Uncategorized
५०० रुपयेचा मुद्रांक शुल्क रद्द करून १०० चा मुद्रांक शुल्क कायम ठेवावा

तहसीलदारांकडे शेतकरी कामगार पक्षाची निवेदनाद्वारे मागणी
मुखेड प्रतिनिधी:-
मंत्रिमंडळाने १०० रुपयेचा मुद्रांक शुल्क (बाँड) रद्द करू ५०० रुपयाचा मुद्रांक शुल्क करण्याचा निर्णयसरकारने घेतलेला आहे तो निर्णय रद्द करून १०० रुपयाचा मुद्रांक शुल्क (बॉण्ड) नियमित ठेवावा अशीमागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. शेतकरीआधीच आर्थिक दृष्ट्या संकटातअसताना सरकारच्या या निर्णयामुळे अजून तो आर्थिक दृष्ट्या खचलाजाईल म्हणून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना शेतकरी कामगार पक्षातर्फ निवेदन देण्यात आले. यावेळीशेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. गोविंद डुमणे, अॅड. रामकृष्ण जाधव, अॅड. शंकर बादावाड हजर होते



