क्राईम

दुष्काळी अनुदानावर डल्ला मारणाऱ्यांवर गुन्हा नोंदवा! मुखेड तहसीलदारांचे पोलिसांना कडक आदेश

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २७ एप्रिल २६

शासकीय दुष्काळी अनुदानाचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध आता महसूलप्रशासन आक्रमक झाले आहेमौजे बेरळी (खु.) येथील एका जमीन प्रकरणात पेरणी नसतानाही खोटे अनुदान उचलल्याचे सिद्ध झाल्यानेया प्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसारबेरळी (खु.) येथील गट क्र. १७५ आणि गट क्र. २२९ मधील जमिनीवर प्रत्यक्षात कोणतीही पेरणी केलेली नव्हतीअसे असतानाही संबंधितांनी शासनाची दिशाभूल करून२,२७१ रुपयांचे दुष्काळी अनुदान लाटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहेया संदर्भात अशोक मारोती बच्चेवार यांनी तक्रार केली होतीज्याचा अहवाल मंडळ अधिकारी श्रीजीएमगरुडकर यांनी सादर केला होता.

तहसीलदारांनी आपल्या पत्रात अत्यंत गंभीर बाब नमूद केली आहेमंडळ अधिकारी हे आवश्यक ते सर्वअभिलेख (पुरावेघेऊन मुखेड पोलीस स्टेशनला ८ ते ९ वेळा गेले होतेमात्रइतक्या वेळा चकरा मारूनही पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नसल्याचे समोर आले आहेप्रशासनाच्या एका शाखेने पुरावे देऊनही दुसरी शाखा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ का करत आहेअसा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

तहसीलदार राजेश जाधव यांनी पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा कळविले आहे कीमंडळ अधिकारीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधितांवर तातडीने नियमानुसार गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही करावीया आदेशामुळे आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलतेयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button