Uncategorized

शेतकरी, शेतमजूर व सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली

मुखेड प्रतिनिधी:- १६ जानेवारी 

जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य, मुखेड भुषण डॉ. दिलीपराव पांडुरंग पुंडे यांना दिनांक २६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे राष्ट्रपती भवना मार्फत विशेष निमंत्रण प्राप्त झालेआहे. सदरील निमंत्रण हे रिसेप्शन अॅट होम या कार्यक्रमाचे असून भारतामधून ११ डॉक्टरांना त्यांच्याविशेष कार्याबद्दल निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात नांदेड ज्ह्यिातील मुखेड या ग्रामीण भागात मागील३८ वर्षांपासूनच्या सर्पदंशावरील विशेष कायार्ची दखल घेत राष्ट्रपती भवनामार्फत नदिड येथील मुख्यपोस्टातील वरिष्ठ अधिकारी अरुण गायकवाड, त्यांची टिम व मुखेड पोस्टातील सर्व अधिकारी, कर्मचारीयांनी स्वतः येऊन डॉ.पुंडे व सौ. माला पुंडे यांना निमत्रंण दिले. सदर कार्यक्रम २६ जानेवारी रोजीसायंकाळी चार वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे.

मागील ३८ वर्षांपासून डॉ. दिलीप पुंडे हे सेवावतीने या भागात आरोग्य सेवा देत आहेत. १९८८ ते १९९७ याकाळात ग्रामीण रुग्णालय मुखेड येथे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले. १९९७ पासून पुंडेहॉस्पिटल मुखेड येथे ते कार्यरत आहेत. आजपर्यंत लाखो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. सर्पदंशाच्या दहा हजारांहून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले. सर्पदंश हा शेतकरी व शेतमजूरयांचा काल मर्यादित अपघात असून वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू संभवतो. 

मुखेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दिलीप मुंडे म्हणाले, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझेदिवंगत आई–वडील (के. भीमाबाई व कै. पांडुरंगराव पुंडे), सर्व गुरुजन, पत्नी सौ. माला पुंडे, पुढेहॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे हजारो रुग्ण यांचा आहे

भारतात दरवर्षी किमान एक लाखाच्यावर मृत्यू सर्पदंशामुळे होतात. २०३० पर्यंत सर्पदंशाचा मृत्यूदर ५०टक्के कमी करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सध्या देशात सर्पदंशाविषयी अनेक उपक्रम कार्यान्वित केले आहेत. शेतकरी, शेतमजूर व सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली याचा मला विशेष आनंद आहे. मी भारताच्या महामहीम राष्ट्रपती, मराष्ट्रपती भवन, महासंचालक आरोग्य सेवा भारत मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांच्या या सन्मानाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button