Uncategorized

जि.प. हायस्कूल मुलींच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संजय यलमवाड तर वेणुताई रॅपनवाड यांची उपाध्यक्षपदी निवड

मुखेड प्रतिनिधी:- ३० सप्टेंबर 

       पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींचे) मुखेड येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. समाजकार्यात अग्रेसर आणि कोळी समाजाचे नेते संजय यलमवाड यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी वेणुताई रॅपनवाड यांचीही सर्वानुमते निवड झाली.

या निवडणुकीत सदस्यपदी साईनाथ बोईनवाड, नितीन तलवारे, माधुरी इंगोले, शुभांगी कांबळे, एस के बबलू, शिवराज बेळीकर, रेशमा उतकर, रेखा गायकवाड, दिनेश कोनापुरे, सचिन गायकवाड, अश्विनी कांबळे, सदाशिव चव्हाण, स्वरुपा शिंदे, अंजली कोकणे, भीमराव बनसोडे, सुरेखा डुबुकवाड, शिवनंदा निरदुडे, निर्मला चव्हाण, संतोष जवादवार यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडणुकीत महिला आणि पुरुष अशा दोन गटांमध्ये आरक्षण घेऊन ११ महिला आणि १० पुरुष असेएकूण २१ सदस्यांची समिती गठित करण्यात आली. निवडणूक पूर्णपणे शांत, लोकशाही व पारदर्शक पद्धतीने पार पडली.

या बैठकीचे अध्यक्षपद शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मेहताब शेख यांनी भूषविले. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी मुख्याध्यापक डि.जी. कांबळे, उपमुख्याध्यापक देवकांबळे सर, राजपूत सर, लोहबंदे सर, दारकू सर, स्वामी मॅडम, हराळे मॅडम, शृंगारे सर, भवानी चौहान यांची उपस्थिती होती. सर्वांनी नव्या समितीला शुभेच्छा देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button