Sharmik Ekta
-
सामाजिक
मुखेड तहसीलदाराच्या लेखी अश्वासनाने वयोवृद्ध महिलेचे बेमुदत उपोषण सुटले
▫️मास संघटनेच्या कार्याला अखेर यश मिळाले. मुखेड-प्रतिनिधी:- १६ जानेवारी मुखेड तालुक्यातील मौजे खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरीबा कांबळे यांच्या नावे…
Read More » -
Uncategorized
शेतकरी, शेतमजूर व सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली
▫️डॉ. पुंडे यांना राष्ट्रपतींकडून विशेष निमंत्रण ▫️भारतामधून ११ डॉक्टरांचा विशेष कार्याबद्दल सन्मान ▫️”हा सन्मान माझा एकट्याचा नसून आई–वडील, पत्नी, गुरुजन, कर्मचारी व रुग्णांचा” – डॉ. पुंडे मुखेड प्रतिनिधी:- १६ जानेवारी जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य, मुखेड भुषण डॉ. दिलीपराव पांडुरंग पुंडे यांना दिनांक २६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे राष्ट्रपती भवना मार्फत विशेष निमंत्रण प्राप्त झालेआहे. सदरील निमंत्रण हे रिसेप्शन अॅट होम या कार्यक्रमाचे असून भारतामधून ११ डॉक्टरांना त्यांच्याविशेष कार्याबद्दल निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात नांदेड ज्ह्यिातील मुखेड या ग्रामीण भागात मागील३८ वर्षांपासूनच्या सर्पदंशावरील विशेष कायार्ची दखल घेत राष्ट्रपती भवनामार्फत नदिड येथील मुख्यपोस्टातील वरिष्ठ अधिकारी अरुण गायकवाड, त्यांची टिम व मुखेड पोस्टातील सर्व अधिकारी, कर्मचारीयांनी स्वतः येऊन डॉ.पुंडे व सौ. माला पुंडे यांना निमत्रंण दिले. सदर कार्यक्रम २६ जानेवारी रोजीसायंकाळी चार वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. मागील ३८ वर्षांपासून डॉ. दिलीप पुंडे हे सेवावतीने या भागात आरोग्य सेवा देत आहेत. १९८८ ते १९९७ याकाळात ग्रामीण रुग्णालय मुखेड येथे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले. १९९७ पासून पुंडेहॉस्पिटल मुखेड येथे ते कार्यरत आहेत. आजपर्यंत लाखो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. सर्पदंशाच्या दहा हजारांहून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले. सर्पदंश हा शेतकरी व शेतमजूरयांचा काल मर्यादित अपघात असून वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू संभवतो. मुखेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दिलीप मुंडे म्हणाले, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझेदिवंगत आई–वडील (के. भीमाबाई व कै. पांडुरंगराव पुंडे), सर्व गुरुजन, पत्नी सौ. माला पुंडे, पुढेहॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे हजारो रुग्ण यांचा आहे भारतात दरवर्षी किमान एक लाखाच्यावर मृत्यू सर्पदंशामुळे होतात. २०३० पर्यंत सर्पदंशाचा मृत्यूदर ५०टक्के कमी करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सध्या देशात सर्पदंशाविषयी अनेक उपक्रम कार्यान्वित केले आहेत. शेतकरी, शेतमजूर व सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली याचा मला विशेष आनंद आहे. मी भारताच्या महामहीम राष्ट्रपती, मराष्ट्रपती भवन, महासंचालक आरोग्य सेवा भारत मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांच्या या सन्मानाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे
Read More » -
सामाजिक
मुखेड तहसील कार्यालयासमोर ८० वर्षीय वृद्ध महिलेचे बेमुदत उपोषण
▫️मयत पतीची हडप केलेली जागा परत मिळवून देण्याची मागणी मुखेड-प्रतिनिधी १४ जानेवारीमुखेड तालुक्यातील मौजे खरबखंडगाव येथील श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे…
Read More » -
सामाजिक
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव साजरा
मुखेड प्रतिनिधी:- १३ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा दि. १२ जानेवारी रोजी थाटात साजरा करण्यात आला. संस्कारातून शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची बीज रोवली गेली अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्ञानाचा दीप पेटवून अंधार दूर करणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले, आणि उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असा मंत्र देत तरुणाईला आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व अध्यात्माची दिशा देणारे स्वामी विवेकानंद या तिन्ही महामानवांच्या जयंती एकत्र साजऱ्याकरत त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रध्यापक बालाजी इंगोले सर राजमुद्रा सघटनेचे सचिन पा इंगोले, संभाजी ब्रिगेडचे सदानंद पा जाधव, अ भा छावा सघटनेचे गिरीधर पाशिंदे केरुरकर, शरद पा सचिन चिखलीकर, कपिल काटेवाडे वाडीकर, रोहित भोसले, मनोज इंगोले, वैभवइंगळे, शुभम जाधव, आकाश पा शिदे, गोविंद पा आर्मी, शिवराज पा जाधव, पाटील, दिपक जुने, अंकुश इंगोले, गजानन गोजेवार, आभिजीत घोगुरवार, ज्ञानेश्वर जाधव, राहुर टिकोरे, संदेश जाधव, लक्ष्मण देसाई, राजेश वाघमारे, सोहम भिसे शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.
Read More » -
क्राईम
अवैध उत्खननावर दबंग जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, दि. १२ जानेवारी :- लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैधवाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धडक कारवाई करत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवार ११ जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील मौजे येळी येथे नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूअसल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिलेयांनी रात्री सुमारे १०.३० वाजता प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी नदीपात्रात अवैध उत्खनन सुरू असताना ३ हायवा ट्रक, ७ जेसीबी, १ मोठी फायबर बोट व ४ तराफे आढळून आले. तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना घटनास्थळी बोलावून अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ४५ ब्रास वाळूचासाठा देखील जप्त करण्यात आला असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ कोटी ३२ लाख रुपये इतकीआहे. जप्त केलेला सर्व मुद्देमाल तहसील कार्यालय, लोहा येथे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यावर दंडात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीवर निश्चितच आळा बसण्यास मदतहोईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.
Read More » -
सामाजिक
येवती येथे १० जानेवारी रोजी जंगी कुस्तीचा सामना !
मुखेड ता. प्रतिनिधी ०८ जानेवरी २६ मुखेड तालुक्यातील तिर्थक्षेत्र लघु आळंदी म्हणून ओळखले जाणाऱ्या परम पूज्य श्री सद्गुरू नराशाम महाराज…
Read More » -
सामाजिक
आज बडी दर्गाह उर्स; कंधार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
कंधार प्रतिनिधी:- ०६ जानेवारी २६ हिंदू–मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले प्रसिद्ध सुफीसंत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम सय्यद सईदीद्दीन रफाई (रहे.) यांच्या ७११ व्या उर्साला आज मंगळवारी, दि.६ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या उर्सामध्ये संदल मिरवणूक, कुस्त्यांची दंगल, कव्वालीचा मुकाबला, हास्यकवी संमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आज मंगळवारी, दि.६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नमाज नंतर बडी दर्यातून संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवारी, ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. संध्याकाळी ८ वाजता टी.व्ही. सिंगर बेबीजारा वारसी (दिल्ली)) व टी.व्ही. सिंगर साखीब आली साबरी (उत्तरप्रदेश) यांचा कव्वालीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच मंगळवारी, दि. ६ जानेवारी व बुधवारी, दि.७ जानेवारी रोजी लंगरचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी, दि.८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता कुलहिंद मजाहीया मुशायरा (हास्यकवी संमेलन) आयोजित करण्यात आला आहे. या कवी संमेलनात नामांकित कवी उर्सानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ…
Read More » -
क्राईम
११ कोटी २ लाख किंमतीच्या १९ अवैध गौण खनिजने भरलेल्या गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडल्या
नांदेड (प्रतिनिधी) दि ०५.जानेवारी २५ नांदेड ग्रामीण पोलीसांनी १९ हायवा गाड्या पकडल्या असून त्या हायवांची किंमत ११ कोटी २ लाख ९५ हजार रुपये आहे. या सर्व गाड्या अवैध मुरूम भरलेल्या होत्या. या प्रकरणात १९ नावांसह त्या हायवागाड्यांच्या मालकाचे नाव सुध्दा आरोपी सदरात नमुद करण्यात आले आहे. पोलीस उपअधिक्षक प्रशांतशिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रेखा काळे, पोलीस उपनिरिक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार हरीश मांजरमकर, रामकिशन मोरे, नितीन मुसळे, विनोद पवार, जायभाये, मारोती भंगे, विष्णु कल्याणकर, संतोष पवार आणि वसंत केंद्रे यांनी असर्जन नाका ते भगतसिंघ रोडकडे जाणाऱ्या कौठा येथील रस्त्यावर १९ हायवा गाड्या थांबविल्या. त्यांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. ▫️अशोक लिलैंड कंपनीचे एकूण १० हाथवा ज्याचे पार्सीग क्र. १) MH ४० CD ०६३९, २) MH २६ CN ९९९४, ३) MII ४०…
Read More » -
Uncategorized
क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा काव्य जागर…!
भारतीय महिलांच्या कर्तबगारीचा जेंव्हा जेंव्हा उल्लेख केला जातो तेंव्हा तेंव्हा सावित्रीमाई फुले यांचे नाव अग्रस्थानी घेतल्या जाते. भारतीय इतिहासात ज्यांची सुवर्णाक्षरांनी विशेष नोंद घेतली आहे, अशा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा आज जन्मदिन. सावित्रीमाई फुले आणि स्त्री शिक्षण हे एकाचनाण्याच्या दोन बाजू आहेत. महात्मा जोतीबा फुलेंनी एका बाजूने सामाजिक परिवर्तनाची लढाई लढत असताना दुसऱ्या बाजुला त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीमाई फुले महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावूनस्त्री शिक्षणाची धगधगती क्रांतीकारी मशाल हाती घेऊन आपले ऐतिहासिक कार्य पुढे नेटाने चालविले. जिच्या हातात फक्त पाळण्याची दोरी होती त्या हातात राष्ट्रध्वज फडकविण्याची दोरी येईपर्यंतचा थक्क करणारा प्रवास रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. सावित्रीमाई फुले फक्त स्त्रियांच्या शिक्षणापुरते आपले कार्य मर्यादीत न ठेवता अनेक समाजोपयोगी कार्यात विधायक आणि सृजनात्मक क्षेत्रातही आपली छाप पाडली आहे. सावित्रीमाई फुले यांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे त्या उत्तम प्रकारच्या कवयित्री होत्या. त्यांनी स्त्रियांच्या शैक्षणिक प्रश्नावरकार्य करीत असताना आलेले दाहक अनुभव त्यांच्या काव्य रचनेतून दिसून येते. त्यांनी समाज जागृती करीता काव्य जागरच्या माध्यमातून कार्य करुन एका दृष्टीने वाङ्मय क्षेत्राला देखील खऱ्याअर्थाने अधिक समृद्ध करण्यात आपले उचित असे योगदान दिले आहे. सावित्रीमाई फुले यांनी‘काव्यफुले‘ (1854) आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकार‘ या दोन प्रमुख काव्य संग्रहाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा स्त्री शिक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रबोधनात्मक काव्यांची निर्मिती केली. ज्यामध्ये त्यांनी इंग्रजी आईच्या आगमनाचे स्वागत करीत शुद्र आणि स्त्रीयांच्या मुक्तीसाठी शिक्षणाला अत्यावश्यक मानले आणि ‘ज्ञान हेच खरे धन‘ आहे असे मौलिक विचार त्यांनी तळागाळापर्यंतपोहोचविले. सावित्रीमाईच्या कवितांची काही ठळक वैशिष्ट्ये, त्यांचा विचार जर केला तर असे स्पष्ट जाणवते की, शिक्षणानेच अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि प्रगती साधता येते. ज्ञान हे धन यासारख्या कवितेतून शिक्षणाचे…
Read More » -
सामाजिक
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने महिलेला हरवलेली पिशवी मिळाली
▫️समितीने दाखवून दिले माणुसकीचे आदर्श उदाहरण मुखेड प्रतिनिधी:- ३० डिसेंबर २५ मुखेड–आठवडी बाजारासाठी तालुक्यातील मौजे. कर्णा या गावातून मुखेड शहरामध्ये आलेल्या एकागरीब महिलेची हरवलेली पिशवी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने सुस्थितीत सापडली असून आतमध्ये एक मोबाईल व महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवीचा शोध लाऊन परत मिळाल्यामुळे सदर चिंताग्रस्त महिलेला अत्यानंद झाला. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज सेवा समिती ही शहरातील सर्व धर्म समभाव विचारांचे एक परिवर्तवादी युवा सामाजिक कार्यकर्ते एस.के.बबलू यांच्या अध्यक्षतेखाली गेली अनेक वर्षांपासून सामाजिकसलोखा जोपासून समाजात मानवतावादी विचार पेरण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी तालुक्यातील मौजे. कर्णा येथील एक अतिशय गरीब महिला बाजारकरून गावी परत जाण्यासाठी बसस्थानकात गेली असता तिच्या जवळची मोबाईल सहतहसील व शेतीकामासाठीची महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी चुकून दुसऱ्या व्यक्तीकडे गेली असता शहरातील डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने महिलेच्या हरवलेल्या पिशवीचा शोध घेऊनसदर पिशवी महिलेस सुस्थितीत परत दिल्यामुळे तिचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाजसेवा समितीचे उपाध्यक्ष रौफ मुल्ला, सचिव इस्माईल पठाण, कोषाध्यक्ष अब्दुलसय्यद, असद बल्खी, गौस पठाण, खदिर शेख, सोहेल मुल्ला, अरबाज बागवान, आंतेश्वर कांबळेयांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाजसेवा समितीने सदर गरीबमहिलेची हरवलेली पिशवी शोधून तिच्या स्वाधीन करून समाजाला माणुसकीचे एक आदर्श उदाहरण दाखवून दिले.
Read More »