कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा 50 हजारांचा दंड

* नाशिक जिल्हान्यायालयाचे आदेश,मंत्रीपद अन् आमदारकी धोक्यात
नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटें आणि त्यांचे बंधू सुनिल कोकाटे यांना 2 वर्षांचीशिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याप्रकरणी ही शिक्षासुनावण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता.
1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकरावकोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्याहोत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्याहोत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हेआमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वादसुरू होता.



