Uncategorized

नवीन प्रभाग रचना, OBC आरक्षणासह होणार महापालिका निवडणुकाः सर्वोच्च न्यायालयाचा मोठानिर्णय

मुंबई:- ०४ ऑगस्ट २५

सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग (वॉर्डरचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावतनिवडणुकांना मंजुरी दिली आहेत्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि २७ टक्के ओबीसी आरक्षणासह होणार हे निश्चित झाले आहेत्यामुळे महापालिकानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेरमोकळा झाला आहे.

नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्याकाही स्थानिक घटकांनी नव्या रचनेतील बदलांवर आक्षेप घेतले होतेमात्रआज न्यायालयाने यायाचिका फेटाळत राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्का मोर्तब केलेत्यामुळे मुंबईपुणेपिंपरीचिंचवडनाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये नव्या प्रभाग बांधणीच्या आधारे निवडणुका घेण्याचामार्ग मोकळा झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका देखील सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावलीया याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले कीआमच्या ६ मे२०२५ च्या आदेशानुसार २७% ओबीसी आरक्षणा नुसारच निवडणुका घेण्यात येतीलतसेच वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहेराज्य विधिमंडळाने तसा कायदा केला आहेआणि या कायद्याला स्थगिती नसल्याने हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचा आहेअसेही सर्वोच्चन्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यानस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी प्रभाग रचना की जुनी प्रभाग रचना याविषयी वाद सुरू होतामहाविकास आघाडीच्या काळात प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आलेहोतेत्यानंतर शिंदे– फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा त्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आलेमात्रवॉर्ड रचना कशी असावी याचा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहेत्यानुसार प्रभाग रचना होईलजी प्रभाग रचना राज्य सरकार ठरवेल त्यानुसारच निवडणुका होईलअसे आज सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button