सामाजिक

मुखेडचा ‘ट्रिगर १’ मध्ये समावेश करा; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


श्रमिक एकता न्यूज़ मुखेड: ०३ ऑक्टोबर २६

पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने मुखेड तालुक्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हाताशी आलेली खरीप पिके वाळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। या गंभीर पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुखेडचा ‘ट्रिगर १‘ मध्ये समावेश करून शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद‘ या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे

या मागणीचे निवेदन तहसीलदार अभयराज मंजुडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आले। पावसा अभावी शेतकरी संकटात सापडला असून शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून आवश्यक त्या सवलती लागू कराव्यात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।

निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष सादक तांबोळी, मराठवाडा सरचिटणीस गौस अल्ली, जिल्हाध्यक्ष महेताब शेख, जिल्हा चिटणीस हसनोद्दीन शेख, तालुकाद्यक्ष आसद बल्खी, जयभीम सोनकांबळे, ॲड. वाय. जे. तांबोळी, ॲड. शफी सय्यद, रज्जाक पठाण, ॲड. मिलिंद कांबळे, खाजा शेख, गौस मिर्झा, माजीद मुजावर, चांदभाई येवतीकर, इलियास कादरी, रज्जाक मनियार, नागेश सय्यद, मोईन कंधारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button