क्राईम

नांदेडमध्ये थरार: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १९ वर्षीय तरुणाची हडको परिसरात निर्घृण हत्या

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क | नांदेड : १९ सप्टेंबर २०२६

नांदेड शहरातील हडको परिसरातील शाहूनगर (वाघाळा) येथे मध्यरात्री एका १९ वर्षीय तरुणाची धारदारशस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संघरत्न ऊर्फ‘डोरेमॉन‘ माधवराव वाघमारे असे या मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास हडको परिसरातील पाण्याच्या टाकीच्या आवारात ही रक्तरंजित घटना घडली. मारेकऱ्यांनी संघरत्नवर शस्त्रांनीजोरदार हल्ला चढवला. या अमानुष मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने विष्णुपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसूनचौकशी करण्यात येत आहे. सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

मृत संघरत्न ऊर्फ ‘डोरेमॉन‘ याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पासूनच तो गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता. पोलीस अभिलेखानुसार, त्याच्यावर नांदेडग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये तो तुरुंगातहीजाऊन आला होता आणि नुकताच जामिनावर बाहेर आला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलीआहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button