सामाजिक
-
मांजरा नदीपात्रातुन दिवस रात्र अवैध रेती उत्खनन; महसूल अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
बिलोली,देगलूर,मुखेड महामार्गवरून होते क्षमते पेक्षा जास्त अवैध रेतीची वाहातुक मुखेड प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रात गेल्या काही महिन्यांपासून अवैध रेतीउत्खनन आणि वाहतुकीचा धंदा खुलेआम सुरू आहे. जेसीबी मशिन्सच्या सहाय्याने रेतीचे अवैध उत्खननआणि क्षमते पेक्षा जास्त रेती वाहतूक सर्रास सुरू आहे बिलोली,देगलूर,मुखेड महामार्ग वरून रात्रीच्याअंधारात व सकाळी पहाटे रेती…
Read More » -
मौजे केरुर येथे शूरवीर छावा…’ छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी
•नियोजित स्मारक स्थळाचे अनावरण मुखेड प्रतिनिधी:- शत्रु देखील मरतांना ज्यांच कौतुक करून गेला असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तालुक्यातील मौजे केरूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराजांच्या प्रतिमेचेपूजन करून नियोजित स्मारक स्थळाचे अनावरण करण्यात आले. दि १४ मे रोजी मौजे केरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गोविंद शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व नियोजित जागेचे अनावरण समस्त केरूर वासियाच्या वतीने करण्यात आले स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून येणाऱ्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजानी अखेरपर्यंत लढा देत स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली लोककल्याणकारी योजनांद्वारे प्रजेचे हित जोपासले. अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे बुद्धी आणि शोर्याचा अदभूत संगम असणाऱ्या एकही युद्धनहरणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर गिरीधर पाटील यांनी प्रकाशझोत टाकला. याप्रसंगी किसन पाटील,गिरीधर पाटील ,गजानन पाटील ,दत्ता पाटील ,महेश पाटील ,दिपक पाटील ,विष्णूशिंदे ,हानमत शिंदे ,सम्रत पाटील ,शेषराव पाटील ,महेश शिंदे ,हनुमंत शिंदे ,वेंकट शिंदे ,राजेश शिंदे,दीपक शिंदे ,दीपक कानडे ,संतोष शिंदे ,ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते
Read More » -
मुखेड तालुक्यात वसूर येथे विज पडून ६५ वर्ष वृद्ध महिलेचा मृत्यू
मुखेड प्रतिनिधी :- १४ मे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे अस्मानी संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. गत दोन दिवसांपासून मुखेड तालुक्यात विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. मुखेड शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. दि १४ मे रोजी मुखेड तालुक्यातील वसुर येथे सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता शेषाबाई कामिन शिंदे…
Read More » -
मिशन उडान; घेतलेला निर्णय आणि केलेली घोषणा पूर्णत्वास नेणारे व्यक्तीमत्व:- अबीनाश कुमार
मिशन उडान अंतर्गत ३ हजार ५०० बेरोजगारांना नियुक्ती पत्र अबीनाश कुमार यांच्या इच्छाशक्तीची राज्यभर चर्चा मिशन उडान नांदेड पॅटर्न देशभर राबविण्याची गरज नांदेड प्रतिनिधी:- विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शना खाली नांदेड चे पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार व अप्पर पोलिस अधिक्षक सुरज सुरव यांच्या सकल्पनेतून जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या मिशन उडान अंतर्गत रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व असे यश मिळाले. नऊ हजार जणांनी नोंदणी केलेल्या या मेळाव्यात देशभरातील नामांकित ९७ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिवसभरया कंपन्यांनी तब्बल ३ हजार ५०२ युवकांना नोकरीचे नियुक्तीपत्र दिले आहे. नियुक्तीपत्र हातात पडताचया बेरोजगार युवकांच्या चेहऱ्यावरील आनंद मावेनासा झाला होता अबीनाश कुमार यांनी नवा इतिहास घडवीला आणि राजकारण्यांना एक प्रकारे धडाच शिकवीला. त्यांनी नांदेड मध्ये जनहितवादी अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आहेत. नांदेडच्या गल्लीबोळातून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करणारे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमारयांनी ‘मिशन उडान‘ च्याअगोदर ‘मिशन फ्लॅश आऊट‘ च्या माध्यमातून भल्याभल्याना धूळ चारली. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आणि सामान्य जनतेला न्यायाचीआशा निर्माण झाली.गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला आळा घालून त्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थाअबाधित ठेवण्याचा नेहमीच कसोशिने प्रयत्न केला. नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि प्रेमाने व विश्वासाने काम करून घेण्याची कार्यपद्धत सर्वांनाचआवडणारी आहे. ३ मे २०२५ रोजी त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कवायत मैदानयेथे ‘मिशन उडान‘ या लक्षवेधी अभियाना अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याउद्देशाने भव्य बेरोजगार मेळावा घेतला.या मेळाव्यात साधारणतः ११ हजार सुशिक्षित बेरोजगारांनारोजगार मिळेल असे नियोजन केले.वेगवेगळ्या नामांकित कंपण्यांना आमंत्रित केले आणि पहिल्यासत्रात ३ हजार ५०० बेरोजगारांना नोकरी मिळाल्याचे नियुक्ती पत्र दिले. नोकरीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूपच आशादायी होता.…
Read More » -
आधी पुनर्वसन मगच लेंडी धरण करा ; अन्यथा धरणग्रस्त घेणार जलसमाधी – राजीव पाटील.
मुखेड / प्रतिनिधी. सन २००६ च्या कायद्यानुसार आधी लेंडी प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करुन मगच धरण करा अन्यथा धरणग्रस्त जलसमाधी घेणार…
Read More » -
जातनिहाय जनगणना हा काँग्रेससह ओबीसींचा विजय – डॉ. श्रावण रॅपनवाड
मुखेड-( ता. प्रतिनिधी) मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुलजी गांधीसह काँग्रेस आणि ओबीसींच्या दबावाचे फलित…
Read More » -
वारकरी संप्रदायाच्या संतामध्ये विद्रोह करण्याचे धाडस बसव विचारात दिसून येते:-प्रा.डॉ. रवींद्र बेंबरे
मुखेड :-शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या करियर कट्टा विभागाच्या वतीने क्रांतीसूर्य , थोर विचारवंत , संत महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत…
Read More » -
पाण्याविना जीवन अशक्य आहे. पण इथे जीवनच पाण्याच्या शोधात भटकतंय
•हंडाभर पाण्यासाठी लोकांची वणवण मग लाखो रुपये गेले कुठं? •जल व्यवस्थापन पंधरवडा प्रत्यक्षात नाही,फक्त कागदावर •जनजीवन चा कोट्यावधी निधी गेला कुठे ? मुखेड -(ता. प्रतिनिधी) दि २४ एप्रिल २५ एका बाजूला उन्हाचे चटके वाढू लागले आहेत तर दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीय. सरकारी योजना फक्त कागदावर असल्याने अनेकांच्या वाट्याला भटकंती आलीय. त्यामुळे सरकार पाण्याच्या टंचाईवर कधी तोडगा काढणार? हा खरा प्रश्न आहे. पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभालव दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तालुक्यातील खेड्यापाड्यात पाण्याची वाणवा जल व्यवस्थापन पंधरवडा उरला फक्त नावालाच हंडाभर पाण्यासाठी लोकांची भटकंती सध्या मुखेड येथे मुखेड पाटबंधारे मंडळाच्या वतीने “जल व्यवस्थापन पंधरवडा” साजरा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी देखील वणवण फिरावी लागत आहे. दुसरीकडे, तलावातील अवैध गाळ उपसा मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील गावागावात व तांडा हा उपक्रम पोहोचवण्याचा विसर पाटबंधारे विभागाला पडल्याचे स्पष्ट होत आहे. पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभाल वदुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.…
Read More » -
सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर व जाकिर भाई बाऱ्हाळीकर यांना समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान
मुखेड : १८ एप्रिल २५ क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले व विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राहुल लोहबंदेमित्रमंडळाच्या वतीने उपेक्षित समाज घटकासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच गौस अली सलगरकर व शेख जाकिरहुसेन बाऱ्हाळीकर यांना समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान करण्यात आले. राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्मारका समोर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. शेख जाकिरसाब व गौसअली सलगरकर यांना मराठवाडा भुषण डॉ. दिलीप पुंडे, तहसिलदार राजेश जाधव, पोलिस निरिक्षकलक्ष्मण केंद्रे, जेष्ठ नेते दशरथराव लोहबंदे, गौतम काळे, आयोजक राहुल लोहबंदे, भा. बौ. महासभा अध्यक्षगंगाधर सोंडारे, समन्वयक रियाज शेख आदींच्या हस्ते स्मृतीचिन्ह पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. तालुक्यात गेल्या चार दशकापासून शेख जाकिरहुसेन बाऱ्हाळीकर यांनी दिशा केंद्र बिलोली, पिसफूल सोसायटी गोवा, दलित फाउंडेशन, यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून समाजसेवा करत आहेत. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री १५ कलमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावीसाठी व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी जनजागृती व आंदोलने केली. तरगौस अली सलगरकर यांनी डाव्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवत तालुक्यातील विविध आंदोलनात सहभाग घेतला. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष तथा सलगरा खु.चे उप सरपंच असताना हजारोंनिराधार, विधवा, कष्टकरी, कामगारांचे प्रश्न सोडले. दोघांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राहुललोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने समाज परिवर्तन पुरस्कार, स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद नांदेड,मुखेड शहरातील व ग्रामपंचायत सलगरा सहअनेक मान्यवरांनी जिल्ह्याभरातून त्यांचे अभिनंदन करीत आहेत.
Read More » -
मुखेड येथील नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द ची मागणी
आज उपोषण चा ५ वा दिवस नांदेड/प्रतिनिधी मुखेड तालुक्यातील शिवप्रसाद नर्सिग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्काची ची मागणी व त्यासंस्थे मध्ये गरीब विद्यार्थ्यांना अरे रावीची भाषा केली जाते. दिव्यांग विद्यार्थीनीना अपमानास्पद वागणूक दिली आहे. म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ३ जन बेमुदत उपोषणला बसले आहेत. आजचा हा उपोषण चा ५ वा…
Read More »