Sharmik Ekta

  • सामाजिक

    नांदेड जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजेवर कडक निर्बंध

    विनापरवानगी मुख्यालय सोडल्यास थेट फौजदारी कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे कडक आदेश श्रमिक एकता न्यूज नांदेड :- २४ सप्टेंबर २६…

    Read More »
  • राजकीय

    मुखेड तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक: विविध गटांतून ८ संचालक बिनविरोध!

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २३ सप्टेंबर २६ मुखेड तालुका खरेदी–विक्री संघ मर्यादित, मुखेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६–२०३१ अंतर्गत विविध सहकारी संस्था गटांतून ८ जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी अनिल चव्हाण यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ च्या नियम ३२नुसार या निवडीची अधिकृत घोषणा केली. या निवडणुकीत संबंधित मतदारसंघांत प्रत्येकी एकच अर्ज आल्याने मुखेड सहकारी संस्था गटातून दिगांबर सुभाषराव गोपनर (रा. आखरगा, पो. होनवडज), बेटमोगरा गटातून दत्ता रामचंद्र पाटील (रा. बेटमोगरा), एकलारा गटातून माधवराव तुकाराम वडजे (रा. उंद्री प.दे.), सावरगाव (पि.) गटातून विजयकुमार त्र्यंबकराव मस्केले (रा. सांगवी बेनक), पाळा गटातून आनंदराव हरिश्चंद्र शिंदे (रा. केरूर), राजुरा गटातून अनुराधा गोविंदराव कदम (रा. माकणी), बाऱ्हाळीगटातून व्यंकटराव गोविंदराव उमाटे (रा. बाऱ्हाळी) आणि मुक्रामाबाद सहकारी संस्था गटातून व्यंकटराव तुकाराम वाडीकर (रा. हाळणी) यांची व्यवस्थापन समितीवर अविरोध निवड घोषित करण्यात आली असून, नवनिर्वाचित संचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर; ६६ गावांत महिला राज, राजकीय घडामोडींना वेग

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २३ सप्टेंबर २६  तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार…

    Read More »
  • सामाजिक

    नांदेड जिल्ह्यात तमसा, मुक्रामाबाद आणि इस्लापूर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी

    प्रशासनाचे विकेंद्रीकरण; हदगाव, मुखेड व किनवट तालुक्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवरमिळणार महसूल सेवा श्रमिक एकता न्यूज नांदेड : २२ सप्टेंबर २६ जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरणकरण्यासाठी राज्य शासनाने हदगाव तालुक्यातील तमसा, मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद आणिकिनवट तालुक्यातील इस्लापूर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यास प्रशासकीयमान्यता दिली आहे.  २२ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या तिन्ही तालुक्यांतील महसूल मंडळांचीपुनर्रचना करण्यात आली असून, हदगाव तहसील अंतर्गत ५ तर तमसा अपर तहसील अंतर्गत तमसा, आष्टा व मनाठा ही ३ मंडळे राहतील; मुखेड तहसील अंतर्गत ५ तर मुक्रामाबाद अपर तहसील अंतर्गतमुक्रामाबाद, बाहाळी व अंबुलगा (बु.) ही ३ मंडळे राहतील; तसेच किनवट तहसील अंतर्गत ६ तर इस्लापूरअपर तहसील अंतर्गत इस्लापूर, जलधारा व शिवणी ही ३ मंडळे समाविष्ट करण्यात आली आहेत.  या कार्यालयांसाठी आवश्यक अधिकारी–कर्मचाऱ्यांची पदे भरण्याचे निर्देश देण्यात आले असून, कायमस्वरूपी इमारत होईपर्यंत तात्पुरत्या जागेत कामकाज तातडीने सुरू केले जाणार असल्यानेनागरिकांना मुख्य तालुक्याच्या ठिकाणी न जाता स्थानिक पातळीवरच महसूल सेवा मिळण्याचा मार्गसुकर झाला आहे.

    Read More »
  • क्राईम

    मुखेड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा; चार दुचाकींसह २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांना बेड्या

    ▫️बोंमनाळीत पोलिसांची धडक कारवाई; अंधाराचा फायदा घेऊन साथीदार पसार श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २२ सप्टेंबर २६ मुखेड तालुक्यातील बोंमनाळी नवीन आबादी येथे रस्त्यावर उघडपणे सुरू असलेल्या ‘तिरट‘ नावाच्या जुगारावर मुखेड ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि चार मोटारसायकलींसह एकूण २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला असून तिघांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.…

    Read More »
  • राजकीय

    दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार द्या; केजमध्ये शेकापचा तहसीलवर भव्य बैलगाडी मोर्चा

    करपलेल्या पिकांची होळी करून शासनाचा निषेध; पीकविमा, वीजमाफी आणि चाऱ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले श्रमिक एकता न्यूज नेटवर्क केज/बीड :-…

    Read More »
  • शहर

    खरेदी-विक्री संघाच्या ७ जागांसाठी २३ सप्टेंबरला रणधुमाळी; त्याच दिवशी निकाल

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क:- २१ सप्टेंबर २६ मुखेड तालुका सहकारी खरेदी–विक्री संघ मर्यादितच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडणार आहे. नवा मोंढा येथील संस्थेच्या कार्यालयात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया चालणार असून, मतदानानंतर लगेचच त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.  या निवडणुकीत एकूण ७ जागांसाठी मतदान होत असून, यात वैयक्तिक मतदारसंघ (२ जागा), महिला प्रतिनिधी (२ जागा), अनुसूचित जाती–जमाती (१ जागा), इतर मागासवर्गीय (१ जागा) आणि विमुक्तजाती–भटक्या जमाती (१ जागा) या प्रवर्गांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी वैयक्तिक मतदार संघातील १४६ आणि संबंधित सहकारी संस्था मतदारसंघातील ९५मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठीचोख पोलीस बंदोबस्त आणि सहकार विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी अनिल चव्हाण यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक संपन्न होत आहे.

    Read More »
  • क्राईम

    विष्णूपुरीत बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला; एनडीआरएफ पोहोचण्यापूर्वीच जीवरक्षकांचा शोध

     श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- २१ सप्टेंबर २६ येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा रविवारी दुपारी विष्णूपुरी येथील काळेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एका तरुणाचामृतदेह रविवारी सायंकाळीच सापडला होता, तर बेपत्ता असलेला दुसरा तरुण दीपक सोळंके याचा मृतदेह आज, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शोधण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर तालुक्यातील किनी येथील बजरंग बिरू येडुरे (वय १८) आणि मुखेड तालुक्यातील बाहाळी येथील दीपक मारुती सोळंके (वय १८) हे दोघेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. रविवारी श्री गणेश विसर्जनासाठी काळेश्वर घाट परिसरात आले असताना ते गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही प्रवाहात वाहून गेले आणि बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व जीवरक्षक दलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली होती. रविवारी सायंकाळी उशिरा जीवरक्षक दलाने बजरंग येडुरे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला; मात्र अंधारपडल्याने दीपक सोळंकेचा शोध थांबवावा लागला होता. दीपकच्या शोधासाठी आज, सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच जीवरक्षक पथकाने पुन्हा मोहीम सुरूकेली. तीन–चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतरही मृतदेह न सापडल्याने प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. मात्र, एनडीआरएफची चमू घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच, सकाळी १० वाजेच्या सुमारास स्थानिक जीवरक्षक दलाने दीपकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दीपकचे नातेवाईक रविवारी रात्री पासूनच काळेश्वर घाटावर थांबले होते. त्याचा मृतदेह हाती लागताच कुटुंबीय आणि नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. सकाळी साडेदहा वाजता दीपकचा मृतदेह…

    Read More »
  • क्राईम

    नांदेडमध्ये गणेश विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; गोदावरी पात्रात बुडून दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू

    विसर्जनानंतर पोहण्यासाठी नदीत उतरले असता घडली दुर्घटना;देगलूर व मुखेड तालुक्यांवर शोककळा श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड :- २० सप्टेंबर २६ विष्णूपुरी येथील काळेश्वर मंदिर घाट परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा गोदावरीनदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. मृत तरुण स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारे बजरंग बिरूयेडुरे (वय १८, रा. किनी, ता. देगलूर) आणि दीपक मारुती सोळंके (वय २०, रा. बारहळी, ता. मुखेड) हेदोघे रविवारी दुपारी काळेश्वर घाट येथे गणेश विसर्जनासाठी आले होते. विसर्जन आटोपल्यानंतर दोघेहीनदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे दोघेही खोल पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि जीवरक्षक दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळीधाव घेतली. जीवरक्षकांनी शोधमोहीम राबवून बजरंग येडुरे यांचा मृतदेह बाहेर काढला, तर दीपक सोळंके यांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात बचावकार्य सुरू आहे. गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजणघालणाऱ्या या दुर्दैवी घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Read More »
  • संपादकीय

    आज दैनिक प्रबुद्ध परिवारच्या वर्धापन दिन व पुरस्कार सोहळ्यास मनःपूर्वक सदिच्छा!

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड :- २० सप्टेंबर २६ नांदेड येथून प्रसिद्ध होणारे अग्रगण्य वृत्तपत्र ‘दैनिक प्रबुद्ध परिवार’ हे केवळ एक वृत्तपत्र नसून आंबेडकरी चळवळीचा बुलंद आणि प्रभावी आवाज म्हणून जनमानसात ओळखले जाते. सत्य, न्याय आणि समाजहित या त्रिसूत्रीवर आधारलेली पत्रकारिता करत या दैनिकाने अल्पावधीतच वाचकांच्याहृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. ‘दैनिक प्रबुद्ध परिवार‘ आणि ‘प्रबुद्ध टेम्पल चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड‘ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेला ‘भव्य वर्धापन दिन व पुरस्कार…

    Read More »
Back to top button