Sharmik Ekta
-
क्राईम
सावधान ‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालाल, तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार !
◽️यंदा निवडनूकांमुळे थर्टी फर्स्ट जंगी होणार मुखेड (प्रतिनिधी) बल्खी आसद ३० डिसेंबर २५ सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी नांदेड जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर आणि भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांची रवानगी थेट कोठडीत केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. नगरपालिका निवडणुकांचा हंगाम नुकताच संपल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे यंदाचा ‘थर्टी फर्स्ट‘ अधिक जंगी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन शहराच्या चारही कोपऱ्यांवर कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे. विशेषतः हॉटेल, ढाबे आणि शहराबाहेरील रस्त्यांवर गस्त वाढवण्यात येणार आहे.…
Read More » -
राजकीय
हिमायतनगर नगर पंचायत स्विकृत्त नगरसेवक पदासाठी ही तीन नावे सर्वाधिक चर्चेत
▫️एकाच्या घरातून काँग्रेसचा जन्म तर दोन काँग्रेस चे विश्वासू हिमायतनगर प्रतिनिधी:- २९ डिसेंबर गेल्या काही दिवसांपूर्वी हिमायतनगर नगर पंचायत ची…
Read More » -
राजकीय
मुखेडमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आक्रोश मोर्चा
मुखेड प्रतिनिधी:- २८ डिसेंबर बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंगदल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुरुवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार वाजतामुखेड शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वीरभद्र मंदिर येथून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्यासंख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान मुखेड बस स्थानक चौकात बांगलादेशविरोधी निषेध व्यक्त करत प्रतीकात्मक स्वरूपातबांगलादेशच्या पंतप्रधानाचा पुतळा जाळण्यात आला तसेच घोषणाबाजी करण्यात आली. उपस्थितांनीबांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबवावेत, तेथील हिंदू समाजाला संरक्षण मिळावे, अशीठाम मागणी केली. यानंतर मोर्चा मुखेड तहसील कार्यालयात पोहोचला. तेथे आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनसादर केले. या निवेदनात बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची गंभीर दखल केंद्रसरकारने घ्यावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करून हिंदूंच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षणसुनिश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चादरम्यान “बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार बंद करा”, “हिंदू सुरक्षित राहावेत” अशा घोषणादेण्यात आल्या. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. कार्यक्रमाच्या ठिकाणी कायदा–सुव्यवस्था अबाधितराहावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती व पोलिस बंदोबस्त ठेवण्यातआला होता. या आक्रोश मोर्चात शहर व तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Read More » -
सामाजिक
मुखेडच्या पोस्टात अपुरे मनुष्यबळ; कामाचा ताण वाढला ; विलंब सेवेमुळे नागरिकांची गैरसोय
▫️२ टपाल सेवकांवर शहराचा भार, किमान ४ सेवक आवश्यक मुखेडः प्रतिनिधी 28 डिसेंबर मुखेड शहराची झपाट्याने बाढत चाललेली लोकसंख्या, विस्तारणाऱ्या वसाहती आणि वाढती व्यापारी उलाढाल लक्षात घेता येथील डाकघरात किमान चार टपाल सेवकांची आवश्यकता असताना सध्या केवळ दोनच टपाल सेवक कार्यरत आहेत. त्यामुळे टपाल वाटप, पार्सल वितरण तसेच आर्थिक व्यव– हारांवर मोठा ताण येत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. मुखेड डाक घरासाठी तातडीने दोन नवीन टपाल सेवकांची नियुक्ती करावी व कार्यालयात अपुरे असलेले मनुष्यबळ भरती करुन पूर्ण करण्याचीमागणी ग्राहक व सुज्ञ नागरिकांतुन होत आहे. मुखेड डाकघरा मार्फत दररोज सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार होतात. सक ाळी आठवाजल्यापासून ग्राहकांसाठी पैसे काढण्याची व इतर आर्थिक सेवांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या कामासाठी सध्या ग्रामीण टपाल सेवकांची मदत घेतली जाते. मात्र नवीन टपाल सेवकांची नियुक्तीझाल्यास ते आर्थिक व्यवहारांमध्ये मदत करू शकतील आणि ग्रामीण टपाल सेवकांना त्यांच्या मूळजबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडता येतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सध्या ऑनलाइन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या खासगी कंपन्याजलद पार्सल वितरण करत असताना डाक घरातून येणारी पार्सलही वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन टपाल सेवकांसमोर उभे आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे टपाल सेवकांना प्रचंड धावपळकरावी लागत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढून सेवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याने येथीलटपाल कार्यालयात कर्मचारी वाढविण्याची नितांत गरज असल्याचे ग्राहकांतून बोलेले जात आहे. मुखेड शहराची व्याप्ती सुमारे दोन किलो मीटर परिसरात पसरलेली आहे.या परिसरात शाळा, महाविद्यालये, प् प्रशासकीय कार्यालये, बँका, वाढीव वस्ती तसेचअसंख्य व्यापारी प्रतिष्ठाने एकूणच मुखेड शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता डाकघरात तातडीने दोनअतिरिक्त टपाल सेवकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. यामुळे टपाल व पार्सल वितरण वेळेतहोईल, आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता संबधितविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष घालुन टपाल सेवक व अपु–याकर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
Read More » -
सामाजिक
मुखेड नगरपरिषद छाननीत शिवसेना (शिंदे गट) उमीदवारांचे अर्ज राखीव
▫️6 वाजता निर्णय न झाल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांत नाराजी ▫️साडेआठ वाजता घेतलेला निर्णय फलकावर लावला ▫️निर्णयात उशीर; उमीदवारांचा तीव्र असंतोष — अखेर सर्व उमेदवार पात्र मुखेड प्रतिनिधी:- १९ नोव्हेंबर मुखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान मंगळवारी मोठी हालचाल पाहायला मिळाली. शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जांवर भाजपाकडून आक्षेप नोंदवल्यानंतर छाननी अधिकाऱ्यांनी हे सर्व अर्ज राखीव ठेवले. छाननी दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले होते की“संध्याकाळी सहा वाजता निर्णय दिला जाईल. ठरलेल्या ६ वाजेच्या वेळेला कोणताही निर्णय न झाल्याने उमीदवार व कार्यकर्त्यांमध्येअसंतोष,संभ्रम,तणाव असे वातावरण निर्माण झाले. छाननीच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थितकरण्यात आले. संध्याकाळपासून झालेल्या प्रतिक्षेनंतर रात्री साडेआठ वाजता छाननी समितीने तांत्रिक तपासणी पूर्णकरून निर्णय अंतिम केला. त्यानंतर हा निर्णय थेट निवडणूक कार्यालयातील फलकावर लावण्यात आला. यामध्ये सर्व शिवसेना (शिंदे गट) उमेदवार पात्र ठरल्याची नोंद करण्यात आली. निर्णयात झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या नाराजीचे वातावरण अखेर निर्णय जाहीर होताच उत्साहात बदलले. उमेदवारांची प्रतिक्रिया “सहा वाजता निर्णय देणार सांगूनही उशीर झाला, त्यामुळे प्रक्रियेबाबत शंकानिर्माण झाली होती.” दिवसभर चर्चांना उधाण भाजपाने नोंदवलेले आक्षेप ,निर्णयातील विलंब ,कार्यालयातील वाढलेली गर्दी…
Read More » -
राजकीय
मुखेड नगराध्यक्ष पदासाठी १२ तर १० प्रभागातील २० नगरसेवक पदांसाठी तब्बल १२२ अर्ज दाखल
मुखेड प्रतिनिधी:- १८ नोव्हेंबर मुखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवसहोता. दहा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अर्ज दाखल प्रक्रियेत आज दुपारी तीन वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी १२ तर १० प्रभागातील २० नगरसेवक पदांसाठी तब्बल १२२ अर्ज दाखल झाले. तहसील येथे अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होती भाजपातर्फे विजया रामराव पत्तेवार यांनी नगराध्यक्ष पदाचाअर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या डॉ. दिपाली श्रावण रॅपणवाड, तर शिवसेना (शिंदे गट) कडून विजयाधोंडूराम देबडवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. नगरसेवक पदासाठी तब्बल १२२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत तीव्र स्पर्धेचे संकेतमिळत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर असून त्यानंतरच नगरपरिषदेच्यानिवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रशासनावरही लक्षवेधी ताण निर्माण झाला. प्रचंडअर्जामुळे प्रशासनाची दमछाक झाल्याचेही चित्र दिसून आले. दरम्यान, शेवटच्या दिवशी मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रशासनावरही लक्षवेधी ताण निर्माण झाला. प्रचंड अर्जामुळेप्रशासनाची दमछाक झाल्याचेही चित्र दिसून आले.
Read More » -
क्राईम
संतापजनक! ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे लैंगिक अत्याचार, मुखेड हादरलं
नांदेड प्रतिनिधी:- ८ नोव्हेंबर २५ मुखेड शहरा मध्ये एका ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या संशयिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देगलूरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी दिली. सविस्तर माहिती अशी की ,खंडोबा गल्लीत आपल्या अजीकडे राहणारी अल्पवयीन मुलगी ट्युशनवरुन घरी परतत होती. त्यावेळी नारलावार गल्लीत राहणारा २२ वर्षीय आरोपी ओंकार डाकुरवार हा तरुण तेथे उपस्थित होता. आरोपीत्याच्या बांधकाम सुरु असलेल्या घरात मुलीला घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार डाकूरवार याला पोलीसांनी तातडीने अटक केली. पीडित बालिका खाजगी क्लासेसवरुन घरी जात असताना आरोपी ओमकार डाकुरवार याने तिला बळजबरीने उचलून बांधकाम सूरू असलेल्या घरी नेले. तिथे या चिमुकलीवर अत्याचार केले. दरम्यान याघटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मुखेड पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला. यावेळी ठाण्यात नागरिकानी ठिय्या केला. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, आरोपीला…
Read More » -
सामाजिक
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे
▫️निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांचे आवाहन मुखेड प्रतिनिधी:- ०७ नोव्हेंबर नगर परिषद निवडणूकीची आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीहीआदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुखेड नगरपरिषद निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी केले आहे. मुखेड नगर परिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगर परिषदनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून नगर परिषद क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव पुढे म्हणाले की, मुखेड नगरपरिषद मतदार यादीत ४२९ दुबार नावे असलेले मतदार असून त्यांना ओळखण्यासाठी दोन स्टार देण्यात आले आहेत. अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करावे लागणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. निवडणूक प्रक्रिया निपःक्ष व निर्भयपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषद क्षेत्रात १९ विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मुखेड नगरपरिषदे मध्ये एकूण दहा प्रभागात २५ हजार ६५६ मतदार असून यापैकी १२८११ पुरुष तर १२८४४ स्त्री…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर
मुंबई:- ०४ नोव्हेंबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलीआहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकी संदर्भात कोणतीही घोषणा करण्यातआलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायती संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्रअसलेल्या २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातूनएकूण ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या २४६ नगर परिषदांमध्येनिवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. तर दुसरीकडे ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात १५ नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून १०५ नगरपंचायतीची मुदत संपलेली नाहीये. राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल, त्यानंतर२५ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशीघोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे, याला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दुबारतिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत. निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाईकरता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो, असं निवडणूक…
Read More » -
क्राईम
नांदेडमध्ये जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या;पावडेवाडी परिसरात खळबळ
▫️दोन संशयित भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले नांदेड प्रतिनिधी:- ०३ नोव्हेंबर शहरालगतच्या पावडेवाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी दोन संशयित भावांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव रितेश पावडे असे असून, वर्षभरापूर्वी झालेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शनिवारी मध्यरात्री रितेश हा मित्रांसोबत जेवण करून घरी परतत असताना त्याचा काही व्यक्तींशी वाद झाला. या वादादरम्यान धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंजने, आणि पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत्यूपूर्वी रितेशने काही व्यक्तींची नावं सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी केशव पावडे आणि दिगंबर पावडेया दोघांना ताब्यात घेतले आहे. या हत्येमागे आणखी कोणी…
Read More »