क्राईम

नांदेडमध्ये रक्ताची होळी सुरूच! तिहेरी हत्याकांडानंतर २४ तासांत पुन्हा एक खून; शहरात दहशतीचे सावट

नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०५ एप्रिल २०२६)

 नांदेड शहरात कायद्याचा सुळसुळाट झाला की गुन्हेगारांचे राज्य आलेअसा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेतशुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण गँगवॉरमध्ये तिघांचा बळीगेल्यानंतरअवघ्या २४ तासांत शनिवारी रात्री उशिरा शहरात पुन्हा एक खळबळजनक हत्या झालीशहरातील मुर्मुरा गल्ली परिसरात रज्जूसिंग उर्फ रणजितसिंग तबेलेवाले (वय ३२) या तरुणाची तलवारीने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसाररज्जूसिंग आणि आरोपींमध्ये जुना वाद होताशनिवारी रात्री उशिरादोन हल्लेखोरांनी रज्जूसिंगला गाठले आणि त्याच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला चढवलाया हल्ल्यातगंभीर जखमी झालेला रज्जूसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला होतात्याचा जागीच मृत्यू झालाघटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिसांनी वेगाने चक्र फिरवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

नांदेडमध्ये सलग दोन दिवसांत चार खून झाल्यानेसंपूर्ण जिल्हा हादरून गेला आहेएकीकडे पोलीस प्रशासन ‘कॉम्बिंग ऑपरेशन‘ आणि नाकेबंदीचा दावाकरत असतानादुसरीकडे गुन्हेगार भररस्त्यात तलवारी नाचवत आहेत. ‘सिंघम‘ म्हणून ओळखले जाणारेअधिकारी असतानाही गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

सलग घडणाऱ्या या खुनांच्या सत्रामुळे व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेमुर्मुरा गल्ली आणि परिसरात तणावपूर्ण शांतता असूनपोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहेवजिराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असूनयामागे आणखी कोणाचे हात आहेत कायाचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button