Sharmik Ekta

  • राजकीय

    नांदेड स्थानिक प्राधिकारी निवडणूक: ५ उमेदवारांची माघार; आता अमरनाथ राजूरकरांसह ३ उमेदवार निवडणूक रिंगणात!

    ▫️भाजपकडून अमरनाथ राजूरकर तर दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत ▫️अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट; राजकीय घडामोडींना वेग नांदेड प्रतिनिधी…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड तालुका प्रशासनाचा मोठा निर्णय: ५ जूनपासून ‘या’ ६ दाखल्यांसाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल बंधनकारक!

    ▫️शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदार धनंजय राऊत यांचे आदेश ▫️चुकीच्या पद्धतीला चाप; सीएससी आणि सेतू चालकांनाही कडक सूचना मुखेड प्रतिनिधी…

    Read More »
  • सामाजिक

    हिमायतनगरच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षकांकडून नागरिकांच्या ‘मोठ्या’ अपेक्षा!

    ▫️अवैध धंद्यांना चाप लावून सर्वसामान्यांना समान न्याय देण्याचे मोठे आव्हान हिमायतनगर प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़:- अजीम हिंदुस्तानी ०४ जून २६…

    Read More »
  • क्राईम

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई: मुखेडच्या हुतात्मा माधव विद्यालयाचा मुख्याध्यापक ५० हजारांच्या लाचेसह नांदेडमध्ये ताब्यात!

    मुखेड प्रतिनिधी : श्रमिक एकता न्यूज़ ०४ जून २६ शालेय खर्चाचा हप्ता, बदली करून देणे आणि नोटीस न बजावण्यासाठी ५०…

    Read More »
  • राजकीय

    शेतकऱ्यांची घोर फसवणूक! कर्जमाफीच्या शासन आदेशाची होळी करत किसान सभेचा राज्य सरकारवर तीव्र संताप

    ▫️आजवरची सर्वात कडक आणि फसवी कर्जमाफी: कॉ. अर्जुन आडे किनवट प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०३ जून २६ निवडणुकी पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि सत्तेत आल्यावर जाचक…

    Read More »
  • राजकीय

    आझाद मैदानावर कामगारांचा एल्गार! सिटूच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांचे ‘आक्रोश ठिय्या आंदोलन’

    ▫️‘किसान सभा आणि जनवादी महिला संघटनेचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा’ मुंबई,विशेष प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ३ जून २६ मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर आज सिटू च्या नेतृत्वाखाली हजारो फेरीवाले, यंत्रमाग, बिडी आणि औद्योगिक कामगारांनी एकत्र येत ‘आक्रोश ठिय्या आंदोलन‘ केले. १ जूनपासून सुरू झालेल्या या आंदोलनात आज असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांनी प्रचंड संख्येने सहभाग नोंदवला. केंद्र…

    Read More »
  • सामाजिक

    हिमायतनगर नगरपंचायतीचा ‘स्वच्छता’ नावाचा फार्स! नालीतील कचरा ४ दिवसांपासून रस्त्यावरच सडतोय; अर्धा कचरा पुन्हा नालीत!

    ▫️कचरा वेळेवर उचलण्यास प्रशासनाला मिळेना मुहूर्त; बाजाराच्या दिवशीही व्यापारी अन् नागरिकांचीकोंडी, जनतेमध्ये तीव्र संताप! हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी ०३ जून २६ शहरातील वार्ड क्रमांक २ मध्ये नगरपंचायतीच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचा उत्तम नमुना पाहायला मिळत आहे. या वार्डात नाली स्वच्छतेचे काम तर करण्यात आले, मात्र नालीतून बाहेर काढलेला प्लास्टिक कचरा आणि दुर्गंधीयुक्त गाळ गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तसाचपडून आहे. कचरा वेळीच न उचलल्या गेल्यामुळे वाऱ्याने आणि वाहनांच्या वर्दळीमुळे त्यातील अर्ध्याहून अधिक प्लास्टिक कचरा पुन्हा नालीत गेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा नेमका कसला स्वच्छता ‘फार्स‘ सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नियम कडक असतानाही नाली साफ केल्यानंतर तो कचरा त्वरित उचलणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा कचरा अनेक दिवस रस्त्यावरच सडत राहिला. आज बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठी गर्दी होती, तरीही रस्त्यालगत पडून असलेला गाळ व प्लास्टिक कचरा हटविण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखवले नाही. यामुळे व्यापारी, पादचारी आणि ग्राहकांना प्रचंड गैरसोयीचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागला. सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत नाल्या पूर्णपणे मोकळ्या करणे गरजेचे असताना, काढलेला कचरा पुन्हा नालीत जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिल्याच पावसात नाल्या तुंबून पाणी रस्त्यावर आणि दुकानांत शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “जर नालीतील कचरा बाहेर काढून तो पुन्हा नालीतच जाणार असेल, तर अशा दिखाऊ स्वच्छता मोहिमेचा फायदा काय?” असा रोखठोक प्रश्न स्थानिक जनतेने उपस्थित केला आहे.…

    Read More »
  • क्राईम

    मुखेडच्या पोलीस निरीक्षकाच्या अत्याचारा विरोधात आजपासूनआझाद मैदानात ‘आमरण उपोषण’

    ◽️सामान्य जनतेचा अमानुष छळ, वसुली आणि खोट्या गुन्ह्यांचे सत्र थांबवा; भ्रष्ट अधिकारी लक्ष्मण केंद्रेंना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी! मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०३ जून २६ मुखेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय, छळ आणि भ्रष्टाचार याविरोधात आज बुधवार, दिनांक ३ जून २०२६ पासून मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदान येथे आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे. मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण व्यंकटराव…

    Read More »
  • क्राईम

    गॅस सिलिंडर घेऊन घरी परतताना काळाचा घाला; ‘छोटा हत्ती’च्या धडकेत मंग्याळ येथील पित्याचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर!

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ जून २६ मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथील पिता–पुत्रांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना दि. २ जून रोजी घडली आहे. स्वयंपाकाचा गॅस संपल्याने नवीन गॅस सिलिंडर घेण्यासाठी मुखेडकडे आले व सदरील गॅससिलेंडर घेऊन जात असताना दुचाकी व छोटा हत्ती यांचा आमने–सामने झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंग्याळ येथील राहुल श्रावण सोनकांबळे (वय ४०) व त्यांचा मुलगा जितेंद्र राहुल सोनकांबळे (वय १५) हे दोघे मोटरसायकलने स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर घेण्यासाठी मुखेड येथे आले व गॅस सिलेंडर घेऊन गावाकडे जात असताना मुखेड जवळील दबडे शिरूर पाटी परिसरात त्यांच्या दुचाकीला एका छोटा हाती यांची जोरदार धडकबसली. या भीषण अपघातात राहुल सोनकांबळे गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांनातातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंतीत्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मंग्याळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात जखमी झालेला त्यांचा मुलगा जितेंद्र याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, जखमींवर उपचार करताना डॉ. उमाकांत गायकवाड, डॉ. शोभा देवकते, परिचारिका तुळशी नाईक व कदम सिस्टरयांनी तत्पर सेवा बजावली. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. एका कुटुंबाचा आधारवड हरपल्याने मंग्याळ गावावर शोककळा पसरली असून जखमी मुलगालवकर बरा व्हावा यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू…

    Read More »
  • सामाजिक

    नांदेड महापालिकेचा निर्लज्ज कारभार! इस्लाम पुऱ्यात नळातून आले गटारा सारखे पाणी; नागरिकांच्या जिवाशी खेळ!

    ▫️‘दूषित पाणी की विष?’ नागरिकांचा संतप्त सवाल ▫️ऐन उन्हाळ्यात प्रभाग क्र. १८ मध्ये पाण्यासाठी हाहाकार; सैलाब नगर, वाघी रोड भागात भीषणपाणीटंचाईमुळे जनतेत तीव्र संताप! नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०२ जून २६ एकीकडे उन्हाची तीव्र दाहकता आणि दुसरीकडे महापालिकेचा ढिसाळ कारभार! नांदेडच्या इस्लाम पुरा भागात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील नागरिकांच्या नळाला चक्क गटारासारखे काळेकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणी आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. महापालिका प्रशासनाच्या या अत्यंत बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या…

    Read More »
Back to top button