Sharmik Ekta
-
शहर
मुखेडची जनता वाऱ्यावर; सत्ताधारी नगरसेवकांची ‘देव दर्शन’ टूर मस्त सुरू!
▫️पाणी, रस्ते आणि कचऱ्याच्या समस्यांनी नागरिक त्रस्त; लोकप्रतिनिधी मात्र सहलीत मग्न. मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १० जून २६ शहरात नागरी समस्यांचा डोंगर साचलेला असताना आणि नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करतअसताना, सत्ताधारी नगरसेवक मात्र ‘देव दर्शना‘च्या सहलीत मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून लोकप्रतिनिधींनी सहलीचा आनंद लुटणे, हा मुखेडकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी प्रभागातील नाल्या व रस्त्यांवरील खड्डे अजूनही बुजवले गेलेले नाहीत.…
Read More » -
राजकीय
मविआच्या ‘त्या’ निर्णयामुळे कार्यकर्ते संतप्त, बंडाची ठिणगी मतपेटीतून उमटणार?
▫️१२५ मतं असलेल्या काँग्रेसला डावलून अवघ्या १३ मतांच्या शिवसेना उबाठा ला झुकते माप; कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप. ▫️सव्वाशे मतं असलेल्या काँग्रेस उमेदवाराला ऐनवेळी माघार घेण्याचे आदेश! नांदेड प्रतिनिधी…
Read More » -
शहर
हलाखीवर मात, जिद्दीने मारली बाजी! मुखेडच्या सरफराजला एकाच वेळी दोन सरकारी नोकऱ्यांचे कॉल
▫️हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यात सुखाचे अश्रू; नागपूर कारागृह पोलीस आणि SRPF अशा दोन्ही नोकऱ्यांवर एकाच वेळी मोहर! मुखेड प्रतिनिधी :-…
Read More » -
सामाजिक
वरिष्ठ लिपिक माधव तोटवाड यांच्या मातोश्री व्यंकुबाई तोटवाड यांचे निधन
मुखेड: येथील उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक माधव हणमंतराव तोटवाड यांच्या मातोश्री व्यंकुबाई हणमंतराव तोटवाड यांचे आज रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन…
Read More » -
सामाजिक
रुग्णसेवेचा वसा: ‘आध्या’ रुग्णालयातर्फे क्षयरोग, दमा आणि न्यूमोनियासाठी मोफत तपासणीशिबिराचे आयोजन
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०७ जून २६ मुखेड येथील आध्या डायग्नोस्टिक सेंटरच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त क्षयरोग (टीबी), दमा, न्यूमोनियाव श्वसनविकारांवरील मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर मंगळवार दि. ९ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. आध्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात हैदराबादचे प्रख्यात फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. मन्नेम उपेंद्र कुमार यांची उपस्थिती राहणार असून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरामध्ये एलर्जी दमा, दीर्घकालीन खोकला, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, झोपेत घोरणे, फुफ्फुसांमध्ये पाणी भरणे, श्वसननलिकांचे आजार, टीबी, वारंवार सर्दी–खोकला तसेच धूम्रपान, बीडी, सिगारेट व तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांचे निदान व उपचाराबाबत सल्ला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधे, एक्स–रे व सीटी स्कॅनवर सवलत देण्यात येणार असून ईसीजी व मधुमेह तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. श्रीहरी बुडगेमवार याच्यावतीने करण्यात आले आहे.
Read More » -
क्राईम
मुखेड पालिकेचा माजी मुख्याधिकारी व विद्यमान तहसीलदार विजय चव्हाण लाच घेताना रंगेहात जेरबंद; बीड एसीबीची धडक कारवाई
▫️६ लाख ४० हजारांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ठोकल्या बेड्या! मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६ जालना जिल्ह्यातील वाळू वाहतूकदार आणि उपसा करणाऱ्या व्यावसायिकांकडून दरमहा लाखोरुपयांची ‘मंथली‘ (मासिक हप्ता) उकळणाऱ्या अंबडचे लाचखोर तहसीलदार विजय…
Read More » -
राजकीय
मुखेड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला गती; प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचे ‘४ दिवसीय’ वेळापत्रक जाहीर
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६ राज्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने निर्मित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला आहे. राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार, मुखेडचे तहसीलदार धनंजय राऊत यांनी तालुक्यातील एकूण १०९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या निवडणूक आणि आरक्षण कार्यक्रमात मुखेड तालुक्यातील मुदत संपत आलेल्या १०८ ग्रामपंचायती आणि ‘येवती‘ ग्रामपंचायतीमधून नव्याने स्थापित झालेली ‘रत्नातांडा’ अशी एकूण १०९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाच्या परिपत्रका प्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण…
Read More » -
सामाजिक
मुखेड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला बहुजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दरव–र्षीप्रमाणेयाही वर्षी ६ जून रोजी राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शनिवार सकाळी १०.३० वाजता शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अभूतपूर्व उत्साहात राज्याभिषेक सोहळा साजरा केला. याकार्यक्रमाला राजमुद्रा संघटनेचे युवा तरुन शिवप्रेमी बांधव यांच्या सह जयप्रकाश कानगुले (नगरसेवकप्र ), सदानंद पाटील जाधव, शरद पाटील जाधव, शिवाजी गेदेवाड, नरेश इंगोले.शाम इंगोले ,मनोज इंगोले , कपिल काटेवाडे, बालाजी पा इंगोले सुरज जाधव, योगेश जाधव, विरभद्र स्वामी, विट्टल जामदार, सचिन चिखलीकर, पपु पा पाटोदे, दत्ता गजलवाड, अज्ञान पाशा, वैभव इंगळे, साई भोसले, सोहम भिसे, हराळे मामा, वैभव बोडके, यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मुखेड–कंधार विधानसभा क्षेत्रातील बहुजन बांधवांनी मोलाची साथ दिली. या सोहळ्याने परिसरात राष्ट्राभिमान आणि शिवप्रेमाचे नवे जागरण घडवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजन समितीने केलेअसून, उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत, युवापिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन राजमुद्रा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे..
Read More » -
सामाजिक
नांदेड तालुक्यातील शासकीय डेपो मधील रेतीसाठयाचा १९ जून रोजी जाहिर लिलाव
नांदेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदेड तालुक्यातील शासकीय डेपोमधीलशिल्लक रेतीसाठयाचा जाहिर लिलाव शुक्रवार १९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वा. उपविभागीयअधिकारी कार्यालय, चिखलवाडी परिसर नांदेड येथील कार्यालयाचे सभागृह येथे करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेण्यास इच्छूक व्यक्तींनी ओळखपत्रासह विहीत तारखेस उपस्थित राहावे, असेआवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे. नांदेड तालुक्यातील शासकीय रेती डेपोमधील शिल्लक रेतीसाठा पुढीलप्रमाणे आहे. मौ. रहाटी जुने वाघीता. नांदेड 38 हजार 712 उपलब्ध रेतीसाठा असून हातची किंमत 2 हजार 767 रुपये आहे. याची हातचीकिंमत 10 कोटी 71 लाख 16 हजार 104 रुपये आहे. तर खुपसरवाडी येथे 1 हजार 5 उपलब्ध रेतीसाठाअसून हातची किंमत प्रति ब्रास 2 हजार 767 रुपये आहे. तर 27 लाख 80 हजार 835 रुपये याप्रमाणेआहे. लिलावाच्या अटी व शर्ती महसूल व वनविभागाचा 8 एप्रिल 2025 व 15 जुलै 2025 शासन निर्णया प्रमाणे राहतील. या जाहिर लिलावाच्या अटी व शर्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड वतहसिल कार्यालय, नांदेड या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या आहेत.
Read More » -
सामाजिक
मराठवाडा विभागीय “होलार समाज चिंतन परिषद”मुखेड येथे संपन्न…
▫️राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी अण्णासाहेब जाहीरे जुन्नेकर तर मराठवाडा अध्यक्षपदी प्रा. वैजनाथ सुरनर यांची फेरनिवड…. मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०५ जून…
Read More »