Uncategorized
रेल्वेने १८ किलोमीटर फरफटत नेला मृतदेह इस्लामपूर ते हिमायतनगर लोहमार्गावरील घटना

हिमायतनगर प्रतिनिधी:- ०७ ऑगस्ट २५
धावत्या रेल्वेमध्ये उतरायचा प्रयत्न करत असलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा युवक हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या पुढे धावणाऱ्या गाडीतून खाली पडला आणि मृतदेह तब्बल १८ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला. मिळालेल्या माहितीनुसार, आदिलाबाद येथून निघालेली नंदीग्राम एक्सप्रेस ६ ऑगस्ट रोजी इस्लामपूर स्थानकावर थांबली होती. या वेळी एका अज्ञात युवकाने (वय अंदाजे २० वर्षे) धावत्या गाडीतून उतरायचा प्रयत्न केला. त्यात त्याचा तोल गेला आणि तो ट्रेनखाली गेला. मृतदेह स्थानकाच्या पुढे लोहमार्गावर १८ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाची नोंद हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.



