Sharmik Ekta

  • राजकीय

    लोहा व कंधार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार

    ▫️चौकशी करण्याची सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांची मागणी लोहा / प्रतिनिधी ०५ जुलै २५ लोहा व कंधार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असूनया थातुरमातुर निकृष्ट व बोगस दर्जाच्या कामाची शासनाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईकरावी अशी मागणी सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी लोहा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केली आहे. पुढे बोलताना सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे म्हणाले की, लोहा व कंधार तालुक्यातील ८२ गावात जिल्हा परिषदेच्या जनजीवन मशिन अंतर्गत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कोट्यवधी रुपयांची मंजूर झाले आहेत त्या कामांचे टेंडर निघून गुतेदाराला वर्क ऑर्डर दिली आहेत. गुतेदारांनी कामेन करता या कामाचे बीले उचलली आहेत पण एक ही काम पुर्ण झाले नाही. नळाच्या थुट्याला पाणीआले नाही मागे लोहा येथील के. के. मंगल कार्यालयात आमदारांच्या उपस्थित पाणी पुरवठ्याचीआढावा बैठक झाली होती. त्या बैठकीत सरपंचाच्या व नागरिकांच्या पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झालीनाहीत अनेक गावात पाणी नाही गुत्तेदार व अभियंत्यांमध्ये मि लीभगत आहे. अशा तक्रारी आल्यानंतर आमदारांनी अभियंत्यांना धारेवर धरले होते कारवाई करण्याची तंबी दिली होती पण पुढे काहीच झालेनाही. पाणी कुठे मुरले कुणाला कळाले नाही. गुतेदारांनी व अभियंत्यांनी आम दारांना मॅनेज केले का? असा सवाल प्रा. मनोहर धोंडे यांनी केला व लोहा व कंधार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी शासनानी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सेवाजनशक्ती पार्टीचे पक्षप्रम ख प्रा मनोहर धोंडे यांनी केली आहे.

    Read More »
  • क्राईम

    बार्टीच्या कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांना १५ हजार रुपयांची लाच घेतांना अटक !

           नांदेड :०५ जुलै २५  येथील जिल्हा समाज कल्याण कार्यालयात कार्यरत असलेल्या बार्टीच्या कंत्राटी जिल्हाप्रकल्प अधिकारी सुजाता मधुकर पोहरे ह्या १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडल्याने त्यांनालगेच अटक करण्यात आली असल्याने सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली. यामुळे समाज कल्याणकार्यालयातील बरेच अधिकारी आणि कर्मचारी फरार झाले होते.          अनुसूचित जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सुजाता पोहरे यांनी नगदी ३० हजार रुपयेमागितले होते. त्या स्वतः अनुसूचित जातीतील असूनही त्यांनी आपल्याच जातीच्या भगिनीला लाचमागितली याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्यावर मोठमोठी भाषणेद्यायची आणि आपल्याच समाज बांधवांचे आर्थिक शोषण करायचे हे कितपत योग्य आहे ? त्यांच्या यादुष्कृत्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांगलेच वाभाडे काढलेत.         लाच स्विकारतांना अटक झाल्यानंतर सुजाता पोहरे यांची व त्यांच्या कार्यालयाची झाडाझडतीघेण्यात आली, त्यावेळी पन्नास हजार रुपये त्यांच्याकडे आढळून आले. यामुळे त्यांच्या पायाखालचीवाळू सरकली. हडको नांदेड येथील त्यांच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली.         गरजू व्यक्तीला हे तीस हजार रुपये लाच म्हणून देणे परवडणारे नव्हते व लाच देण्याची त्यांची ईच्छानव्हती म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून भ्रष्ट सुजाता पोहरेवर कारवाईचीमागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोहरे यांच्या कार्यालयात सापळा रचून खात्रीकरुन घेतली व त्यानुसार अचानक धाड टाकली असता सुजाता पोहरे ह्या आपल्या कार्यालयात खुलेआमपंधरा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पोलिसांच्या हाती लागल्या. अचानक पडलेल्या या धाडीमुळे त्यांचाचेहरामोहराच बदलला. त्यांचा स्वभाव भांडखोर व उद्धटपणाचा असून त्यांच्या असंख्य तक्रारी असल्याचेसमजते.

    Read More »
  • शैक्षणिक

    बोगस शिक्षक भरतीसंदर्भात विशेष चौकशी समिती नेमणार : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

    मुंबई : ०४ जुलै २५ राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य समावेश करुन वेतन अदाकेले जात असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेतामुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्यात आयएएस, आयपीएस, आणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती नेम ली जाईल. तसेच या समितीच्या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरयांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य सुधाकर अडबाले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे, संदीप जोशी, डॉ. परिणयफुके, डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला. राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, शिक्षकांची भरती प्रक्रिया हीनियमाप्रमाणेच होते. त्यास शासन नियम ाप्रमाणेच मान्यता देते. तथापि भरतीमध्ये आर्थिक व्यवहारहोऊन नियमबाह्य भरती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. तसेच असेप्रकरण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवले असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर देखीलकारवाई करण्यात येईल असेही त्यांनी याबाबतच्या उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले

    Read More »
  • क्राईम

    हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून गुटखा जप्त

    अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही नांदेड दि. ४ जुलै २५:- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने…

    Read More »
  • आरोग्य

    नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.

    रुग्णांने मानले टिम यशोदाचे आभार यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद टिमचे सुयश ः सिव्हीटीएस सर्जन डॉ.विशाल खंते नांदेड – प्रतिनिधी नांदेड जिल्हयातील…

    Read More »
  • आरोग्य

    अनिकेत अन्नमवाड या तरूण कर्मचार्‍याचां कार्यालयात र्‍हदयविकारांने मृत्यु

    मुखेड गटविकास अधिकारी रामोड यांचे ते जावाई होते मुखेड प्रतिनिधी:- ०३ जुलै २५ मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथिल अनिकेत गंगाराम…

    Read More »
  • क्राईम

    नांदेडमधील २८ कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही

    ▫️१२ बियाणे, खत, कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द ▫️१४ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित नांदेड प्रतिनिधी:- दि. 2 जुलै २५ खरीप हंगामाच्या…

    Read More »
  • राजकीय

    मुखेड तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींवर महिलाराज; आरक्षण सोडत जाहीर

    ▫️एससी २९, एसटी ७, ओबीसी ३५ तर खुल्या प्रवर्गाला ५८ जागा मुखेड प्रतिनिधी:- ०१ जुलै २५ तालुक्यातील १२९ ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण दि.१ जुलै २०२५ रोजी जाहीर करण्यातआले. ग्रा.पं.सरपंच पदाच्या ६६ जागी महिला तर ६३ जागी पुरुषांसाठी आरक्षण सोडत निघाली आहे. हा ग्रा.पं.सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मुखेड तहसिल कार्यालयात आयोजित करण्यातआला होता. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडून प्राप्त परिपत्रकानुसार मुखेड तालुक्यातील १२९ ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने हे आरक्षण काढण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार राजेश जाधव यांनी दिली.…

    Read More »
  • क्राईम

    देगलूरात नऊ लाखांचा गुटखा जप्त; हिंगोलीतील दोघांवर गुन्हा दाखल

    देगलूर प्रतिनिधी:- १ जुलै २५ तालुक्यातील वझरगा येथे सोमवार, दिनांक ३० जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास देगलूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करत एकूण नऊ लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर तात्काळ कृती करत केली. या कारवाईत शेख साजीद शेख जलाल बागवान (वय ३८) व शेख अख्तर शेख गफार बागवान (दोघेही रा. सदर बाजार, जामा मस्जिद जवळ, हिंगोली) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. हे दोघे पांढऱ्यारंगाच्या स्विफ्ट डिझायर (ΜΗ १२ KN ६०३९) कारमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती देगलूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वझरगा येथे सापळा रचून संबंधित कार अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित माल आढळून आला. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात पुढील वस्तूंचा समावेश आहे: विमल केशरयुक्त पान मसाला १५ पोते…

    Read More »
  • सामाजिक

    कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    ▫️मुखेड काँग्रेसची बांधकाम मंत्र्याकडे तक्रार.     मुखेड प्रतिनिधी:- ०१ जुलै २५ मुखेड शहराच्या चौपदरीकरणाचे काम दीड वर्षापासून रखडले असून कंत्राटदाराने रस्ता खोदूनठेवल्यामुळे अनेक अपघात अनेकांना जीव गमवावे लागत आहे.अशा जोगदंड कन्स्ट्रक्शन कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मुखेड काँग्रेसकडून बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.      मुखेड शहरातून जाणाऱ्या लातूर नरसी राज्य मार्गाचे चौपदरीकरणाचे ३२ कोटी चे काम सुमारे दीडवर्षांपूर्वी पासून चालू झाले आहे.अद्याप पर्यंत काम पूर्ण झाले नसल्याने सदर मार्गावर अनेक गंभीरअपघात होऊन वाहन चालकांना जीव गमवावे लागले आहे.नुकतेच दोन बांधकाम मिस्त्री यांची दुचाकी आणि कारचा गंभीर अपघात होऊन त्यात मृत्यूशी झुंज देत आहेत.त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शिष्ट मंडळप्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार राजेशजाधव यांची भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटलेआहे की सदर रस्त्याचे खोदकाम करून ठेवणाऱ्या जोगदंड कन्स्ट्रक्शन कंपनीवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,तात्काळ सदर रस्ताकाम सुरू करून लवकर पूर्ण करावे अन्यथा काँग्रेसकडुन पुढील जिवित हानी टाळण्यासाठी आणि सदर कंपनीस धडा शिकवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर तीव्र आक्रमक आंदोलन करण्यात येईल.असे निवेदनातून सांगितले आहे,यानिवेदनावर डॉ.श्रावण रॅपनवाड,शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेस शहराध्यक्षजयप्रकाश कानगुले, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर अण्णा  साखरे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इम्रानपठाण,शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,शहर उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड,युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सचिव सुनील पाटील आरगिळे,काँग्रेसचे  तालुकासचिव रामेश्वर पाटील इंगोले,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष एम.आर.गोपनर,अल्पसंख्यांक काँग्रेसता.उपाध्यक्ष शेख मुजीब,इरफान पठाण आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    Read More »
Back to top button