शहर

वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी नांदेडमध्ये राज्यस्तरीय सत्कार सोहळा 

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड: ०१ ऑगस्ट २६

वैश्य शिक्षक व कर्मचारी महासंघ, नांदेड यांच्या वतीने वैश्य समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच NEET, CET 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘राज्यस्तरीय सत्कार सोहळा‘ रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वासवी मंगल कार्यालय, सिडको, नांदेड येथे आयोजितकरण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर नागरी सहकारी बँक, नांदेडचे माजी अध्यक्ष मा. एकनाथराव मामडेहे उपस्थित राहणार आहेत. तसेच, विशेष अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. शहाजी उमाप तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद व जलसंधारण अधिकारी (वर्ग १) मा. तेजस चिखलीकर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्य वैश्य महासभा महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, नांदेडमर्चंट बँकेचे अध्यक्ष दिलीपभाऊ कंदकुर्ते, नांदेड जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमारमुक्कावार, जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजयनलबलवार, मा. जि.प. सदस्य बालाजी बच्चेवार, नगरेश्वर मंदिराचे अध्यक्ष भागवत गंगमवार, सचिवसुरेश कोटगिरे, माजी अध्यक्ष सुभाष कन्नावार, प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम मेडेवार, काशी अन्न सत्रमतिरुपतीचे उपाध्यक्ष साईनाथ मेडेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गजानन पांपटवारआणि आर्यवैश्य महासभेचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कोकडवार यांची उपस्थिती राहणार आहे.

या सत्कार कार्यक्रमानंतर लगेचच सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक वैश्य शिक्षक व कर्मचारी महासंघ, नांदेड यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button