राजकीय

ओबीसी जनगणनेसाठी मुखेडमध्ये एल्गार! २३ एप्रिलच्या ‘भारत बंद’साठी बामसेफ सज्ज

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०१ एप्रिल २६

देशातील ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावीया प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या वतीने आरपारची लढाई लढली जाणार आहेमावामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी दि ३१ मार्च रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात एक महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत मुख्यत्वे ओबीसी जनगणनेच्या मागणीवर भर देण्यातआलाजोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाहीतोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाहीअशीभूमिका उपस्थित नेत्यांनी मांडली२३ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘भारत बंद‘ आंदोलनात मुखेड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेअसे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीत अविनाश ढवळे सर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेत्यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकतआपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणे किती गरजेचे आहेहे पटवून दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मोतिराम पवार साहेब, गजानन कोलमकर साहेब, सचिन चव्हाण चांडोळकर, पी. के. गायकवाड, महेंद्र चव्हाण, शंकर पाटील वडजे, धोंडिबा तोळीराम पवार, लक्ष्मण कांबळे, मारोती पा. दबडे, सोनकांबळे परमेश्वर, जाहीरे रामचंद्र विठ्ठलराव, दिपक राठोड, भुजंग पुंडलिक बोमनाळिकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button