Uncategorized

सकल मराठा समाजाच्या युवकांनी बावनकुळे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

मुखेड प्रतिनिधी:-

भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मुखेड येथे आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला  गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सकल मराठा समाजातील युवकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.

देगलूर विधानसभा, नायगाव विधानसभा व मुखेड विधानसभेतील प्रत्येकी १०० सुपर वॉरियर्स व नांदेड लोकसभा व या तीन विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात येणार होती. आज दि २१ डिसेंबर रोजी  मुखेड येथे बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाड्यांचा ताफा गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुखेड शहरात येत असताना. त्याचवेळी नरसी  रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ  सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला निषेध व्यक्त करतेवेळी राजमुद्रा चे अध्यक्ष सचिन पाटील इंगोले,शिवप्रसाद पाटील तेलंग, बालाजी पाटील वडजे,गिरीधर पाटील केरुरकर,कपील काटेवाड, योगेश पाटील जाधव, ज्ञानेश्वर पाटील शिंदे, राजेश पाटील नांदगावकर इतर युवकांनी खिशातून काळे झेंडे काढून बावनकुळे यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर जोरदार आंदोलन केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, राज्य शासन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  हा सर्व प्रकार होत असतानाच पोलिसांनी तातडीने या युवकांना ताब्यात घेत मुखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button