Sharmik Ekta
-
राजकीय
तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर अटक होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर
नागपूर:- दि ०२ ऑगस्ट २५ महाराष्ट्र सरकारनं आणलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून विरोधकांकडून टीका होत असतानाच, राजठाकरेंनीही पनवेलमधील शेकाप मेळाव्यात सरकारला आव्हान दिलं. एकदा अटक करून दाखवाच, असंते म्हणाले होते. त्यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.राज्य सरकारनं विधानसभा अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक आणलं. या विधेयकावरून विरोधकांकडूनटीका होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पनवेलमध्ये बोलताना सरकारवर टीका केली. राज्यसरकारने अर्बन नक्षल कायदा आणला असून, कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हालाअटक करू शकतं. एकदा अटक करू देच, असं आव्हान राज ठाकरेंनी दिलं होतं. त्याला आता मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणाले फडणवीस? हा कायदा त्यांच्यासाठी केलाच नाही. पण तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागत नाहीत, तर तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही, असं फडणवीसम्हणाले. जे लोक कायद्याच्या विरोधात जातील, त्यांच्याकरिता तो कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात कायदानाही. सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे. त्यामुळे मला असं वाटतं जे कमेंट्स आहेत, ते कायदान वाचता केलेल्या कमेंट्स आहेत, असंही उत्तर त्यांनी राज ठाकरेंना दिलं.
Read More » -
शैक्षणिक
व्यंकटेश चौधरी हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अधिकारी सेवापूर्ती कार्यक्रमात डॉ. गोविंद नांदेडे यांचे प्रतिपादन
नांदेड प्रतिनिधी :- दि २ ऑगस्ट २५व्यंकटेश चौधरी हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे गुणवंत शिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे…
Read More » -
सामाजिक
लेंडी कार्यकारी अभियंता यांना निलंबित करा – ॲड. इर्शाद पटेल
मुखेड प्रतिनिधी:- ०१ ऑगस्ट २५महाराष्ट्र व तत्कालीन आंध्र प्रदेश राज्याचा संयुक्त प्रकल्प म्हणून लेंडी प्रधान प्रकल्प ओळखला जातो.मात्र विविध कारणाने…
Read More » -
सामाजिक
शेतकरी व कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुखेड तहसीलवर आंदोलन
▫️शेतकरी व कुरेश काॅन्फ्रन्सने दिले निवेदन मुखेड / प्रतिनिधी ०१ ऑगस्ट २५ शेतकरी व कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायात खंडणीखोर गावगुंड अडथळे निर्माण करीतआहेत. स्वंयघोषित समाजकंटकाकडून होत असलेली अडवणूक व कायदा हातात घेत होणारी लुटमार ताबडतोब बंद करावी. कुरेशी समाजावरील अन्याया विरोधात समाजाने जनावरे खरेदी– विक्री बेमुदत बंद आंदोलन सुरु केले असून विविध मागण्यांसाठी मुखेड येथे शेतकरी बांधव व कुरेश काॅन्फ्रन्स मुखेडच्यावतीने तहसील कार्यालयात गुरुवार (दि.३१) दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळीशासनाकडून मुद्दाम अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकरी, व्यापाऱ्यांच्या विरोधात शासन काम करत आहे. त्याविरुद्ध संघटितपणे लोकशाही मार्गाने लढाउभारण्याचा निर्धार उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात हाफिज अब्दुल गफार,शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर, शेतकरी कार्यकर्ते सुभाष पा.गवते, माजी नगरसेवक नासरखा पठाण,युवा नेते…
Read More » -
राजकीय
डॉ श्रावण रॅपनवाड यांची काँग्रेस प्रदेश महासचिव पदी निवड
मुखेड दि.०१ ऑगस्ट २५सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उपक्रमशील व्यक्ती म्हणून परिचित सामाजिक कार्यकर्ते डॉ श्रावण गोविंदराव रॅपनवाड यांची महाराष्ट्र प्रदेश…
Read More » -
क्राईम
मुखेड महावितरणच्या कार्यालयातून ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविले.
मुखेड प्रतिनिधी:- ३१ जुलै २५ नांदेड : मुखेड महावितरणच्या उपविभाग कार्यालयातून अज्ञात चोरट्याने संगणक व खुले पार्ट असाएकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची घटना घडली आहे मुखेड येथील मोहनावती ढाबा समोर महावितरण चे उपविभाग कार्यालय आहे. २८ ते २९ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्याने या कार्यालयाचे मेन गेटचे कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला. त्याने कार्यालयातील संगणक व खुले पार्ट असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गोटे करीत आहेत.
Read More » -
सामाजिक
श्रीरामे डेंटल हॉस्पिटल तर्फे वसतीगृहातील १२० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
◽️विद्यार्थ्याना मंडळाच्या वतीने टूथब्रश व टूथपेस्टचे मोफत वाटप ◽️छत्रपती गणेश मंडळाचा समाजाभिमुख उपक्रम मुखेड (प्रतिनिधी) – ३० जुलै २५ छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व छत्रपती गणेश मंडळ, दिप नगर मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत दंत तपासणी शिबिरात मुखेड शहरातील शाहिर अण्णा भाऊ साठे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या दलित वर्ग संघ वसतीगृहातील सुमारे १२० ग्रामीण व सामाजिकदृष्ट्या वंचितविद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्य जागृतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. बालाजी वडजे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक मा. प्रकाश चल्लावार, तसेच शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ. पांडुरंग श्रीरामे व डॉ. जावेद शेख हे उपस्थित होते.शिबिरात वसतीगृहात राहणाऱ्या वाडी, वस्त्या वतांड्यांवरील विद्यार्थ्यांची सखोल दंत तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मंडळाच्या वतीने टूथब्रश व टूथपेस्टचे मोफत वाटप करण्यात आले. प्रारंभिक मनोगतात मा. प्रकाश चल्लावार यांनी दंतरोगांचे गांभीर्य व त्यावरील प्रतिबंधक उपायया विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राचार्य वडजे यांनी मंडळाच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करतम्हणाले की, “ही केवळ तपासणी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.” डॉ. पांडुरंग श्रीरामे यांनी विद्यार्थ्यांना तोंड व दातांचे आरोग्य, स्वच्छता आणि विविध आजारांवरील उपाययांची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. काही विद्यार्थ्यांसाठी पुढील उपचारही त्यांनी मोफत करण्याचे आश्वासन दिले.…
Read More » -
Uncategorized
आधार हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणामुळे अपघात; काचाचा दरवाजा फुटला – सुदैवाने कोणतीही दुखापत नाही
नांदेड प्रतिनिधी:- २९ जुलै २५ आधार हॉस्पिटलमध्ये वापरात असलेल्या निर्जंतुकीकरण मशीनमध्ये गंभीर तांत्रिक दोष आढळल्याने अचानक उच्च दाबाची हवा बाहेर…
Read More » -
सामाजिक
कोलंबी मार्ग मुखेड ते नांदेड विना-वाहक विना-थांबा बससेवेस प्रारंभ
मुखेड:- २८ जुलै २५ मुखेड येथून दीड तासांत नांदेडला जाण्यासाठी एसटीच्या मुखेड आगार विभागाने विना–वाहक विना–थांबा बससेवा सुरू केली आहे. नांदेडला जाण्यासाठी प्रवाशांना दररोज तीन बसेस ९ फेरी विना थांबा आणि विना वाहक बससेवा सुरू झाली असून, ही बससेवा मुखेड कोलंबी नांदेड अशी जाणार आहे. प्रवास भाडे १२२ रुपये असून, या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख सुभाष पवार यांनी केले आहे. मुखेड आगारातून १६ जुलैपासून दररोज सकाळी ६:४५, ७:१५ व ७:४५ यावेळेत तीन बसेस विना थांबा आणि विना वाहक जात आहेत. या तिन्ही बसेस प्रत्येकी तीन म्हणजे एकूण ९ फेऱ्या करीत असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक अक्षय वाघमारे यांनी दिली आहे.
Read More » -
शैक्षणिक
जि.प.मुलींचे हायस्कूलमध्ये स्काऊट-गाईडचे तालुकास्तरिय उजळणी वर्ग संपन्न.
मुखेड / प्रतिनिधी.२७.जुलै २५ भारत स्काऊट-गाईड नांदेड द्वारा आयोजित तालुकास्तरीय उजळणी वर्ग कार्यशाळा मुखेड शहरातील पिएमश्री,आदर्श शाळा,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे…
Read More »