मुखेडमध्ये हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची ४८६ वी जयंती उत्साहात साजरी

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० मे २६
मेवाडचे सुपुत्र आणि अदम्य साहसाचे प्रतीक असलेले हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची ४८६ वी जयंती मुखेड शहरात अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यातआली. दि. ९ मे २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून मुखेड मधील सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अरुणसिंह राजासिंह चौव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक एकतेचा संदेश देत महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित कोंडीबा बेळीकर,जयभीम सोनकांबळे,संजय बनसोडे,किशन पाटील,स्वप्निलसिंह चौव्हाण,शिवा जाधव,संजय मेते,वीर सिंह ठाकुर,अनिकेत बनसोडे,सौरभ बेळगे हे उपस्थित होते
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. “देशाभिमान आणि स्वाभिमानासाठी प्राणपणाने लढणारे महाराणा प्रताप हे केवळ एका समाजाचे नसून संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत,” अशा भावना यावेळी अरुणसिंह राजासिंह चौव्हाण यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी मुखेड परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



