Sharmik Ekta
-
राजकीय
नांदेड: होलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या फलकाचे थाटात अनावरण
▫️सरकारने १० कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल समाज बांधवांकडून कृतज्ञता व्यक्त मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०९ एप्रिल २६ नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होलार समाज आर्थिक…
Read More » -
क्राईम
शासकीय रुग्णालयात पोलिसां देखत तरुणाचा खून; दोन पोलीस निलंबित
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०९ एप्रिल २६ शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक थरारक घटना ४ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात घडली. पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची पोलिसांच्या डोळ्यां देखत हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची गाजपडली आहे. शहरातील ई–स्क्वेअर परिसरात झालेल्या एका वादात सय्यद आवेज (२७) आणि मोहम्मद अरबाज हेदोघे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, आरोपीचा पाठलाग थांबला नव्हता. आपल्या भावाच्या (अरिजीतसिंग) खुनाचा बदला घेण्याच्या ईर्ष्येने पेटलेला राजेश चव्हाण हा हातात तीक्ष्ण शस्त्र घेऊन थेट रुग्णालयात घुसला. रुग्णालयातील अपघात विभागाबाहेर पोलीस तैनात असतानाही, आरोपीने संतापच्या भरात सय्यद…
Read More » -
क्राईम
धक्कादायक: केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन
केज | श्रमिक एकता न्यूज (प्रतिनिधी) ०९ एप्रिल २६ केज तालुक्याचे तरुण आणि कार्यक्षम तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर–अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या एका भीषण कार अपघातात जागीच निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि महसूल विभागात मोठी शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आपल्या खाजगी कारने प्रवास करत होते. लातूर–अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. गाडी वेगात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कारमध्ये ते एकटेच होते, अशी माहिती समोर येत आहे. राकेश गिड्डे यांची केज तालुक्यात एक कार्यक्षम आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे अधिकारी म्हणून ओळख होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनाचे कधीही न भरून निघणारे नुकसान…
Read More » -
क्राईम
हिमायतनगर हादरलं! राजकीय वैमनस्यातून दोन गट भिडले; उमर चौकात ‘रक्तरंजित राडा’
हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या शुक्रवारी झालेल्या गँगवॉरच्या जखमा ताज्या असतानाच, आता हिमायतनगर शहरात भरदिवसा दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. राजकीय वैमनस्य आणि पैशांच्या वादातून झालेल्या या राड्यातचक्क तलवारींचा वापर करण्यात आला असून, यामध्ये ४ जण रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. हिमायतनगरमधील गजबजलेल्या उमर चौकात बुधवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. गेल्याकाही दिवसांपासून दोन गटांमध्ये राजकीय कारणावरून धुसफूस सुरू होती. बुधवारी या वादाचा स्फोट झाला. दोन्ही गट समोरासमोर आले आणि बघता बघता लाठ्या–काठ्यांसह धारदार तलवारी उपसल्या गेल्या. भरबाजारात सुरू असलेल्या या थरारामुळे व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची मोठी पळापळ झाली. विष्णूपुरीत उपचार सुरू…
Read More » -
शहर
संघर्षातून यशाला गवसणी: मुखेडच्या रिक्षाचालकाचा मुलगा आता होणार ‘खाकी’ वर्दीचा मानकरी!
▫️वडील ऑटो रिक्षा चालक तर आई मजुरी करुन चालविते कुंटुबाचा उदरनिर्वाह. मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६ जिद्द,…
Read More » -
क्राईम
लादगा येथे माणुसकीला काळीमा: तहानलेल्या महिलेवर अत्याचार, पीडितेची आत्महत्येने जीवनयात्रा संपवली
मुखेड ( प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६ माणुसकीला लाजवेल अशी एक संतापजनक घटना लादगा (ता. मुखेड) येथे घडली आहे. पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका असहाय्य महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून आरोपीच्या विरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिला आपल्या शेतात काम करत होती. कडक उन्हामुळे तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी शेजारच्या शेतात गेली. मात्र, तेथे असलेल्या रमेश्वर शिवाजी कोंडलवाडे याने तिला एकटे पाहून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या अघोरी कृत्यामुळे पीडितेच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. झालेल्या प्रकारामुळे कमालीच्या मानसिक दडपणाखाली असलेल्या या महिलेने अखेर टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरात गळफास घेण्या पूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. “आरोपीने…
Read More » -
सामाजिक
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर खरबखंडगाव येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचे उपोषण सुटले.
▫️वादग्रस्त जागेवरील बांधकाम थांबवण्याचे आदेश मुखेड : प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ०७ एप्रिल २६ न्यायासाठी लढा देणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्ध माऊलीच्या संयमाला अखेर यश आले आहे. मुखेड तालुक्यातील खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरीबा कांबळे यांच्या मालकीच्या जागेवर गावातीलच काही धनदांडग्यांनी जबरदस्तीने सुरू केलेले बांधकाम प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर थांबवण्यात आले असून, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने मरुबाई सखाराम कांबळे यांनी आपले ८ दिवसीय उपोषण मागे घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सखाराम कांबळे यांची वारसदार पत्नी मरुबाई कांबळे आणि त्यांची सून लक्ष्मीबाई राजाराम कांबळे या आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी काही काळ बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन गावातील शिवाजी एकाळे, परमेश्वर एकाळे आणि यादवराव एकाळे यांनी…
Read More » -
क्राईम
मुंबई ते नरसी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! बिलोली DYSP पथकाचा ‘राज बार’वर छापा; ६ महिलांची सुटका, ४ जणांवर गुन्हा दाखल
नायगाव/नरसी (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६) अनैतिक मानवी व्यापार आणि देहविक्रीच्या काळ्या व्यवसायाला चपराक देण्यासाठी बिलोली विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांच्या (DYSP) विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. नायगाव तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘राज बार अँड हॉटेल’ वर टाकलेल्या छाप्यात चक्क मुंबईहून महिलांना आणून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेआहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक मानवी व्यापारावर आळा घालण्यासाठी बिलोली DYSP च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे…
Read More » -
क्राईम
संसाराचा मांडव विखुरला! निर्दयी पतीने साडीच्या पदराने पत्नीचा गळा आवळून घेतला जीव; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६) मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथे एका निर्दयी पतीने किरकोळ घरगुती वादातून आपल्या पत्नीचा साडीच्या पदराने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पती–पत्नीच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत स्वाती मारुती खांडेकर (वय ३० वर्ष) ही तिचा पती मारुती बाबुराव खांडेकर याच्यासोबत बेडरूममध्ये असताना दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात मारुतीने स्वातीच्या…
Read More » -
क्राईम
नांदेडमध्ये ‘रक्ताची होळी’ सुरूच! ७० तासांत ५ हत्या; गुन्हेगारांसमोर पोलीस हतबल, आता पुढचा बळी कोणाचा?
▫️आज पहाटे श्रीनगरमध्ये सोनू कल्याणकरची निर्घृण हत्या; गुंडांच्या धुमाकूळाने नांदेड हादरले नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६) नांदेड शहरात कायद्याचे राज्य संपून गुंडांची दहशत सुरू झाली आहे की काय? असा संतप्त सवाल आता…
Read More »