Uncategorized
    1 hour ago

    जि.प.मुलींचे हायस्कूलमध्ये वॉटरफिल्टर यंत्राचे लोकार्पण

    गटविकासधिकारी व गटशिक्षण अधिका-यांची प्रमुख उपस्थिती. शालेय व्यवस्थापन समिती,शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग. मुखेड / प्रतिनिधी.…
    Uncategorized
    23 hours ago

    जांब बु  येथील सोसायटीतील कागदपत्रे चोरीस अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

    जांब प्रतिनिधी:- तालुक्यातील जांब बु येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या कार्यालयात चोरीझाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी २००७ ते २०१० या कालावधीतील मासिक व वार्षिक सभेचीसुचना बुक, प्रोसिडींग बुक, किर्द रजिस्टर आणि कर्ज खतावणीचे जुने रजिस्टर असे एकूण सहा महत्त्वाचेकागदपत्रे चोरुन नेली आहेत. सोसायटी सचिव रोहीदास वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताकार्यालय कुलूपबंद केले होते. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयात आल्यावर कुलूप तोडूनखिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी लोखंडी कपाटातून महत्त्वाचीकागदपत्रे लंपास केली असून, यांची अंदाजे किंमत ५८० रुपये आहे.  या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३३१ (४) आणि३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २००७ ते २०१० या काळात सोसायटीवरप्रशासक नेमण्यात आला होता. तसेच, जागेच्या मालकीसंदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. त्यामुळे हीचोरी हेतुपुरस्सर केली गेली की साधी चोरी आहे, यावर गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे
    आरोग्य
    1 day ago

    दर्पण दिनानिमित्त आज पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी शिबिर

    ६ जानेवारीला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व विविध कार्यक्रमाचे आयोजन  मुखेड, (प्रतिनिधी)- प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी मुखेड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सल्गणीत मुखेड तालुकामराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.४ ते ६ जानेवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसुन आज दि.४ जानेवारी रोजी आयएमए संघटना, वैद्यकीय संस्था व मुखेड उपजिल्हा रूग्णालय यांच्यासंयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच ६ जानेवारी रोजी रुग्णांना फळे व विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दर्पण दिनाचे अवचित्य साधुन आज ४ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजता वैद्यकीय संस्था, आय एमएसंघटना व उपजिल्हा रुग्णलाय यांच्या वतीने सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनकरण्यात आले असुन यात रक्त च्या सर्व तपासणी मधुमेह चाचणी, कोलेस्ट्रॉल रक्तदाब, हृदयरोग बाबतीतआवश्यक चाचणी, नेत्र तपासणी, हाड सांधे दुखी तपासणी, दंतरोग तपासणी, वजन, बीएमआय, शुगर, बीपी, एक्सरे अशा सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीजागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य मुखेडभुषण डॉ. दिलीप पुंडे हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणुनआयएमए संघटनेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध – हदयरोगतज्ञ डॉ. अशोक कौरवार, उपजिल्हा रुग्णालयाचेवैद्यकिय अधीक्षक डॉ. संतोष टाकसाळे, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामराम श्रिरामे, डॉ व्यंकटराव सुभेदारभोसले, डॉ. महेश पतेवार, आयएमए संघटनेचे सचिव डॉ. कैलास पाटील चांडोळकर, वैद्यकीय संस्थेचेसचिव डॉ. श्रिहरी बुडगेमवार, दंतरोगतज्ञ डॉ पांडुरंग श्रीरामे यासह अनेक मान्यवर तज्ञ डॉक्टरांची उपस्थितीराहणार आहे. यावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी वैद्यकीय संस्था, आयएमए संघटना व मुखेड उपजिल्हारुग्णलायातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत होणार आहे. त्याचबरोबर ०६ जानेवारी रोजी दर्पण दिन्नानिमित्तसकाळी १० वाजता मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्वं सामान्य, गोरगरीब नागरिकांच्यापाल्याला, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही, पेन, शॉपनर, खोडरबर पुस्तके वाटप करण्यात येणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे तरी या विविध कार्यक्रमास पत्रकारबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अ.भा. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    राजकीय
    3 days ago

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव पदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड 

    नांदेड प्रतिनिधी:- नांदेड  : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ८ वे त्रेवार्षिक तालुका अधिवेशन गांधी नगर येथे दि.२ जानेवारी रोजीमोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनास पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने यांची प्रमुखउपस्थिती होती. कामगार नेते व पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड या अधिवेशनातएकमताने करण्यात आली. पहिल्या सत्राच्या सुरवातीला पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री दिवंगत कॉ.बुद्धदेव भट्टाचार्य, माकपचेराष्टीय महासचिव कॉ.सीताराम येचूरी तसेच किनवट माहूर मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचेसह परभणी दंगलीतील शहीदाना व ज्ञात,अज्ञात चळवळीतील कालवश लोकांना शोक सभा घेऊनश्रद्धांजली वाहण्यात आली. कॉ.विजय गाभने यांनी अधिवेशनास संबोधित केले तर पक्षाच्या जिल्हा सचिव मंडळ सदस्या कॉ.उज्वलापडलवार यांनी प्रस्ताविक केले.सूत्रसंचालन कॉ.श्याम सरोदे यांनी केले  या अधिवेशनात तालुका कमिटी सदस्य म्हणून कॉ.उज्वला पडलवार,कॉ.अरुण दगडू, कॉ. करवंदागायकवाड, कॉ.मीना आरसे, कॉ.लता गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ.बंटी वाघमारे, कॉ. जयराजगायकवाड, कॉ.रमेश गायकवाड, कॉ.प्रफुल्ल कऊडकर आदींची निवड करण्यात आली.ही तालुका कमिटीपुढील तीन वर्षासाठी कामकाज पहाणार आहे. सदरील अधिवेशनात नांदेड शहरासह वाघी, वानेगाव,बोरगाव,कोंढा, सोमेश्वर, वानेगाव येथील पक्षसभासदांनी सहभागी झाले होते. अधिवेशनाचा समारोप कॉ.अरुण दगडू यांनी केला तर आभार कॉ. बंटी वाघमारे यांनी मानले. अधिवेशनयशस्वी करण्यासाठी कॉ. संगीता गाभने, कॉ.प्रदीप महाजन,कॉ.पवन जगडमवार, कॉ. बालाजी पाटीलभोसले, कॉ.नेहा कऊडकर, कॉ.मंगेश वाट्टेवाड,कॉ. पंढरी बरुडे आदींनी परिश्रम घेतले.
    शहर
    3 days ago

    साबीर अलीशाह खादरी उर्सनिमित्त संदलसह विविध कार्यक्रम उत्साहात.

    मौलाना नक्षबंदी यांचे व्याख्यान व लतीफ हैरा यांच्या कव्वालीचा रंगला समा. मुखेड / प्रतिनिधी. दरवर्षी…
    विशेष
    3 days ago

    मुखेडमध्ये शौर्य दिनानिमित्त मोटारसायकल रॅली काढून अभिवादन

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड : दि १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त मुखेड शहरात मोटारसायकल रॅली काढून रॅलीत भीमाकोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. या रॅलीचे आयोजन विजय लोहबंदे व आशिष भारदेयांनी केले. ही मोटारसायकल रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्मारकाजवळ विसर्जित करण्यात आले. या दिवशी १८१८ च्या भीमा कोरेगाव युद्धातील शूरवीरांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या समारोपवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील स्तंभांना वंदन करण्यात आले. या रॅली दरम्यान काही अनुचितघटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. यावेळी विजय लोहबंदे,आशिष भारदे, प्रवीण मोरे, क्षितिज हसनाळकर, विश्वा गायकवाड, नितीन सोनकांबळे, आसद बल्खी, जयभीम सोनकांबळे, प्रशांत भालेराव, किशोर लोहबंदे, सिद्धार्थ कांबळे, मोहन गायकवाड, आशुतोषकांबळे, रियाज शेख,एस के बबलु,कुलदीप कोतापल्ले यासह या रॅलीमध्ये स्थानिक नागरिक, तरुण वर्ग आणि सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्तसहभाग होता. शौर्य दिनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या उपक्रमामुळे ऐतिहासिकवारसा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात यश आले. 
    Uncategorized
    5 days ago

    बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी

    बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न नांदेड, दिनांक 30 डिसेंबर :- जिल्ह्यात बालविवाह…
    Uncategorized
    6 days ago

    मुखेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात होतेय नागरिकांची आर्थिक लुट.

    रजिस्ट्रीला घेतलेली ज्यादा रक्कम वापस करण्याची निवेदनाव्दारे मागणी. मुखेड / प्रतिनिधी. मुखेड येथील दुय्यम निबंध…
    Uncategorized
    7 days ago

    वार्ताहर शेख असलम यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

    पोलिस निरीक्षक मारोती मुंडेंनी केली प्रशंसा देगलूर/प्रतिनिधी देगलूर येथील पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम…
    विशेष
    1 week ago

    सुफीसंत सय्यद साबीर अलीशाह खादरी यांच्या जयंती,उर्स व संदल निमित्य विविधकार्यक्रमाचे आयोजन

    मुखेड प्रतिनिधी:-  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हजरत सुफी संत सय्यद साबीर अलीशहा खादरी यांचे २३ वी उरुस व संदल दि. २९ डिसेंबर ते दि.३० डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये दि. २९ डिसेंबर २४ रोजी दुपारी २.००वाजता अकबरखान दाऊद खान खंडोबा गल्ली मुखेड येथुन संदल व मिरवणुक निघुन बाजार लाईन मेन रोडते बसस्थानक रोड पासुन लोखंडे चौक ते खैरका रोड येथुन निघुन रात्री ८.०० वाजता दर्गा येथे जावुनमिरवणुक समाप्त होईल व तसेच रात्री १०.०० वाजता मौलाना मोहमद अहेमद नक्षबंदी हैद्राबाद यांचेव्याख्यान होईल. तसेच दि.३० डिसेंबर २४ रोजी रात्री ८.०० वाजता लतीफ हैरा कव्वाल जलगाव यांची कव्वालीचा रात्रभरजंगी कार्यकम होईल व कार्यक्रमाचा समारोप होईल सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुनमुखेड–कंधारचे आमदार डॉ. तुषारजी राठोड व माजी नगरअध्यक्ष गंगाधर राठोड, नगर सेवक– पठाणनासेरखान , लक्ष्मण पाटील खैरकेकर पंचायत समिती सदस्य, व इतर मान्यवराची उपस्थिीती ही लाभणारआहे. तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमांची शोभा वाढवावी असेदर्गाचे सज्जादा हाफीज जमालोदीन खादरी व उर्स कमीटीचे अध्यक्ष– हाजी काझी सय्यद साबीर सर, उपाध्यक्ष–सय्यद सुभानी मोहीयोद्दीन, तसेच इतर सदस्य– पठाण अनवर खॉन महेबुबखान, शेख अमीर हाजीअहेमद कंधारी, शेख बाबा मियाँ लाटवाले, सय्यद शमशोदीन, पठाण रुस्तुम खॉ, शेख मौला, अहेमद खा, मुन्ना पेंटर, शेख अहेमदभाई बेलीकर, शेख हसन बेलीकर, ताजोद्दीन बेलीकर, शेख इब्राहीम बल्खी, शेखआमेर आदीनी विनंती केलेली आहे
    • आरोग्य

      दर्पण दिनानिमित्त आज पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी शिबिर

      ६ जानेवारीला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व विविध कार्यक्रमाचे आयोजन  मुखेड, (प्रतिनिधी)- प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी मुखेड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सल्गणीत मुखेड तालुकामराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.४ ते ६ जानेवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसुन आज दि.४ जानेवारी रोजी आयएमए संघटना, वैद्यकीय संस्था व मुखेड उपजिल्हा रूग्णालय यांच्यासंयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच ६ जानेवारी रोजी रुग्णांना फळे व विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दर्पण दिनाचे अवचित्य साधुन आज ४ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजता वैद्यकीय संस्था, आय एमएसंघटना व उपजिल्हा रुग्णलाय यांच्या वतीने सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनकरण्यात आले असुन यात रक्त च्या सर्व तपासणी मधुमेह चाचणी, कोलेस्ट्रॉल रक्तदाब, हृदयरोग बाबतीतआवश्यक चाचणी, नेत्र तपासणी, हाड सांधे दुखी तपासणी, दंतरोग तपासणी, वजन, बीएमआय, शुगर, बीपी, एक्सरे अशा सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीजागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य मुखेडभुषण डॉ. दिलीप पुंडे हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणुनआयएमए संघटनेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध – हदयरोगतज्ञ डॉ. अशोक कौरवार, उपजिल्हा रुग्णालयाचेवैद्यकिय अधीक्षक डॉ. संतोष टाकसाळे, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामराम श्रिरामे, डॉ व्यंकटराव सुभेदारभोसले, डॉ. महेश पतेवार, आयएमए संघटनेचे सचिव डॉ. कैलास पाटील चांडोळकर, वैद्यकीय संस्थेचेसचिव डॉ. श्रिहरी बुडगेमवार, दंतरोगतज्ञ डॉ पांडुरंग श्रीरामे यासह अनेक मान्यवर तज्ञ डॉक्टरांची उपस्थितीराहणार आहे. यावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी वैद्यकीय संस्था, आयएमए संघटना व मुखेड उपजिल्हारुग्णलायातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत होणार आहे. त्याचबरोबर ०६ जानेवारी रोजी दर्पण दिन्नानिमित्तसकाळी १० वाजता मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्वं सामान्य, गोरगरीब नागरिकांच्यापाल्याला, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही, पेन, शॉपनर, खोडरबर पुस्तके वाटप करण्यात येणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे तरी या विविध कार्यक्रमास पत्रकारबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अ.भा. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

      Read More »
    • साबीर अलीशाह खादरी उर्सनिमित्त संदलसह विविध कार्यक्रम उत्साहात.

    • मुखेडमध्ये शौर्य दिनानिमित्त मोटारसायकल रॅली काढून अभिवादन

    • सुफीसंत सय्यद साबीर अलीशाह खादरी यांच्या जयंती,उर्स व संदल निमित्य विविधकार्यक्रमाचे आयोजन

    • भारताचा कोहिनूर हरपला, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

    देश-विदेश

    • देश-विदेश

      भारताचा कोहिनूर हरपला, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

      जगाला भारताची अर्थव्यवस्था खुले करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता  गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 92 वर्षांचेहोते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे तेराज्यसभेचे सदस्य होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले होते. डॉ. सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणित्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचाजवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी 1952 मध्ये पंजाबविद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिजविद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातूनअर्थशास्त्रात डी. फिल केले होते. तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यातआले. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्हबँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवलीहोती.

      Read More »
    • तबला वादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    आर्थिक

    सामाजिक

      सामाजिक
      November 22, 2024

      नांदेड जिल्ह्यात उद्या मतमोजणीलोकसभेसाठी 19 व विधानसभेच्या 165 उमेदवारांचे भविष्य ठरणार

      प्रशासन सज्ज, विद्यापीठाच्या ज्ञानार्जन केंद्रात मतमोजणी किनवट, हदगाव, लोहा तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी पहिली फेरी सकाळी 11…
      सामाजिक
      November 10, 2024

      सैनिक फेडरेशनच्या वतीने पाळ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

      विविध पदावर रूजू झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचाही गौरव. मुखेड/ प्रतिनिधी. तालुक्यातील पाळा येथील दहावी तसेच बारावी बोर्ड परीक्षेसह विविध क्षेत्रात यश…
      सामाजिक
      November 1, 2024

      जिल्ह्यात जमावबंदी,शस्त्रबंदी आदेश  

      नांदेड : नांदेड जिल्ह्यात 3 नोव्हेंबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 17 नोव्हेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी…

      संपादकीय

      Back to top button