Uncategorized

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभाही लढणार आणि लोकसभेची पोटनिवडणूकही लढणार, मतदारसंघही ठरले!

नांदेड : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेडमधूनलोकसभा  पोट निवडणूक लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणारआहेत.

बोलताना इम्तियाज जलील यांनी आगामी रणनीती बाबत भाष्य केलं आहे. दरम्यान, इम्तियाज जलीलयांच्यामुळे कोणाला फटका बसणार? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

इम्तियाज जलील म्हणाले, नांदेडमधून लोकसभा लढण्याची संधी आलेली आहे. लोकांमध्ये रोष पाहायलामिळतोय. मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनीकशी मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहिती आहे. आमचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांचीनिवडणूक लढवण्याची इच्छा आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसादआम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत. बी टीमआम्हाला म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आता आम्ही या आरोपांनाकाडीचंही महत्त्व देत नाहीत. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु? आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार आहोत. आम्ही कसं निवडून येऊ शकतो, हा विचार करणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button