सामाजिक

मुखेड, देगलूरसह नांदेड शहर भूकंपाने हादरले; आजचा धक्का पूर्वीपेक्षा अधिक तीव्र

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : ०३ ऑक्टोंबर २६

नांदेड शहर, मुखेड आणि देगलूर परिसरात आज सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. आज जाणवलेला हा हादरा पूर्वी बसलेल्या धक्क्यांपेक्षा अधिक तीव्र आणि मोठा असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक जमीन हादरली. जमिनीतून मोठा गडगडाटी आवाज आल्यासारखे वाटले, तसेच घरातील खिडक्या, दारे, भिंती आणि भांडी जोरदार हलल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली. पूर्वीच्या तुलनेत हा धक्का अधिक तीव्र असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वारंवार जाणवणाऱ्या भूगर्भीय हालचालींमुळे परिसरात आधीच चिंतेचे सावट होते; त्यातच आजचा धक्का पूर्वीपेक्षा जास्त तीव्र असल्याने भीती अधिक वाढली आहे.

प्राथमिक माहितीनुसार सुदैवाने अद्याप कोणत्याही मोठ्या नुकसानीचे किंवा जीवितहानीचे वृत्त नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button