शैक्षणिक

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचा १४ कोटींचा निधी परत; दोषींवर कारवाई करा!

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६

जिल्हा परिषद शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या हक्काचा तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी शिक्षणविभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे शासनाकडे परत गेला आहेया गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यातील शेकडोशिक्षक आर्थिक संकटात सापडले असूनयाप्रकरणी दोषी अधिकारी  कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोरकारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक शाखेच्या वतीने पालकमंत्री अतुलसावे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत, “परत गेलेला निधी पुन्हा उपलब्ध करून दिला जाईल आणि याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पालकमंत्री सावे यांनीशिष्टमंडळाला दिले.

जिल्हा परिषद शिक्षक  सेवानिवृत्त शिक्षकांची वेतन आयोग हफ्ते ,चट्टोउपाध्याय वेतनश्रेणीनिवडश्रेणीचे थकीत वेतन देयकाची फरकाची रक्कम दरवर्षी शासनाकडून मागवण्यात येते  अशी रक्कमशासन  जिल्हा परिषदकडे वर्ग केली जाते‌ अशी आलेली सर्व देयके प्रलंबित  ठेवता संबंधितशिक्षकांना त्यांना अदा करण्याचे शासनाचे आदेश असतानाही  शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीउपलब्ध करून देण्यात आला असतानाहीगेल्या दोन वर्षापासून प्रलंबित देयके जि  प्रशासनाच्या दिरंगाई मुळे  हलगर्जीपणामुळे ३१ मार्च रोजी संबंधित शिक्षकांना  मिळाल्यामुळे ३१ मार्च नंतर १४ कोटीची रक्कम परत गेल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शिक्षक या लाभापासून वंचित राहिले आहेत.आता हीनिधी परत  उपलब्ध होण्यासाठी एक वर्ष लागतोयामुळे ज्या शिक्षकांची  देयके प्रलंबित होती ते शिक्षक आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.  यामुळे शासनाने निधी उपलब्ध करून देऊनही  दप्तर दिरंगाई   जि  प्रशासना कडून हलगर्जीपणा करण्यात आलायामुळे पात्र असूनही शिक्षकांना त्यांची देयके मिळाली नाहीतअशा दोषी कर्मचारी   अधिकाऱ्याची खाते निहाय चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणीनांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.पालकमंत्री अतुल सावे यांनी या संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात येईल परत गेलेला निधी उपलब्ध करून देणार असे आश्वासन शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.

याप्रसंगी किनवट विधानसभा आमदार संघाचे आमदार भीमराव केराम , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुखपोलीस अधीक्षक अबिनाश कुमारमनपा आयुक्त महेश डोईफोडे उपस्थित होते.

 यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे विभागीय कार्याध्यक्ष बालाजी बामणेजिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड ,जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोडजिल्हा प्रवक्ते रवी ढगे,जिल्हा संघटन मंत्री संजय मोरेजिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिथुन मंडलेवारजिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button