंडे, दिनेश पाटील केरुरकर,विठ्ठलराव इंगळे सर,नगरसेवक बजरंग कल्याणी,शंकर चिंतमवाड,बजरंग पाटील पाळेकर, बजरंग पाटील जिगले,बालाजी आईंनवाड,आनंद पाटील बामणे,सतीश पाटील केरुरकर,राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदचे जिल्हाध्यक्ष महेताब शेख कॉम्रेड गौस अली सलगरकर,बबलू मुल्ला ,ज्ञानेश्वर पाटील लुठ्ठे,प्रदीप पाटील हसनाळकर,माधव पाटील होंनवडजकर ,एड ए बी लष्करे, मंगेश पाटिल इंगोले, संजय गोरठे,, बजरंग पाटील जांभालिकर, सुधाकर पाटील शिंदे ,चांद येवतीकर व शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button