शैक्षणिक

आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास शाळांवर होणार कारवाई; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: श्रमिक एकता न्यूज़ २५ मार्च २६

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTEप्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहेआरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्कपुस्तकेगणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाहीतअसे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने सर्व शाळांना दिले आहेत.

अनेक खासगी शाळा आरटीई अंतर्गत प्रवेश देऊनही पालकांकडे विविध शुल्काची मागणी करत असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्याया पार्श्वभूमीवर सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहेशासनाच्या या आदेशामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असूनत्यांच्या पाल्यांचे शिक्षण आता खऱ्या अर्थाने मोफत होणार आहे.

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या संदर्भात शाळांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेआहेत. “आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे नियमानुसार मोफत शिक्षणास पात्र आहेतजर एखादी शाळा या विद्यार्थ्यांकडून पुस्तकेगणवेश किंवा इतर कोणत्याही साहित्यासाठी पैशांची मागणी करत असेलतर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाच्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाहीज्या शाळा पालकांकडून अनधिकृतपणे पैसे वसूल करतीलत्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्या सोबतच प्रसंगी शाळेची मान्यता रद्द करण्यासारखे पाऊलही उचलले जाऊ शकतेअसे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button