विविध मागण्यासाठी सीटूची जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीन तास निदर्शने व घेराव आंदोलन

नांदेड प्रतिनिधी:- आसद बल्खी
नांदेड : जिल्ह्यातील कामगारांच्या विविध मागण्यासाठी आज गुरुवारी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) संघटनेच्या वतीने नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीन तास निदर्शने व घेराव आंदोलन करण्यात आला. या आंदोलनात विविध तालुका व जिल्ह्यातून शेकडो कामगार सहभागी झाले होते. नांदेड जिल्ह्यातील नांदेड,अर्धापूर,मुदखेड,भोकर, हिमायतनगर, हदगाव,धर्माबाद, बिलोली,मुखेड,किनवट,माहूर व इतर ठिकाणी जॉब कार्ड जॉब कार्डचे तातडीने वाटप करावेत. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे काढून मागेल त्याला कामे द्यावी.
रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या कामगारांना केरळ राज्याप्रमाणे ६०० रुपये मजुरी द्यावी, गरीब अल्पभूधारक,मजदूर, निराधार, दिव्यांग इतर कुटुंबांचा दारिद्र्यरेषेचा सर्वे करून पिवळे राशन कार्ड चे वाटप करावेत. बेघर लोकांना घरकुलाचे वाटप करावे. गायरान व इतर जमिनीवरील अतिक्रम नियमित करून त्यांना मालकी हक्क द्यावा. कंत्राटी कामगारांचे वेतन बँक खाते डीबीटी द्वारे देण्यात यावे. वृध्द तसेच निराधारांना पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी. अशा विविध मागण्यासाठी हा निदर्शने व घेराव आंदोलन करण्यात आला. सदरील मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कामगार व जनवादी चळवळीचे कॉ.विजय गाभने, सिटूच्या राज्यसचिव व जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार, सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केले.
सदरील आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.दिगांबर काळे,कॉ.दिलीप पोतरे,कॉ. करवंदा गायकवाड,कॉ.लता गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.श्याम सरोदे, कॉ.जय गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ.मंगेश वटेवाड, कॉ. संतोष शिंदे आदींनी प्रयत्न केले.



