Sharmik Ekta
-
राजकीय
महावितरण(MSEB)चे देगलूर येथील मध्यवर्ती कार्यालय नरसी येथे स्थलांतरित करा.
▫️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची मागणी नांदेड: प्रतिनिधी:- २२ जुलै २५ महावितरण (MSEB) चे विभागीय कार्यालय, देगलूर…
Read More » -
राजकीय
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेडात रास्ता रोको आंदोलन
मुखेड प्रतिनिधी:- २२ जुलै २५ छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्या वर झालेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेड तालुक्यातील मराठा समाज,सामाजिक संघटना व शेतकरी बांधवांच्या वतीने सोमवारी दि २१ जुलै रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन व घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व सोबतच्या साथीदारांनवर कारवाई करण्याचे निवेदन मुखेड येथील तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री व अजित पवार गटाचे…
Read More » -
Uncategorized
ग्रामीण गुंठेवारी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल करावेत
नांदेड प्रतिनिधी :- दि. २० जुलै २५ गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड (चिखलवाडी कॉर्नर नांदेड) येथे गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला…
Read More » -
राजकीय
मुखेड शहरातील विविध समस्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन…
मुखेड प्रतिनिधी:- २० जुलै २५ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी जाधव यांना मुखेड शहरातील विविध समस्यामार्गी लागाव्यात या मागणी करिता दिनांक १८ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. यामध्ये १.शहरातघनकचरा टेंडर धारकाकडून शहर स्वच्छतेचे काम वेळेवर नियमित होत नसल्याने शहरातील प्रत्येकवार्डात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा दिसुन येतो त्यामुळे दुर्गधी पसरुन नागरीकांचेआरोग्य धोक्यात येत आहे. २. मुखेड शहरातील कब्रस्तान मध्ये पाण्याची व विदयुत दिव्याची सोय करावी. ३.शहर स्वच्छतेसाठी कार्यरत व सफाई कामगाराचे महिन्यातुन एकवेळा आरोग्य तपासणी करण्यात यावी ४.मुख शहरात अस्तीत्वात असलेल्या मुता–या नियमित स्वच्छ करावे ५.मुखेड शहरातील मुख्य बाजारपेठेत १० ते ६ या वेळेत अवजड वाहने ट्रान्सपोर्ट वाहनांना बंदी घालावी. ६. शहरातील आडवडी बाजार दिवसी नगर परिषदेचे फिरते शौचालय नागरीकांना उपलब्ध करुन देण्यातयावे.…
Read More » -
आरोग्य
परिचारिकांचे ‘कामबंद’ आंदोलन:रुग्णेसवा विस्कळीत; नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रद्द
▫️आंदोलनचा आजचा चौथा दिवस मुखेड : प्रतिनिधी २० जुलै २५ विविध मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी गुरूवारी कामबंद आंदोलन केले. याचा परिणाम आरोग्य सेवेवर पडत असून, शुक्रवारी असलेल्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिर रद्द झाले आहे. या संपात १७ अधिपरिचारिका व ३ पुरुष अधिपरिचारक सहभागी झाल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे.. उपजिल्हा रुग्णालयात १७ जुलैपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून कामबंद आंदोलन होत आहे. वेतन त्रुटी निवारण ज्यात बक्षी समिती खंड २ तसेच खुल्लर समितीनुसार अधिपरिचारिका, परिसेविकाही प्रत्यक्ष रुग्णसेवा देणारी पदे आहेत. या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारणकरुन इतर पदाप्रमाणे या पदांना वेतनवाढ करावी. केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांना नर्सिंग भत्ता व गणवेश भत्ता लागू करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये विजय कोनापुरे, मनीषा पुंडे, एन. सोनकांबळे, एस. वासमवाड, ऐश्वर्या जमादार, व्ही. पांचाळ, जिजा गायकवाड, एस. सोनवणे, एस. सूर्यवंशी, पी. ईबितदार, संदेश पावरा, योगेश पावरा, ए. गोटमुखले, संगीता यलमवाड ,श्रीरामे एस,इंगळे पी सहपरिचारिका या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन…
Read More » -
सामाजिक
भारत सोनकांबळे यांनी सार्वजानिक बांधकाम उपविभागाकडे केलेल्या रस्ता दुरुस्तीच्या पाठपुराव्याला यश
▫️सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्यावरील नंदगाव पाटी ते कर्णा फाटा दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीस मंजुरी ▫️कामाचे अंदाजपत्रक तांत्रीक मान्यतेसाठी विभागीय कार्यालयास…
Read More » -
क्राईम
पूर्णाच्या लॉजमध्ये नांदेडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
▫️मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही पूर्णा :- १८ जुलै २५ शहरातील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या ‘इंडियन लॉज’मध्ये नांदेड येथील…
Read More » -
क्राईम
जाहूर येथील तलावात उडी मारून वयोवृद्धाने केली आत्महत्या
मुखेड :- १८ जुलै २५ मुखेड : तालुक्यातील येवती येथील वयोवृद्ध गोविंद रामराव सुडके ८२ वर्ष यांनी जाहूर येथील तलावातउडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १७ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याआत्महत्येचे कारण आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा गावात होत आहे . सुडके हे १५ जुलै रोजी ” जाहुर येथे बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते पैसे काढून आपल्या पत्नीला दिल्या वर…
Read More » -
शहर
शेतकरी नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्या जनसेवेची १८ वर्ष..
माजलगाव:- १८ जुलै २५ तसं तर २००७ हे साल आयुष्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टीचं साक्षीदार आहे, पहिलं २००७ ला एल एलबी चं शिक्षण पूर्ण झालं, मी एल एल बी चांगल्या मार्काने पास झालो, दुसरं परीक्षा मार्चमध्ये झाली, आणि २१ एप्रिल २००७ रोजी मी विवाह बंधनात अडकलो, तिसरं २००७ च्या मे महिन्यातच मी माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी माझे गुरु ॲड. व्हि.जी.तिडके साहेब यांच्याऑफिसला आलो, तेथे मला ॲड. बाबुराव तिडके, ॲड. साहेबराव आचार्य, ॲड.जाधवर मॅडम, ॲड हरिभाऊ बडे हे सहकारी मिळाले, यामध्ये खास करून ॲड बाबुराव तिडके यांना मी आणि आमचे सहकारी नाना म्हणायचो, नाना म्हणजे अगदी सरळ, साधा, प्रत्येकाला आपलं समजणारा, आलेल्या प्रत्येक पक्षकारांना आपुलकीने बोलणारा, त्यांच्या हृदयात घर करणारा एखादा पक्षकार खूपच गरीबघरचा किंवा परिस्थितीने गांगारलेला असेल तर नाना त्याला अगदी तिकिटाला सुद्धा पैसे द्यायचे.. त्यावेळीमी नाना सोबत जास्त वेळ घालवायचो, न्यायालयातील कामकाजाच्या बारीक–बारीक गोष्टी त्यांना निसंकोच विचारायचो, अगदी अर्ज लिहिण्या पासून दावा कसा तयार करायचा, दावा दाखल कसाकरायचा, दावा दाखल केल्यानंतर तो पुढे कोण कोणत्या स्टेज ला लागतो, पहिल्या स्टेज मध्ये आपणकाय करायचे, दुसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे, तिसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे हे अगदी लहान मुलासारखं विचारायचो, उलट तपास कसा घ्यायचा, उलट तपासात नेमकं काय आलं पाहिजे, पक्षकाराला तोप्रश्न कशा पद्धतीने विचारायचा, उलट तपासात साक्षीदार आपल्याला पाहिजे तसे उत्तर देत नसल्यासआपण कुठला प्रश्न विचारायचा, हाजरी माफीच्या अर्ज काय कारण लिहायचं हे सगळं विचारायला मलाकधीच लाज वाटली नाही, त्याचंही कारण होतं नाना जसे सगळ्यांशी आपुलकीने वागायचे त्याहीपेक्षामाझ्याशी अधिकच आपुलकीने जिव्हाळ्याने वागायचे, मला चांगलं अठवतयं २००७ मध्ये अगदी ऑगस्ट महिन्यात म्हणजे मला त्यावेळी वकिलीत ला “व” देखील कळत नव्हता त्यावेळी मला नानांनी माजलगाव येथील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश महेश नातू साहेब यांच्या न्यायालयात दिवाणी दाव्याच्या एका प्रकरणात उलट तपास समोर बसून घ्यायला लावला होता, खरं तर त्या उलट तपासातला प्रत्येक प्रश्ननानांनी मला माझ्या शेजारी बसून कागदावर वरचेवर लिहून दिलेला व्हता, याच्या पुढे जाऊन नानांनीमला पहिले दिवाणी न्यायाधीश व. अ.अ. ग देशमुख साहेब यांच्या न्यायालयात मनाई हुकूमाच्या अर्जावर युक्तिवाद करायला लावला होता आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणात आम्हाला मनाई हुकूम मिळाला होता, पुढे काही काळ माझी नाना सोबत चांगली गट्टी जमली होती, अगदी सकाळी, संध्याकाळी ऑफिसला जायचो, संध्याकाळी सिनियर तिडके दादा ऑफिसमध्ये कधी यायचे, कधी नाही यायचे, पणनाना मात्र दररोज संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन दुसऱ्या दिवशीच्या बोर्डावरील फायली काढायचे अनंमला फक्त फाईल वाचा म्हणायचे, मी प्रत्येक फाईल वाचायचो प्रत्येक फाईल मधील परिस्थिती वेगळीअसायची, प्रकरण वेगळे असायचे, ते काही लवकर लक्षात यायचे नाही, मग त्याबाबत मी नानांना विचारायचो की नाना हे कशाचं प्रकरण आहे मग नाना साध्या शब्दात मला समजून सांगायचे आणि त्याफाईल मध्ये आता पुढे काय होणार, आपण पुढे काय करणार हे सगळं सांगायचे अगदी दीड वर्षातनानांनी मला जवळजवळ सर्वच प्रकरणांची आणि सर्व प्रकारची चांगलीच माहिती दिली होती, त्यानंतर मात्र वडवणी तालुक्यात दिवाणी न्यायालय स्थापण झाले, आमच्या ऑफिसच्या बऱ्याच फायली वडवणीकडे ट्रान्सफर झाल्या त्या फायली चालवण्यासाठी नाना वडवणी ला गेले, पुढे २४ एप्रिल २०१० रोजी मीस्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे स्वतंत्र प्रॅक्टिस करण्यासाठी न्यायालयात ऑफिससुरू केले त्याचे उद्घाटन माझे गुरु ॲड विठ्ठलराव तिडके दादा यांच्या हस्ते झाले, पुढे वकिलीतुनच ॲड रामरावजी नाटकर यांच्या सहवासात आल्याने आणि एस एफ आय सारख्या विद्यार्थी संघटनेची पूर्वीची पार्श्वभूमी मला लाभलेली असल्याने, मी नाटकर साहेबांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम सुरूकेलं, त्याच दरम्यान माजलगाव येथे तत्कालीन खासदार राजू शेट्टी व संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचीमोंढा मैदानावर खूप मोठी सभा आम्ही त्यावेळी घेतली, आपल्याकडील साखर कारखानदार मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक पटीने शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत होते ते आजही करतात…
Read More » -
Uncategorized
व्यंकटेश चौधरी यांच्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
नांदेड दि.१७ जुलै २५नांदेड येथील महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या प्रीतिप्रेमाच्या भावनेला आध्यात्मिक उंचीवर नेणाऱ्या ‘अनाहत’ काव्यसंग्रहाला मातोश्री केवळाबाई…
Read More »