Uncategorized

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

नांदेड दि. १९ ऑगस्ट :- मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीझाल्याने रावणगावहसनाळभिंगोलीभासवाडी या गावामध्ये पाणी शिरलेया गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे नुकसान होऊन ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहेअनेक हेक्टर क्षेत्रावरीलशेतीचे नुकसानही झाले आहेया नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त गावातील नागरिकांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईलअशी ग्वाही राज्याचे जलसंपदा (विदर्भताणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीयावेळीमृत्तांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत धनादेश स्वरुपात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तेवितरीत करण्यात आली

आज नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे दौऱ्यावर आलेत्यांनी मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन येथील नागरिकांची भेटघेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्यातसेच मारजवाडी या पुर्नवसीत गावालाही त्यांनी भेट देऊन तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला

याप्रसंगी आमदार डॉतुषार राठोडजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेपोलीस अधिक्षक अबिनाश कुमारअप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरदेगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटीलपरिसरातील शेतकरीनागरिक आदींची उपस्थिती होतीयावेळी आमदार डॉतुषार राठोड यांनी या भागात पूरपरिस्थितीमुळे झालेल्‍या नुकसानीची माहिती मंत्री गिरीश महाजन यांना दिली.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिलेत्यांनीस्थानिक नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्यात्यांच्या या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्या सोडविण्यात येतीलअसे त्यांनी सांगितलेतसेच याभागातील नुकसानग्रस्तांचा रोष जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर असल्याचे कळल्यानंतर याबाबत लवकरच चौकशी करुन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईलअसे मंत्री गिरीशमहाजन यांनी स्पष्ट केले

नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसदारांना यावेळी प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदतधनादेश स्वरुपात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आलामृत्यू झालेल्या व्यक्ती  त्यांचे वारसदार याप्रमाणे आहेतमृत्य व्यक्ती पिराजी म्हैसाजी थोटवे (वय ७०) त्यांचे वारस मारोती पिराजी थोटवे मुलगाचंद्रकला विठ्ठल शिंदे (वय ३५) त्यांचे वारस विठ्ठल व्यंकटराव शिंदे पतीललिताबाई गोविंद भोसले (वय ६०) त्यांचे वारस मुलगा जगदीश गोविंद भोसले  मधुकर गोविंद भोसलेभीमाबाई हिरामण मादाळे (वय ६५) त्यांचे वारस संग्राम हिरामण मादाळेराहुल हिरामण मादाळे मुलेगंगाबाई गंगाराम मादाळे (वय ६५) त्यांचे वारस मुलगी लालाबाई व्यंकट मादाळे यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button