Sharmik Ekta
-
सामाजिक
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे
▫️निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांचे आवाहन मुखेड प्रतिनिधी:- ०७ नोव्हेंबर नगर परिषद निवडणूकीची आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीहीआदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुखेड नगरपरिषद निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी केले आहे. मुखेड नगर परिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगर परिषदनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून नगर परिषद क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव पुढे म्हणाले की, मुखेड नगरपरिषद मतदार यादीत ४२९ दुबार नावे असलेले मतदार असून त्यांना ओळखण्यासाठी दोन स्टार देण्यात आले आहेत. अशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करावे लागणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. निवडणूक प्रक्रिया निपःक्ष व निर्भयपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषद क्षेत्रात १९ विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मुखेड नगरपरिषदे मध्ये एकूण दहा प्रभागात २५ हजार ६५६ मतदार असून यापैकी १२८११ पुरुष तर १२८४४ स्त्री…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर
मुंबई:- ०४ नोव्हेंबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलीआहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकी संदर्भात कोणतीही घोषणा करण्यातआलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायती संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्रअसलेल्या २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातूनएकूण ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या २४६ नगर परिषदांमध्येनिवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. तर दुसरीकडे ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात १५ नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून १०५ नगरपंचायतीची मुदत संपलेली नाहीये. राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल, त्यानंतर२५ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशीघोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे, याला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दुबारतिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत. निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाईकरता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो, असं निवडणूक…
Read More » -
क्राईम
नांदेडमध्ये जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या;पावडेवाडी परिसरात खळबळ
▫️दोन संशयित भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले नांदेड प्रतिनिधी:- ०३ नोव्हेंबर शहरालगतच्या पावडेवाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी दोन संशयित भावांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव रितेश पावडे असे असून, वर्षभरापूर्वी झालेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शनिवारी मध्यरात्री रितेश हा मित्रांसोबत जेवण करून घरी परतत असताना त्याचा काही व्यक्तींशी वाद झाला. या वादादरम्यान धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंजने, आणि पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत्यूपूर्वी रितेशने काही व्यक्तींची नावं सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी केशव पावडे आणि दिगंबर पावडेया दोघांना ताब्यात घेतले आहे. या हत्येमागे आणखी कोणी…
Read More » -
सामाजिक
रयत रुग्णालयाचा नवा उपक्रम – कमी दरात गुडघ्यांच्या ऑपरेशनची सेवा सुरू!
▫️प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि महात्मा आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना मोठा दिलासा नांदेड प्रतिनिधी:- ०२ नोव्हेंबर सर्व सामान्य माणसाला आर्थिक भार न येता उपचार घेता यावेत, या हेतूने रुग्णालयाने गुडघ्यांच्या ऑपरेशनसाठी कमी दरांची योजना राबविली आहे. जनसेवेत अग्रणी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत असलेले रयत रुग्णालय पुन्हा एकदा लोकसेवेचा नवा अध्याय लिहित आहे. अनेक वर्षांपासून कमी दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा देत असलेलेहे रुग्णालय आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे – गुडघ्यांच्या ऑपरेशनची सेवा आता अतिशय परवडणाऱ्या दरात सुरू होत आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर अत्याधुनिक ICU विभाग आणि प्रशस्त ऑपरेशन हॉल तयारकरण्यात आला आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांच्या मदतीने रुग्णांना आता जागतिक दर्जाची सुविधा मिळणार आहे. उपचारात सवलत – जनतेसाठी आरोग्यदायी निर्णय सामान्य माणसाला आर्थिक भार न येता उपचार घेता यावेत, या हेतूने रुग्णालयाने गुडघ्यांच्या ऑपरेशनसाठी कमी दरांची योजना राबविली आहे.याशिवाय रुग्णांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनाअंतर्गत सवलतींचा लाभ मिळणार आहे. समाजसेवेची नवी दिशा रुग्णालयाच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की, “रयत रुग्णालयाचे ध्येय केवळ उपचार देणे नाही, तर प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर आरोग्याचे आणि समाधानाचे हास्य आणणे आहे.” उपलब्ध सेवा गुडघे प्रत्यारोपण व ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया ICU सुविधा अनुभवी डॉक्टर व तज्ञ सर्जनप्रधानमंत्री आणि महात्मा आरोग्य योजनेंतर्गत मोफत/सवलतीत उपचार…
Read More » -
राजकीय
एकलारा गणातून सौ.कोमल गजानन त्यांगमपुरे चोंडीकर निवडणूक लढविण्यास इच्छुक.
मुखेड / प्रतिनिधी.१ नोव्हेंबर मुखेड-कंधार मतदारसंघाचे आ.डॉ.तुषार राठोड यांनी संधी दिल्यास एकलारा पंचायत समिती गणातुन माझी पत्नी सौ. कोमल गजानन…
Read More » -
राजकीय
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र शेतमजूर युनियनचा पाठिंबा
मुखेड प्रतिनिधी:- ०१ नोव्हेंबर नागपूर येथे सुरू असलेल्या, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व इतर २१ मागण्यांसाठीच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी दडपशाही करीत शेतमजूर–शेतकऱ्यांचे नेते कॉ. राजू हटवार व भीमराव गोंडाणे यांना दि.३० आक्टोबर रोजी पहाटे बेकायदा अटक करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ मुखेड तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांना महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीणमजूर युनियन (लाल बावटा) च्या जिल्हा जिल्हा समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. कर्जमुक्ती व इतर मागण्या मान्य केल्या नाही तर ग्रामीण भागात आंदोलन तीव्र करण्याचा इशा रा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनकत्यांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, नागपूर येथे विविधअखिल भारतीय किसान सभा तथा विविध शेतकरी संघटना कर्जमाफी व इतर मागण्यासाठी दोन दिवसापासून आंदोलन करीत आहेत. दि.३० आक्टोबर रोजी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतमजूर युनियनचे राज्य कमिटी सदस्य व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नागपूरजिल्हा सचिव कॉम्रेड राजू हटवार यांना गुरूवारी पहाटे तीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकरी शेतमजुरांच्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने ताब्यात घेणे हे लोकशाहीविरोधी कृत्य आहे. एकीकडे गुंड गुन्हेगार मोक ाट सुटलेले असताना श्रमिक वर्गास आंदोलनातउतरवतील या भीतीपोटी कष्टकरी वगार्चे प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन श्रमिकांचा आवाज दडपता येणार नाही. या बेकायदा अटकेचा हृमहाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन(लाल बावटा) ह्व ची राज्य कमिटी तीव्र निषेध करत आहे. अटक झालेल्या ग्रामीण मजूर नेत्यांची तत्काळ सुटका करावी. त्याचबरोबर नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफी व इतर प्रश्नांवरील आंदोलनाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल याचीगंभीर नोंद घ्यावी असा गंभीर इशारा महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा) च्यापदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. अंकुश अंबुलगेकर, कॉ. मंजुश्री कबाडे, कॉ. अमीर कुरेशी यांच्या सह्या आहेत.
Read More » -
शैक्षणिक
मुखेडसह जिल्ह्यातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा:- शहर काँग्रेसची मागणी
मुखेड प्रतिनिधी:- ३१ ऑक्टोबर नांदेड जिल्हयात पुराच्या पाण्याने थैमान मांडले होते मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेकडो कुटुंब उघडयावर पडलेले पहावयास मिळत आहे. शेतकरी पालक विद्यार्थी या पुरपढीतून सावरलेले नसतानाच माध्यमीक व उच्च माध्यमिक बोर्डाने परीक्षा शुल्कामध्ये वाढ केलेली आहे. महागाईव पुरपरिस्थिती पाहता या भागातील विद्यार्थी व पालक १० वी व १२ वीचे परीक्षा शुल्क भरण्यास सक्षमनसुन भविष्यात गोरगरीबांची मुल मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होते की कायअशी भिती पालकामध्ये दिसुन येत आहे. मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हातील परीक्षार्थीचे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन मा. उपजिल्हाधिकारी देगलुर व मा. तहसीलदार मुखेड यांना देण्यात आले या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, हणमंतराव चांडोळकर यांच्या सह्या असुन निवेदनाच्या प्रती खासदारप्रा.रवींद्र चव्हाण, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आल्या.
Read More » -
सामाजिक
१८ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा
मुखेड प्रतिनिधी:- ३० ऑक्टोंबर मुखेड तालुक्यातील मौजे चांडोळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील सन २००६–०७ या वषार्तीलविद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेहमिलन सोहळा महात्मा गांधी विद्यालयात दि. २६ आक्टोंबर रोज रविवारी मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमांने संपन्न झाला. याप्रसंगी शाळेत वृक्षारोपण व होतकरू, गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य, स्कूल बॅग देवून मदतीचा हात देण्यात आला. तसेच एम.बी.बी. एस.चे शिक्षण घेत असलेल्या गावातील ०३ विद्यार्थ्यांना ४० हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. स्नेह मेळाव्याप्रसंगी जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपण प्रत्येक सामाजिक कार्यातसहभाग घेऊन लोक कल्याणकारी कामे करू असा संकल्प केला. तालुक्यातील मौजे चांडोळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील सन २००६– ०७ या वषार्तील विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा महात्मा गांधी विद्यालयात दि.२६ आक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आला होता. सदरील स्नेह मिलन मेळावा सामाजिक बांधिलकी जपत उत्सहात साजरा करण्यात आला. तब्बल १८ वर्षांनी भेटत असलेल्या मित्र व मैत्रिणींनी आपला परिचय करून दिला यानंतर महात्मा गांधीविद्यालय या शाळेच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेतील सर्वसामान्य गोरगरीब, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य व स्कूल बॅग देण्यात आले. त्याचबरोबर एम.बी.बी. एस.चे, शिक्षण घेत असलेल्या गावातील ०३ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ४० हजार रुपयाची आर्थिक मदतही करण्यात आली. माहात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या यासामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री. कांबळे होते तर प्रमुखअतिथी म्हणुन मुंगडे, चंदावाड, शाळेचे मुख्याध्यापक भारत शिगंणवाड, शिक्षक बी. जी.सर, कोंडलवाडे, टाकळे, चोडींकर, केंद्रे, मुग टकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेतलेलेअनेक विद्यार्थी शासकीय सेवेत सेवा देत आहेत, औद्योगिक क्षेत्रातही नाव लौकिक करीत आहेत तरअनेक विद्यार्थी व्यवसायामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. या कार्यक्रमासाठी २००६– ०७ वषार्तील इयत्ता दहाव्या वगार्तील सर्व मित्र–मैत्रिनिंनी उपस्थिती लावली होती. सर्व कामे बाजूला ठेवूनएक दिवस मित्रांसाठी या हेतूने सर्वजण संबंध दिवस बालपणात रमलेले दिसून आले. यानंतर शेवटच्यासत्रात सर्व उपस्थित माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पुढील काळात आपल्या मध्ये समन्वय ठेवून एकत्रितसामाजिक कार्य करून समाजात एक आदर्श निर्माण करण्यासाठी संकल्प केला आहे.
Read More » -
क्राईम
प्रेमसंबंधातून- मुखेड तालुक्यातील तरुणाचा मृत्यू – कर्नाटकमध्ये अमानुषपणे मारहाण
मुखेड प्रतिनिधी:- २६ ऑक्टोबर मुखेड तालुक्यातील गोणेगावचा २१ वर्षीय विष्णूकांत पांचाळ या तरुणाचा प्रेमसंबंधातून जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार मुखेड तालुक्यातील गोणेगांव येथील विष्णुकांत जयराम पांचाळ याचा दि.२१ ऑक्टोबर मंगळवार रोजी कर्नाटकातील औराद जि.बिदर जवळील नागमपल्ली येथे सदरील गावातील गजानन वअशोक व इतर साथीदारांनी संगमत करून बेदम मारहाण केली. दरम्यान दि. २२ ऑक्टोबर रोजी बुधवारी सायंकाळ च्या सुमारास युवकाचा उपचारा दरम्यान हैद्राबाद येथे मृत्यू झाला. दि.२४ ऑक्टोंबर शुक्रवारी दुपारी या युवकाचा अंत्यविधी गोणेगांव येथे करण्यात आले. अधिकची माहिती अशी की , गाणेगाव तालुका मुखेड येथील रहिवाशी युवकाचे कर्नाटक येथील विवाहित महिलेशी मागील दोन वर्षांपासून प्रेम संबंध जुळले होते. सदरील प्रेम संबंध महिलेच्या नातेवाईकांच्या डोळ्यात खटकत होते. याचा वचपा काढण्यासाठी महिलेच्या नातेवाईकांनी या विष्णू पांचाळ मुलालाफोन करून नागमपल्ली येथे बोलून घेतले. त्यावेळी विष्णू सोबत त्याचे दोन मित्रही होते तेथील मंदिरात गेल्यानंतर मंदिरातून बाहेर येतात विष्णूला महिलेच्या नातेवाईकांनी पकडून नेले व मारहाण करण्यास सुरुवात केली हे पाहून विष्णूचे दोन्ही मित्र तेथून पळून निघून आले. विष्णू पांचाळ याचे हात पाय बांधून दोन जणांनी काठ्याने अमानुषपणे मारहाण केली व इतर जणांनी याप्रकरणी मदत केली.सदरील मारहाण करत असताना तेथील गावातील लोकांनी केवळ बघ्याचीच…
Read More » -
राजकीय
मुखेड नगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच उमेदवाराचा महापूर
▫️हौशे नौशे आणि गौशे मळवट भरून तयार, फिक्स नगर सेवकांची प्रजाती वाढली मुखेड /प्रतिनिधी २२ ऑक्टोबर मुखेड नगर पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच अनेक उमेदवारीचा महापूर आला असून नैसर्गिक महापूरा नंतर हे आलेले दुसरे महापूर असल्याचे बोलले जात आहे. या वेळी हौशे नौशे आणि गौशे मळवट भरून तयार असले तरी फिक्स नगर सेवकांची प्रजाती मात्र वाढल्याचे स्पष्ट पहावायास मिळत आहे. निवडणूकिची अधिकृत घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, सोशल मीडियावर उमेदवारी जाहीर करण्याची अक्षरशः झुंबड उडाली असल्याचे पाहावायास मिळत आहे. आपल्या ऐपती (बुद्धी) प्रमाणे सोशल मिडीयचा उपयोग होतं असून अशे कांही उमेदवार आहेत की आपल्या मोबाईल वर सोशल मीडियावर मॅसेजची देवान घेवान जमत नाही म्हणून ते आज कालच्यानवीन पिढीतील मुलांची मदत घेत बॅनर आणि ‘लवकरच भेटू‘ अशा संदेश पाठवून मतदारा पर्यंतपोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी थेट “फिक्स नगरसेवक,फिक्स पुढचा नगराध्यक्ष” असा नारादेत मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मुखेड नगर परिषदेची निवडणूक सुरू झाल्याचेचित्र मात्र स्पष्ट दिसत आहे. या वेळी मुखेड न. पा .चे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीवठरल्याने अनेक पुरुष नेत्यांचे गणित बिघडले आहे, तर महिला कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेची लाटउसळली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या महिला उमेदवारांचा शोध सुरू केला असून, स्थानिकपातळीवर गट– तटांची हालचाल वेगाने सुरू आहे. नगरपरिषदच्या निवडणुका २०१६ साली झाल्याहोत्या नगर परिषदेचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ या वर्षी संपला गेल्या चार वर्षा पासून लोकशाहीसंपूष्टात येऊन येथे नौकरशाही सुरु आहे. चार वर्षात नगर परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरि कांना बऱ्याच अडचणीस तोंड द्यावे लागले. आपले गा–हाने मांडण्यासाठी हक्काचा माणूस नसल्यामुळे जनतेची हेळसांड झाल्याचे पाहावायासमिळाले. अशा पार्श्वभू मीवर निवडणूक प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण जागाझाला आहे. आरक्षणाचा तक्ता जाहीर होताच सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली. काहींनी स्वतःच्या कार्याचा आढावा देणारे फोटो पोस्ट केले, तर काहींनी ‘सेवेसाठी सज्ज‘ असा टॅगलाईनदिला. काही संभाव्य उमेदवारांनी थेट “जनतेचा आशीर्वाद मागतो” अशा घोषणां मुळे सोशल मीडियावरचर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडिया वर प्रचाराचा महापूर असला, तरी मतदारांनी केवळ पोस्टपाहून निर्णय न घेता उमेदवारांची खरी कामगिरी तपासावी, अशी सुजाण नागरिकांची प्रतिक्रिया आहे. प्रशासक राज असताना नागरी प्रश्नांसाठी कोण पुढे सरसावले, कुणी लोकांच्या अडचणी प्रशासनापर्यंतपोहोचवल्या याचाही विचार मतदारांनी करावा, असा सल्ला दिला जात आहे. मुखेड शहराला आज खऱ्याअर्थाने प्रामाणिक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. पक्षीय हितापेक्षा शहराचाविकास, पारदर्शक प्रशा सन आणि लोकसेवा यांना प्राधान्य देणारा उमेदवारच मुखेडचा विकास साधूशकतो. जास्तीत जास्त उमेदवार लोकसेवेच्या हेतूने पुढे येत असतील, तर हे लोक शाहीचे सकारात्मकलक्षण आहे. विकास हेतू मनात ठेवून हे उमेदवार धडपड करत आहेत की मलाई खावून मालदार होण्यासाठीची हि तळमळ बाळगून आहेत हे ओळखण्याची जबाबदारी मतदारांवर आहे.
Read More »