राजकीय

मुखेड तालुक्याचा ‘ट्रिगर-१’ मध्ये समावेश करा; मंत्रालयात अपर मुख्य सचिवांना निवेदन

श्रमिकएकता न्यूज नेटवर्क  मुखेड: ०४ ऑक्टोंबर २६

मुखेड तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता तालुक्याचा तातडीने दुष्काळ जाहीर करण्याच्या‘ट्रिगर–१‘ (Trigger-1) मध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी आज मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख बजरंग कल्याणी, शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे आणि मारोती शिंदेवसुरकर यांच्या शिष्टमंडळाने कृषी विभाग तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिवांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली.

शिष्टमंडळाने सर्वप्रथम कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव परिमल सिंग यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील पावसाचा सलग खंड, वाळलेली पिके, तीव्र पाणीटंचाई आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा रोष याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुखेड तालुका डोंगराळ भागात मोडत असल्याने पावसाअभावी भूजल पातळी कमालीची खालावली असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर शिष्टमंडळाने मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता सिंघल यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान सुरुवातीला सॅटेलाइट अहवालानुसार परिस्थिती सामान्य दिसत असल्याचे आणि मातीचेनमुने मागवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर शिष्टमंडळाने सॅटेलाइट डेटापेक्षा जमिनीवरील वस्तुस्थिती (ग्राउंड रिपोर्ट) अत्यंत भयावह असल्याचे ठणकावून सांगितले. यावेळी पिकांचे झालेलेनुकसान, पावसाचा खंड आणि प्रत्यक्ष शेतातील छायाचित्रे व पुरावे सिंघल यांच्यासमोर सादर करण्यातआले.

शिष्टमंडळाने सादर केलेले पुरावे आणि शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, अपर मुख्य सचिवविनिता सिंघल यांनी मुखेड तालुक्याच्या समावेशाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना निश्चितन्याय देण्याचे आश्वासन दिले. तालुक्याचा ‘ट्रिगर–१‘ मध्ये तातडीने समावेश करून दुष्काळी मदत जाहीरन झाल्यास शेतकऱ्यांचा रोष आणखी तीव्र होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button