दुबार पेरणीचे संकट,बोगस बी-बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा!

मुखेड अ भा. छावा संघटनेचा आंदोलनाचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
मुखेड : प्रतिनिधी:- ११ जुलै २५
तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात बोगस बी–बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुबार पेरणीचेसंकट ओढावले असून, या बोगस कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तहसीलकार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अ भा. छावा संघटनेच्या वतीने निवेदन दि ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले.
बोगस बी–बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, त्यातच यंदा हवामानाचाअनियमितपणा आणि अद्याप न मिळालेला पीक विमा यामुळे शेतकरी अक्षरशः अडचणीत सापडलाआहे. जिल्ह्यातील काही कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस बी–बियाणे व खते खुलेआम विकलेजात आहेत. त्यामुळे केवळ बोगस कंपन्यांवर नव्हे तर त्यांच्या पाठीशी असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवरहीगुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालय, मुखेडयेथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटना तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे केरुरकर, युवक काँग्रेसतालुका सचिव तुकाराम पाटील सुडके, हनुमंत पाटील हसनाळकर, बालाजी पाटील शिंदे यांच्या सह्याआहेत.
शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी प्रशासनाने त्वरेने कारवाई करावी, हीच या आंदोलनाची मुख्य मागणी होती.



