सामाजिक

नाशिक नर्सिंग अत्याचार प्रकरण: दोषी प्राचार्याचं रजिस्ट्रेशन व कॉलेजची मान्यता तात्काळ रद्द करण्याची शासनाकडे मागणी

नांदेड प्रतिनिधी :- १ जून २५

नाशिकमधील गणपतराव आकडे खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनींनी प्राचार्या विरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर शिक्षण क्षेत्र हादरून गेलं आहेसंबंधित प्राचार्यावर पोक्सोएट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असूनपोलिसांनी अटक केली आहे.

शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात असे प्रकार होणं म्हणजे विद्यार्थिनींच्या भविष्यातला अंधार आहेहा प्रकार फक्त नाशिकपुरता मर्यादित नाहीसंपूर्ण राज्यातील नर्सिंग शिक्षण संस्थांमध्ये याची चौकशी झाली पाहिजे.

आदी बनसोडे यांनी इंस्टाग्राम , ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावरही आवाज उठवला असूनत्यांचा आवाज राज्यभरात विद्यार्थिनी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे.

या गंभीर प्रकारावर आरोग्य समितीचे आदी बनसोडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असूनत्यांनी शिक्षणआ णि आरोग्य विभागाकडे दोन ठोस मागण्या केल्या आहेत

प्रमुख मागण्या खालील प्रमाणे :

1. दोषी प्राचार्याचे नर्सिंग काउंसिलकडील रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे.

असा व्यक्ती पुन्हा कुठेही शिक्षणवैद्यकीय किंवा विद्यार्थ्यांच्या संपर्कात असू नये. – आदी बनसोडे

2.संबंधित नर्सिंग कॉलेजची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी.

या संस्थेने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे बनसोडे यांनी सांगितले:

हा प्रकार ही अपवादात्मक घटना नाहीही शिक्षण संस्थां मधील एक प्रणालीगत ढिलाई आणि महिलां विषयीची असंवेदन शीलता दर्शवतेसरकारने यामध्ये केवळ कारवाई करून थांबू नये  तर उदाहरण म्हणून दोषींवर कठोर निर्णय घ्यावेत अशी मागणी केली..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button