स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कायवाही१२ तलवारी ११ खंजर जप्त

नांदेड प्रतिनिधी
शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्याची शोध मोहीम पोलीस अधीक्षक यांनी हाती घेऊन तशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली असता . गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध्यरित्या विक्री करणाऱ्या आरोपीला पकडून त्यांच्याजवळ 12 तलवारी 11 खंजर जप्त केले आहे
सविस्तर वृत्त असे की नगीनाघाट परिसरामध्ये एका जनरल स्टोअर्स मध्ये विक्रीसाठी आणलेल्या 12 तलवारी ११ खंजर हे विक्रीसाठी ठेवल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यावरून स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे जाऊन तपासणी केली असता विक्रीसाठी ठेवलेल्या १२तलवारी 11 खंजर जप्त करून आरोपीला अटक केली आहे
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराय धरणे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परमेस्वर चव्हाण शंकर म्हैसंनवाड संभाजी मुंडे ज्वालासिंग बावरी चालक करीम शेख अधिक जणांनी कारवाई पार पाडली



