Sharmik Ekta
-
क्राईम
लोहा शहरात बंदी असलेल्या मटका जुगाराचा उच्छाद; लालसेपोटी गरीबांचे संसार उध्वस्त!
▫️मटका किंग माहीत असूनही पोलीस प्रशासन सुस्त का? अवैध धंद्यांवर ‘वरदहस्त’ कोणाचा? लोहा (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १३ जून २६…
Read More » -
राजकीय
Nanded MLC Election: …तर नगरसेवकांना इच्छेविरुद्ध डांबून ठेवलंय? ‘वंचित’च्या उमेदवाराचा गंभीर आरोप; नांदेडच्या राजकारणात खळबळ!
▫️वंचित बहुजन आघाडीची निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे यांच्याकडे धाव नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १३ जून २६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा थरार शिगेला पोहोचला असतानाच, नांदेडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि नांदेड–वाघाळा महापालिकेचे गटनेते इंजि. प्रशांत इंगोले यांनी मतदारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, निवडणूक निरीक्षकांकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यातील अनेक नगरसेवक संशयास्पदरित्या गायब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रचारासाठी नांदेड–वाघाळा मनपा वजिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपरिषदांमधील मतदार नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नकेला. मात्र मोठ्या संख्येने नगरसेवकांचे मोबाईल बंद किंवा ‘नॉट रिचेबल‘ लागत आहेत. प्रत्यक्षभेटीसाठी गेल्यानंतरही ते उपलब्ध झाले नाहीत. लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी सक्रिय सहभाग घेणेअपेक्षित असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती अनेक शंका निर्माण करणारी आहे. मागीलकाही निवडणुकांमध्ये राजकीय दबाव, प्रलोभनाने निवडणुकांवर प्रभाव टाकल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे मतदारांना इच्छेविरुद्ध एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे का, त्यांच्यावर दबाव आहे का, याचीनिष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, असे इंगोले यांनी पत्रात नमूद केले आहे. सदरच्या प्रकाराबाबत यंत्रणांमार्फत तातडीने चौकशी करावी. मतदार नगरसेवकांची सुरक्षितता वमतदानाचे स्वातंत्र्य सुनिश्चित करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पारपाडावी. अशी मागणी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे यांचेकडे इंगोले यांनी केली आहे. निवडणुकीच्या अगदी तोंडावर नगरसेवकांचे ‘नॉट रिचेबल‘ होणे ही प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी बाब ठरत आहे. सर्व मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय आणि दबावा शिवाय मतदान करता येईल, असेभयमुक्त वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान आता निवडणूक आयोगासमोर असणार आहे. यातक्रारीनंतर आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read More » -
क्राईम
अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल
▫️अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीशी गैरवर्तन; मुलीच्या आरडाओरड्यामुळे आरोपी घटनास्थळा वरून फरार. मुखेड : मुखेड तालुक्यातून एक अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक १२ जून रोजी ही धक्कादायक घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोरील अंगणात खेळत होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीनेतिला घरात बोलावले आणि तिच्याशी अत्यंत गैरवर्तन (छेडछाड) करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करताच, पीडित मुलीने घाबरून न जाता तात्काळ आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून कोणीतरी येईल या भीतीने नराधम आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पालकांच्या तक्रारीवरून आरोपी नारायण लक्ष्मण गायकवाड (रा. उमरदरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यातआला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून, पोलीस निरीक्षक चितांबर…
Read More » -
सामाजिक
मुखेड प्रभाग ९ मधील जनता कचऱ्याच्या विळख्यात; तक्रारींकडे प्रशासनाचा कानाडोळा
▫️घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक आजारपणाच्या उंबरठ्यावर मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १२ जून २६ स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करणाऱ्या मुखेड नगरपरिषदेचा खरा चेहरा प्रभाग क्रमांक ९ मध्ये उघडा पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नाल्या कचरा आणि गाळाने तुंबल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. वारंवार तक्रारी करूनही मुख्याधिकारी या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रभाग ९ मधील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती अधिकच भीषण होते. सांडपाणी साचल्याने परिसरात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात राहणेही कठीण झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. येथील त्रस्त नागरिकांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली आहे. “प्रशासनाला आमचा बळीहवा आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. तक्रार करूनही स्वच्छता कर्मचारी प्रभागाकडे फिरकत नाहीत…
Read More » -
सामाजिक
मुखेड येथे पोस्ट ऑफिसची हक्काची इमारत उभारण्याची डॉ.श्रावण रॅपणवाड यांनी केली मागणी
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १२ जून २६मुखेड शहरात अनेक वर्षांपासून पोस्ट ऑफिसची हक्काची जागा पडीक असून,सध्या हे कार्यालय एका…
Read More » -
क्राईम
हिमायतनगर पोलिसांवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप: विकत घेतलेला बैल जप्त करून गोशाळेत पाठवल्याची तक्रार
▫️तक्रार केली तर चालता–फिरता येणार नाही“, पोलिसांकडून बेदम मारहाण आणि धमकी दिल्याचा शेतकऱ्याचा लेखी आरोप; भोकर उपअधीक्षकांकडे न्यायासाठी धाव. हिमायतनगर (प्रतिनिधी): अजीम हिंदुस्तानी १२ जून २६ शेतीकामासाठी कष्टाने खरेदी केलेला बैल पोलिसांनी ‘कत्तलीचा संशय‘ व्यक्त करत जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार हिमायतनगरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पभूधारक शेतकरी शेख जुबेर शेख रज्जाक यांनी भोकर येथील जिल्हा पोलीस उपअधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमकी घटना काय? तक्रारदार शेख जुबेर हे अल्पभूधारक शेतकरी असून ते बटाईने शेती करतात. त्यांच्याकडे आधी पासून…
Read More » -
सामाजिक
जिद्द आणि चिकाटीचे फळ: सरफराज शेख यांना ‘श्रम-साफल्य पुरस्कार’ प्रदान
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ जून २६ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठणाऱ्या युवकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून, नागपूर कारागृह पोलीस आणि SRPF पुणे अशा दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मुखेडचे सुपुत्र सरफराज मुजीब शेख यांचा ‘श्रम-साफल्य पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सरफराज शेख यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर एकाच वेळी दोन महत्त्वपूर्ण परीक्षांत यश मिळवले. त्यांची निवड अखेर SRPF पुणे येथे झाली आहे. त्यांच्या या यशाने मुखेड शहराच्या शिरपेचात मानाचातुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां…
Read More » -
राजकीय
‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल्स… नगरसेवकांची सहल जोरात!
▫️निवडणुकीचा फिव्हर: नेते एकत्र, कार्यकर्ते संभ्रमात मुखेड: “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल्स… सगळं ओक्के मध्ये हाय!” या प्रसिद्ध वाक्याची प्रचिती सध्या नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जशी तापू लागली आहे, तसे राजकीय वातावरण चांगलेच रंगले असून, मुखेड शहरातील बहुतांश नगरसेवक सध्या सहलीवर (टूर) गेल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतील (महायुती) बहुतांश नगरसेवक सहलीवर गेल्याचे समजते. विशेष म्हणजे, जे नेते आणि नगरसेवक स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असतात, तेच आता निवडणुकीच्या निमित्ताने ‘एकाच गाडीत‘ बसून सहलीचा आनंद घेत आहेत. दुसरीकडे, आपल्या नेत्यांना एकत्र पाहून जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा संभ्रमआणि नाराजी पाहायला मिळत आहे. “नेते एकत्र झाले, पण कार्यकर्त्यांत मात्र दुरावाच राहिला,” अशी भावना सध्या मुखेडच्या राजकीय गल्लीबोळांत ऐकायला मिळत आहे. नगरसेवक सहलीवर असताना शहरात मात्र समस्यांचा डोंगर साचला आहे. मुखेड नगर परिषदेला अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळालेला नाही. सध्या देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याकडे मुखेडचा अतिरिक्त पदभार आहे, ज्यामुळे प्रशासकीय निर्णयांना विलंब होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.…
Read More » -
शैक्षणिक
विद्यार्थ्यांची लूट आणि टी.सी. अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करा!
▫️’एसएफआय‘ (SFI) नांदेड जिल्हा कमिटीचे समाज कल्याण विभागाला निवेदन! नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ जून २६ नाव नोंदणी आणि पुढील प्रवेशाचा काळ सुरू असतानाच, जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली जात आहे. दरवर्षी समाज कल्याण विभागा मार्फत मिळणारी शिष्यवृत्ती वेळेवर जमा न झाल्याचे कारण पुढे करत, अनेक महाविद्यालये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची टी.सी. (दाखला) रोखून धरत आहेत. ‘पूर्ण कॉलेज फी भरल्याशिवाय टी.सी. मिळणार नाही‘ अशी बेकायदेशीर भूमिका घेत विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे, तसेच टी.सी. देण्यासाठी बेकायदेशीर पैशांची ( अतिरिक्त शुल्क) उघडपणे मागणी होत आहे. यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचेपुढील शिक्षण धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आज स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीनेमा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नांदेड यांना निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी…
Read More » -
क्राईम
मुखेड तालुक्यातील खैरका येथील युवकाचा खून
▫️उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह सोडून आरोपी पसार मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज १० जून २६ तालुक्यातील खैरका येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात कारणावरून जबर मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. ज्ञानेश्वर नारायण श्रीरामे (वय…
Read More »