शैक्षणिक

  • संत नामदेव महाराज विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षानंतर भेट

    ▫️चंद्रकांत तेलंगे यांच्या पुढाकारातून स्नेहसंमेलन संपन्न मुखेड प्रतिनिधी:- ०८ जून २५तालुक्यातील संत नामदेव महाराज विद्यालय दापका (राजा) येथील शैक्षणिक वर्ष…

    Read More »
  • विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके

    मुखेड प्रतिनिधी:- ०८ जून २५ मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली तेआठवीपर्यंतच्या २९ हजार ४६६ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. समग्र शिक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या माध्यमातून ही पुस्तके प्राप्त झाली असून, एकूण १ लाख ७४ हजार ९८४ पुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे. पुस्तकांचे वितरण शाळा प्रवेशदिनी होण्यासाठी गटसाधन केंद्र मुखेडमार्फत जोरदार तयारी सुरू आहे. तालुक्यातील १६ केंद्रांवर – मुखेड, ब्राँच मुखेड, हिप्परगा, माकणी, बाराहाळी, डोरनाळी, दापका, गुडोंपत, मुक्रामाबाद, गोजेगाव, अंबुलगा, राजुरा, पाळा, होनवडज, खरबखंडगाव, माऊली व हंगरगा – येथे पुस्तकेपाठवण्यात आली आहेत. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी हामिद दौलताबादी यांच्या मार्गदर्शनाखाली गटसमन्वयक शिवाजीराव येवतीकर, डॉ. शिवाजी कराळे, नागनाथ द्याडे, डी.एम. देवकत्ते, उत्तम चव्हाण आदीअधिकारी आणि सर्व केंद्रप्रमुख, कर्मचारी, कार्यालयीन सहकारी परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळाल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सुरुवात सुरळीत होणार असून, पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

    Read More »
  • आयटीआयच्या स्थानिक सल्लागार सदस्यपदी पत्रकार कोनापूरे,कांबळे व रोडगे यांची नियुक्ती

    मुखेड प्रतिनिधी:- दि ०७.जून २५स्वातंत्र्य सेनानी राजासिंह हरिसिंह चौहाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड (आयटीआय) या संस्थेच्या संस्था व्यवस्थापक समितीच्या…

    Read More »
  • महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरळीत

    मुखेड प्रतिनिधी:- ०१ जून २५येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या उन्हाळी…

    Read More »
  • मुखेड तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदावर हमीद दौलताबादी रुजू

    मुखेड -(ता. प्रतिनिधी) ३० मे २५ मुखेड तालुक्यात तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी होनधरणे कैलास कार्यरत होते. त्यांची बदली किनवट तालुक्यात झाल्याने…

    Read More »
  • जि.प.मुलींचे हायस्कूलचा ९९.४६ टक्के निकाल;सेमी माध्यमचा १०० टक्के.

    •प्रणिताने मिळविले ९८.२० टक्के,९७ टक्केच्या ४ तर ९५ टक्केच्यावर ८ मुलींनी मारली बाजी. मुखेड / प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

    Read More »
  • दहावीच्या परिक्षेत अरमान शेखला मिळाले ९९.०० टक्के गूण

    शाळेत तिसरा क्रमांक पटकाविण्याचा मिळाला मान मुखेड – माध्यमिक शिक्षण मंडळा मुखेड अंतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अरमान अस्लम शेख हिने ९९.००% इतक्याउच्च गुणवत्तेसह घवघवीत यश संपादन केले आहे. अरमानच्या या यशामुळे संपूर्ण शेख कुटुंबासह शाळेचा, शिक्षकांचा आणि गावकऱ्यांचा अभिमान उंचावला आहे. अरमान हा सरकारी वकील अस्लम शेख यांचा चिरंजीव असून तिच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाची वर्षाव होत आहे.  अरमान ने ९९.०० टक्के गुण  मिळविले आहे.यात त्याला मराठी विषयात ९७,हिंदी विषयात ९६, इग्लिंश९६, गणित १००, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९९ व सामाजिकशास्त्रे ९४ गुण मिळाले  तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस ‘द ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल‘ कडून आणि समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. अरमान हा…

    Read More »
  • दहावीच्या परिक्षेत श्रेया वाघमारेला मिळाले ९८.६० टक्के गूण

    मुखेड / प्रतिनिधी.     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल दि.१३ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला.या निकालात मुखेड शहरातील ब्राईटस्टार इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रेया संजय वाघमारे हिने ९८.६० % टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यशसंपादन करीत ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचा यश मिळविला आहे या यशाबद्दल श्रेयाचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.    नुकतच दिनांक १३ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल व विश्व हिंदु परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे याची कन्या श्रेया वाघमारे या विद्यार्थ्यांनीने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ९८.६० टक्के गुण  मिळविले आहे.यात त्याला मराठी विषयात ९७,संस्कृत विषयात ९७, इग्लिंश ९३, गणित १००, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९६ व सामाजिकशास्त्रे ९६ गुणमिळाले आहेत. श्रेयाने या यशाचे सर्व श्रेय शिक्षक, शिक्षिका,आजी,आई,वडील व मार्गदर्शन करणाऱ्या…

    Read More »
  • दहावीच्या परिक्षेत इमरान महेताब शेखने मिळविले ९३.२० टक्के. 

    गुरूदेव विद्यामंदीर माध्यमिक विद्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला . मुखेड / प्रतिनिधी.     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्यापरिक्षेचा निकाल दि.१३ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला.या निकालात मुखेड शहरातील गुरूदेवविद्या मंदिर माध्यमिक विध्यालयाचा विद्यार्थी इमरान महेताब शेख याने ९३.२० टक्के गुण मिळवूननेत्रदीपक यश संपादन करीत गुरूदेव विद्या मंदिर माध्यमिक विध्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमानमिळविला आहे या यशाबद्दल इमरानचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.    नुकतच दिनांक १३ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्याअधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील गुरूदेव विद्यामंदीर विद्यालयाचा विद्यार्थी वराष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष महेताब शेख यांचे चिरंजीव इमरान महेताब शेख याविद्यार्थ्यांने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ९३.२० टक्के गुण  मिळविले आहे.यातत्याला मराठी विषयात ८२,हिंदी विषयात ८७, इग्लिंश ७५, गणित ९४, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९३ वसामाजिकशास्त्रे १०० गुण मिळाले आहेत.इमरानने या यशाचे सर्व श्रेय शिक्षक, शिक्षिका,आजी,आई,वडील व मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच गुरुजणांना दिले आहे.या यशाबद्दल आमदारडाॅ.तुषार राठोड,माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार अविनाश घाटे,माजी आमदारसुभाष साबणे,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड,माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटीलगोजेगावकर,माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, प.स.चे माजी उपसभापती सुभाष पाटील दापकेकर, माजी जि.प.सदस्य संतोष बोनलेवाड, गटविकास अधिकारी सि.एल.रामोड,गटशिक्षण अधिकारी कैलासहोनधरणे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे,माजी नगरसेवक राहुललोहबंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पा.सकनुरकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजु पाटीलरावणगावकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबुराव कदम,भाजपाशहर मंडळ अध्यक्ष नागनाथ लोखंडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गजलवाड,शिक्षण विस्तारअधिकारी डाॅ.शिवाजी कराळे,शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव येवतीकर,शिक्षण विस्तारअधिकारी उत्तम चव्हाण, गुरूदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव गरुडकर,उपाध्यक्ष संजयगरुडकर,कोषाध्यक्ष डाॅ.बालाजी गरुडकर, मुख्याध्यापक बालाजी येवते,राष्ट्रीय अल्पसंख्याकपरिषदेचे मराठवाडा अध्यक्ष  आब्दुल बशीर माजीद, तालुकाध्यक्ष असद बल्खी, डोरनाळीचे सरपंचप्र.हुल्लाजी पाटील शिंदे,उपसरपंच प्र.प्रकाश पा.शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटीलकलबंरकर,राष्ट्रवादीचे जयभिम सोनकांबळे,प्रा.डाॅ.संतोष मंगनाळे,दिलीप चव्हाण,विकासराजुरकर,गजानन ढगे सह सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष,पदाधिकारी व विविध क्षेत्रातीलमान्यवरांनी इमरानचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

    Read More »
  • आज दहावी परीक्षेचा निकाल

    दुपारी १ वाजता अधिकृत संकेत स्थळावर पाहता येणार निकाल मुखेड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज १३ जाहीरहोणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. राज्यमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकालजाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकतालागली होती.  अखेर ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिकशिक्षण मंडळाकडून आज १३ मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १वाजता पाहता येणार आहे. त्यानंतर शिक्षण मंडळाकडून नियोजन केलेल्या कालावधीत आपापल्याशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुळेगुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. फेब्रुवारी–मार्च २०२५ महिन्यातदहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. शिक्षण मंडळाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर केलाजाणार असल्याने विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. येथे पाहा निकाल ?  https:// results.digilocker.gov. in, https://sscresult. mahahsscboard.in, http:// sscresult.mkcl.org, https:// results.targetpublications.

    Read More »
Back to top button