Uncategorized
-
प्रेमसंबंधातून- मुखेड तालुक्यातील तरुणाचा मृत्यू – कर्नाटकमध्ये अमानुषपणे मारहाण
मुखेड प्रतिनिधी:- २६ ऑक्टोबर मुखेड तालुक्यातील गोणेगावचा २१ वर्षीय विष्णूकांत पांचाळ या तरुणाचा प्रेमसंबंधातून जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार मुखेड तालुक्यातील गोणेगांव येथील विष्णुकांत जयराम पांचाळ याचा दि.२१ ऑक्टोबर मंगळवार रोजी कर्नाटकातील औराद जि.बिदर जवळील नागमपल्ली येथे सदरील गावातील गजानन वअशोक व इतर साथीदारांनी संगमत करून बेदम मारहाण केली. दरम्यान दि. २२ ऑक्टोबर रोजी बुधवारी सायंकाळ च्या सुमारास युवकाचा उपचारा दरम्यान हैद्राबाद येथे मृत्यू झाला. दि.२४ ऑक्टोंबर शुक्रवारी दुपारी या युवकाचा अंत्यविधी गोणेगांव येथे करण्यात आले. अधिकची माहिती अशी की , गाणेगाव तालुका मुखेड येथील रहिवाशी युवकाचे कर्नाटक येथील विवाहित महिलेशी मागील दोन वर्षांपासून प्रेम संबंध जुळले होते. सदरील प्रेम संबंध महिलेच्या नातेवाईकांच्या डोळ्यात खटकत होते. याचा वचपा काढण्यासाठी महिलेच्या नातेवाईकांनी या विष्णू पांचाळ मुलालाफोन करून नागमपल्ली येथे बोलून घेतले. त्यावेळी विष्णू सोबत त्याचे दोन मित्रही होते तेथील मंदिरात गेल्यानंतर मंदिरातून बाहेर येतात विष्णूला महिलेच्या नातेवाईकांनी पकडून नेले व मारहाण करण्यास सुरुवात केली हे पाहून विष्णूचे दोन्ही मित्र तेथून पळून निघून आले. विष्णू पांचाळ याचे हात पाय बांधून दोन जणांनी काठ्याने अमानुषपणे मारहाण केली व इतर जणांनी याप्रकरणी मदत केली.सदरील मारहाण करत असताना तेथील गावातील लोकांनी केवळ बघ्याचीच…
Read More » -
मुखेड नगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच उमेदवाराचा महापूर
▫️हौशे नौशे आणि गौशे मळवट भरून तयार, फिक्स नगर सेवकांची प्रजाती वाढली मुखेड /प्रतिनिधी २२ ऑक्टोबर मुखेड नगर पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच अनेक उमेदवारीचा महापूर आला असून नैसर्गिक महापूरा नंतर हे आलेले दुसरे महापूर असल्याचे बोलले जात आहे. या वेळी हौशे नौशे आणि गौशे मळवट भरून तयार असले तरी फिक्स नगर सेवकांची प्रजाती मात्र वाढल्याचे स्पष्ट पहावायास मिळत आहे. निवडणूकिची अधिकृत घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, सोशल मीडियावर उमेदवारी जाहीर करण्याची अक्षरशः झुंबड उडाली असल्याचे पाहावायास मिळत आहे. आपल्या ऐपती (बुद्धी) प्रमाणे सोशल मिडीयचा उपयोग होतं असून अशे कांही उमेदवार आहेत की आपल्या मोबाईल वर सोशल मीडियावर मॅसेजची देवान घेवान जमत नाही म्हणून ते आज कालच्यानवीन पिढीतील मुलांची मदत घेत बॅनर आणि ‘लवकरच भेटू‘ अशा संदेश पाठवून मतदारा पर्यंतपोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी थेट “फिक्स नगरसेवक,फिक्स पुढचा नगराध्यक्ष” असा नारादेत मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मुखेड नगर परिषदेची निवडणूक सुरू झाल्याचेचित्र मात्र स्पष्ट दिसत आहे. या वेळी मुखेड न. पा .चे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीवठरल्याने अनेक पुरुष नेत्यांचे गणित बिघडले आहे, तर महिला कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेची लाटउसळली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या महिला उमेदवारांचा शोध सुरू केला असून, स्थानिकपातळीवर गट– तटांची हालचाल वेगाने सुरू आहे. नगरपरिषदच्या निवडणुका २०१६ साली झाल्याहोत्या नगर परिषदेचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ या वर्षी संपला गेल्या चार वर्षा पासून लोकशाहीसंपूष्टात येऊन येथे नौकरशाही सुरु आहे. चार वर्षात नगर परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरि कांना बऱ्याच अडचणीस तोंड द्यावे लागले. आपले गा–हाने मांडण्यासाठी हक्काचा माणूस नसल्यामुळे जनतेची हेळसांड झाल्याचे पाहावायासमिळाले. अशा पार्श्वभू मीवर निवडणूक प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण जागाझाला आहे. आरक्षणाचा तक्ता जाहीर होताच सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली. काहींनी स्वतःच्या कार्याचा आढावा देणारे फोटो पोस्ट केले, तर काहींनी ‘सेवेसाठी सज्ज‘ असा टॅगलाईनदिला. काही संभाव्य उमेदवारांनी थेट “जनतेचा आशीर्वाद मागतो” अशा घोषणां मुळे सोशल मीडियावरचर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडिया वर प्रचाराचा महापूर असला, तरी मतदारांनी केवळ पोस्टपाहून निर्णय न घेता उमेदवारांची खरी कामगिरी तपासावी, अशी सुजाण नागरिकांची प्रतिक्रिया आहे. प्रशासक राज असताना नागरी प्रश्नांसाठी कोण पुढे सरसावले, कुणी लोकांच्या अडचणी प्रशासनापर्यंतपोहोचवल्या याचाही विचार मतदारांनी करावा, असा सल्ला दिला जात आहे. मुखेड शहराला आज खऱ्याअर्थाने प्रामाणिक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. पक्षीय हितापेक्षा शहराचाविकास, पारदर्शक प्रशा सन आणि लोकसेवा यांना प्राधान्य देणारा उमेदवारच मुखेडचा विकास साधूशकतो. जास्तीत जास्त उमेदवार लोकसेवेच्या हेतूने पुढे येत असतील, तर हे लोक शाहीचे सकारात्मकलक्षण आहे. विकास हेतू मनात ठेवून हे उमेदवार धडपड करत आहेत की मलाई खावून मालदार होण्यासाठीची हि तळमळ बाळगून आहेत हे ओळखण्याची जबाबदारी मतदारांवर आहे.
Read More » -
मतदार यादीवरील हरकतींसाठी आज शेवटचा दिवस
मुखेड प्रतिनिधी:- १७ ऑक्टोबर राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी दिनांक १७ऑक्टोबर पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली असुन आज शेवटची तारीख असल्याची माहिती तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली आहे. मुखेड नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहायप्रारूप मतदार यादी दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावर हरकती व सुचनादाखल करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुद्दत होती. आत्ता ति मुद्दत राज्य निवडणुक आयोगाने १७ ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिली आहे त्यामुळे हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभाग निहाय अंतिममतदार यादी २८ ऑक्टोबर रोजी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तेव्हा नागरिकांनी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना १७ ऑक्टोबर पर्यंत नगर परिषद कार्यालयात सादरकराव्यात असे आवाहन मुखेड नगर पालिकेचे मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी केले आहे.
Read More » -
काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ताकतीने लढवणार-माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर
▫️शेर अगर बूढ़ा हो जाए तो ये मत समझो वो शिकार करना भूल गया :- बेटमोगरेकर मुखेड प्रतिनिधी:- १५ ऑक्टोबर काँग्रेस मित्रपक्ष, वंचित व समविचारींना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक पूर्णताकतीनिशी लढविणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड येथील काँग्रेस आढावा बैठकीत केले. मुखेड शहर व काँग्रेस कमिटी कडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, वोट चोर स्वाक्षरी मोहीम आणि पदवीधर मतदार नोंदणी या विषयावर मोंढ्यातील काँग्रेस पक्ष कार्यालय काँग्रेस भवन मध्ये एक आढावाबैठक आयोजित करण्यात आली होती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ वोट चोरी बद्दलस्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी आ. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरहे होते तर प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड, ज्येष्ठ नेते शिवलिंगराव पाटील कामजळगेकर, तालुकाध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर, शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत अनेक कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन हनुमंतराव पाटील यांनी वोट चोरी, पदवीधर मतदार नोंदणी यासह आगामी काळातील नगरपालिका जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.ते म्हणाले की या सर्व निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष पूर्ण ताकतीने न्याय देण्याची भूमिका बजावेल. येणाऱ्या निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडी सोबत आघाडी होईल याबाबत वरीष्ठ स्थरावर बोलणी चालु असुन मनुवादी भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत रहावे असे आवाहन केले याआढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकरांनी काँग्रेसची भुमिका विशद केली यावेळी कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जि.प.माजीसदस्य प्रकाश उलगुलवाड,दत्तात्रय चौधरी,शिवाजी गायकवाड,बाळासाहेब पुंडे,हौगीराव पाटीलनंदगावकर,वैजनाथ तिपणे,मारोती पाटील मटके,बालाजी वारे,जयप्रकाश कानगुले,रामेश्वर पाटीलइंगोले,बालाजी साबणे,अखिल येवतीकर, केतन मामडे, विशाल गायकवाड, बालाजी वाडेकर,प्रकाश निमलवाड,रमजान सौदागर,माधव हुरजळ,राजु पाटील नागरजांब, इरफान मोमीन,आसद बल्की,संजयपिल्लेवाड,विठ्ठल पंदीलवाड सह शहरातील व ग्रामीण भागातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.
Read More » -
सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने लावली आग; शेतकऱ्यांचं नुकसान
▫️दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी मुखेड प्रतिनिधी:- १५ ऑक्टोबर आधीच शेतकरी अनेक प्रसंगाला सामोरे जात आहे अतिवृष्टीतून कसेबसे बचावलेल्या सोयाबीनच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीने आग लावली शेतकरी शंकरराव शामराव काटकळंबे व हणमंत परमेश्वर काटकळंबे चोंडी येथील राहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन देगलूर तालुक्यातील तडखेल शिवारात आहेत,दोन शेतकऱ्यांची अंदाजे सात ते आठ ब्याग सोयाबीन कापणी करून जमा करून ठेवलेल्या धिगाऱ्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावली, यामुळे या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले, शेतांत राब राब राबून तोंडाला आलेला घास हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या घटनेची माहिती सरपंच प्रतिनिधी आदित्य पा चोंडीकर यांनी तडखेल देगलूर तहसीलदार व तलाठी यांना या घटनेची माहिती दिली.ही घटना दिनांक १३ रोजीं रात्री घडली व १४…
Read More » -
परीट धोबी सेवा मंडळच्या वतीने तहसील समोर केले अर्धनग्न आंदोलन
मुखेड प्रतिनिधी:- ११ ऑक्टोबर महाराष्ट्रातील परीट–धोबी समाजाच्या ज्वलंत मागण्यांसाठी १० ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष योगेश मामीलवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. परीट समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात, यासाठी गठीत करण्यात आलेल्या पुनर्विलोकन समितीने अध्यक्ष डी.एम. भांडे शासनाकडे अहवाल सादर केला होता. मात्र तो केंद्र सरकारकडे न पाठवल्यामुळे समाजात नाराजी आहे. तसेच संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे, या मागणीचाही पुनरुच्चार करण्यात आला. आंदोलना वेळी दत्ता येवले. म.रा.प.धो.से.मं जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड. राजेश विभुते. डे.फो.जिल्हा सचिव. योगेश मामीलवाड. म.रा.प.धो.से.मं तालुका अध्यक्ष . शिवराज भुरे. म.रा.प.धो.से.म.शहर अध्यक्ष. माधवत डखेलकर. नागेश मुखेडकर. संकेत मुखेडकर. गोवीद मुखेडकर. कृष्णा मामीलवाड. भागवत डोंगरे. मनोज मुद्देवाड. चंद्रकांत डाकळे. योगेश डाकळे. उत्तम तेलंग. उलराम तेलंगे. आनंद विभुते. तुकाराम पुसलवाड. ओमकार मुखेडकर. जयराम विभुते. साई डोंगरे. बालाजी मामीलवाड. शिवशंकर मुखेडकर. नागेश मामीलवाड. गणेश डोंगरे. नागेश डोंगरे. लक्ष्मीकांत मुखेडकर. हाणमत मामीलवाड. बालाजी इबितदार. वैभव डोंगरे. रमाकांत हिवराळे. मारोती ईबितदार. नामदेव येवले. गजानन येवले. सह सर्व धोबीसमाज बांधव उपस्थित होते.
Read More » -
मुखेड नगरपरिषदेच्या १० प्रभागातील २० जागांसाठी आरक्षण जाहीर
▫️५ जागा ना.मा.प्र., ३ जागा अनुसूचित जाती, २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित १० जागा खुल्याप्रवर्गासाठी मुखेड : नगरपरिषदेच्या दहा प्रभागातून प्रत्येकी दोन असे वीस नगरसेवक निवडून देण्यासाठीचेनगरसेवक पदाचे आरक्षण उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक अनुप पाटील यांच्या अध्यक्षतेखालीआणि तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव यांच्याप्रमुख उपस्थितीत आज जाहीर करण्यातआले. नगरपरिषदेच्या सभागृहात २० जागांसाठी सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले आहे. ▫️प्रवर्गनिहाय आरक्षण खालील प्रमाणे खुली महिला ४, खुला ६, अनुसूचित जाती महिला २अनुसूचित जाती १, अनुसूचित जमाती महिला १, अनुसूचित जमाती१, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग २, असे एकूण २०जागेसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग क्रमांक १अ मा. प्र.१ब खुला महिलाप्रभाग क्रमांक २अ अनु. जा. महिला २ब खुला, प्रभाग क्रमांक ३अ अनु. जाती ३ब खुला महिला, प्रभागक्रमांक ४अना.मा. प्र. महिला, ४ ब खुला प्रभाग क्रमांक ५अ – अनु.जा. महिला, ५ब खुला प्रभाग क्रमांक६अ अनु. जमा. महिला, ६ब खुला प्रभाग क्रमांक ७अ अनु. जमाती, ७ ब खुला महिला प्रभाग क्रमांक८अ–ना. मा. प्र. महिला, ८ब खुला प्रभाग क्रमांक ९अ ना.मा.प्र.९ब खुला महिला प्रभाग क्रमांक १०अना.मा.प्र. महिला, १०ब–खुला आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत वीस पैकी दहा जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून पाच जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीवठेवण्यात आले आहेत तर ३ जागा अनुसूचित जाती साठी आरक्षित करण्यात आले आहेत. २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. शहरातील एकूण दहा प्रभागातील २० जागांसाठी आरक्षण सोडत करण्यात आली असून प्रत्येक प्रभागातएक जागा खुल्या प्रवर्गासाठी तर एक जागा प्रवर्गनिहाय ना. मा. प्र., अनु. जाती, अनु. जमाती साठीआरक्षित करण्यात आली आहे. आरक्षण सोडती वेळी विविध पक्षांचे व संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More » -
नगराध्यक्ष अन नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर; मुखेड नगराध्यक्षपद खुला महिला प्रवर्गासाठी
मुखेड प्रतिनिधी:- दि.०६ ऑक्टोंबर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण बुधवारी जाहीरकरण्यात आले आहे. नगरविकास विभागाच्या वतीने ही आरक्षण सोडत काढण्यात आली, ज्यात अनेकमहत्त्वपूर्ण शहरांमध्ये महिलांसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षते खाली ही सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरक्षणामुळे अनेक विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांना आता पुढील राजकीय वाटचाल निश्चित करावी लागणार आहे. आरक्षण सोडतीनुसार, नगराध्यक्षपदासाठी विविध प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार आहे. ▫️नगरपंचायतींसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण (३७ जागा): नगरपंचायतींमध्ये सर्वसाधारणमहिलांसाठी खालील जागा आरक्षित झाल्या आहेत: मोहाडी, बार्शी टाकळी, वाशी, नाडगाव, गुहागर, राळेगाव, लाखादूर, वैराग, सोयगाव, महादूला, अनगर, कडेगाव, पेठ, पाटण, औंढा नागनाथ, लाखणी, रेणापूर, नातेपुते, महसला, सडक अर्जुनी, दिडोरी, जळकोट, मेढा, लोणंद, वाडा, देवरुख, लांजा, शिंदखेडा, मंडणगड, तिवसा, वडगाव मावळ, पारशिवणी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताई नगर, बाभुळगाव. ▫️नगरपरिषदांसाठी खुला…
Read More » -
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य पथसंचलन;संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उत्साह
मुखेड प्रतिनिधी :- ०३ ऑक्टोबर मुखेड – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी मुखेड शहरात भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…” या घोषणांनी शहर दुमदुमून गेले. संघाच्या शंभर वर्षांच्या अखंड कार्याचा गौरव अभिमानाने साजरा करण्यासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने शिस्तबद्ध वेशभूषेत या संचलनात सहभागी झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महंत गुरूवर्य विशुद्धानंदजी महाराज, हाळदेकर मठ संस्थान, हाळदा (ता. कंधार) हे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून अॅड. चंद्रकांत मार्तंड पत्की, नांदेड विभाग महाविद्यालयीन प्रमुख यांनी मार्गदर्शन करताना संघाच्या कार्याची परंपरा, राष्ट्रसेवा आणि समाज जागृतीची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. पथसंचलनास सुरुवात आर्य वैश्य मंगल कार्यालयातून करण्यात आली. त्यानंतर श्री बालवीर हनुमानमंदिर, श्री गणाचार्य मठ संस्थान, महादेव मंदिर, जुने पोलीस स्टेशन, डॉ. हेडगेवार चौक, बालाजी मंदिर, तेली पेठ हनुमान मंदिर, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा शहरातील प्रमुख मार्गावरूनहे संचलन पुढे सरकले. ठाम पावले टाकत, घोषणांचा गजर करत स्वयंसेवकांचे संचलन शहरातील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अखेरीस तगलाईन मार्गे…
Read More » -
मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन.
▫️विविध क्षेत्रातिल मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा. मुखेड / प्रतिनिधी. दि ०२ ऑक्टेंबर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नुतन संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विजया दशमी दस–याच्या शुभ मुहूर्तावर बियाणी कॉम्प्लेक्स मुखेड येथे आज दिनांक ०२ आक्टोबंर रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आला असुन सदरील कार्यालयाचे उदघाटन मुखेड–कंधार मतदारसंघाचे आ.डाॅ.तुषार राठोड यांच्या शुभहस्ते होणार आहे. मुखेड तालुक्यातील नागरिकांना वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींची एकाच ठिकाणी भेट व्हावी व संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचा संपर्क व्हावा व त्यांचे प्रश्न वर्तमान पत्राच्या माध्यमातून पूर्ण झाले पाहिजे या उद्देशाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे.या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विजया दशमीच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांची उपस्थिती लाभणार आहे तर उदघाटन आ.डाॅ.तुषार राठोड यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी…
Read More »