Sharmik Ekta

  • क्राईम

    आधार कीट सुरू न केल्यास “१५ ऑगस्टला आत्मदहन करणार ! बाऱ्हाळीच्या इस्माईल तांबोळींचा इशारा

    ∆ जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर करत तीव्र नाराजी मुखेड -(ता. प्रतिनिधी) १२ जुलै २५ मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील रहिवासी इस्माईल जाफर…

    Read More »
  • सामाजिक

    डॉ.राजासिंह चौव्हाण यांना स्मृ‌तिदिन्न‌निमित्त मुखेडमध्ये विविध कार्यक्रमासह अभिवादन.

    गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,भोजनदान,रुग्णांना फळ वाटप व वृक्षरोपणसह विविध कार्यक्रम संपन्न मुखेड / प्रतिनिधी. ११ जुलै २५     पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै.डाॅ. राजासिंह हरीसिंह चौव्हाण यांच्या २५ व्या स्मृ‌तिदिन्न‌निमित्त दि.०९ जुलै रोजी मुखेड येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात व आयटीआय काॅलेज,उपजिल्हा रुग्णालय,कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये,  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.डाॅ.राजासिंह चौव्हाण यांच्या स्मृ‌तिदिन्न‌निमित्त आयटीआय काॅलेज…

    Read More »
  • राजकीय

    मुखेड पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस -अजित पवार गटाची आढावा बैठक संपन्न

    ▫️अजितदादा पवार यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्या लक्ष्मण हाक्के विरुद्ध निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी मुखेड प्रतिनिधी:- ११ जुलै २५ दि ११ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आढावा बैठक पक्ष कार्यालय मोढा येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारी,तालुका अध्यक्ष बाबुराव पाटील कदम बिलाळीकर व मान्यवर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.  आढावा बैठकीमध्ये सदस्य नोंदणी विहित मुदतीमध्ये जास्तीत जास्त करण्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आपापल्या विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा प्रत्येकानं समोरमांडला. यावेळी कामाशी निगडित आवश्यक त्या सूचना दिल्या, मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आगामी…

    Read More »
  • राजकीय

    दुबार पेरणीचे संकट,बोगस बी-बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा!

    मुखेड अ भा. छावा संघटनेचा आंदोलनाचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर मुखेड : प्रतिनिधी:- ११ जुलै २५  तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात बोगस बी–बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुबार पेरणीचेसंकट ओढावले असून, या बोगस कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तहसीलकार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अ भा. छावा  संघटनेच्या वतीने  निवेदन दि ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले. बोगस बी–बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, त्यातच यंदा हवामानाचाअनियमितपणा आणि अद्याप न मिळालेला पीक विमा यामुळे शेतकरी अक्षरशः अडचणीत सापडलाआहे. जिल्ह्यातील काही कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस बी–बियाणे व खते खुलेआम विकलेजात आहेत. त्यामुळे केवळ बोगस कंपन्यांवर नव्हे तर त्यांच्या पाठीशी असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवरहीगुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालय, मुखेडयेथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटना तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे केरुरकर, युवक काँग्रेसतालुका सचिव तुकाराम पाटील सुडके, हनुमंत पाटील हसनाळकर, बालाजी पाटील शिंदे यांच्या सह्याआहेत. शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी प्रशासनाने त्वरेने कारवाई करावी, हीच या आंदोलनाची मुख्य मागणी होती.

    Read More »
  • क्राईम

    दौंडमधील खळबळजनक घटना; नवरा आणि महिलाच्या वादात , 11 महिन्यांचा चिमुकला ठरला शिकार

    दौंड:- ११ जुलै २५ पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं एकामहिलेनं आपल्या पत्नीवर त्रिशूलने हल्ला केला होता. पण या वादात पत्नीच्या हातून हा त्रिशूल थेट ११महिन्यांच्या मुलाच्या शरीरात घुसला. या दुर्दैवी घटनेत निष्पाप मुलाचा हकनाक मृत्यू झाला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती–पत्नीलाअटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अवधूत मेंगावडे असं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. तो अवघ्या ११ महिन्यांचा होता, जग कळायच्याआत जन्मदातीच्या हातून चिमुकल्याला मरण आलं आहे. ही घटना दौंड तालुक्याच्या केडगाव याठिकाणीघडली. अशाप्रकारे मुलाचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच यवतपोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन मेंगवडे हे आपली पत्नी आणि मुलासह केडगावमध्ये राहतात. घटनेच्या वेळी किरकोळ कारणावरून त्यांचा बायकोसोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्या नंतर बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूल घेतला. पण तो त्रिशूल बाजूला भावजयीच्या कड्यावर असलेल्या मुलाला लागला. जखमी झालेल्या चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पणत्रिशूलचा घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

    Read More »
  • राजकीय

    वानराच्या पिल्याचे मृत्यू ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कार 

    मुखेड प्रतिनिधी:- १० जुलै २५ मुखेड तालुक्यातील उमरदरी येथे दि १० जुलै रोजी गुरुवारी संध्याकाळी  वानराच्या पिल्याचे गावातील मरुमायच्या वाट्यावर चिंचेच्या झाडावरून खाली पडल्याने पिल्याचे जागीच मयत झाले़ ग्रामस्थांनी त्याची अंत्ययात्रा काढण्याचे ठरविले़ ही वार्ता परिसरातील गावात पसरली़ अन् या माकडाच्या अंत्ययात्रेत…

    Read More »
  • क्राईम

    नांदेडमध्ये तरुणीच्या छेडछाडीप्रकरणी ऑटोचालकाला अटक, पोलिसांकडून १६ तासांत कारवाई

    ▫️संबंधित तरुणीन नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर केली होती पोस्ट  नांदेड प्रतिनिधी:- १० जुलै २५ शहरातील श्रीनगर परिसरात एका प्रवासी तरुणीची छेड काढल्याच्या आरोपावरून एकाऑटोचालकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबंधित तरुणीने ही बाब सोशल मीडियावरपोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. पोस्टची गंभीर दखल घेत नांदेड पोलिसांनी अवघ्या १६ तासांत गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आणि संबंधितआरोपीविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केली. हा प्रकार सोशल मीडियावर आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी उचललेली कारवाईची शहरातीलपहिली घटना ठरली आहे, ज्यातून पोलिस प्रशासनाची तत्परता आणि संवेदनशीलता अधोरेखित होते. या कारवाईमुळे समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश गेला असून, पोलिस दलानेतात्काळ प्रतिक्रिया देत एक महत्त्वाचा आदर्श निर्माण केला आहे.

    Read More »
  • क्राईम

    हाताने उकडला रस्ता! बोगस कामगिरीचा पर्दाफाश बिलोली तालुक्यात युवकांचा संताप; निकृष्ट दर्जाच्या कामावर थेट सवाल

    ∆ दुगाव-डोंगरगाव रस्त्यावरून गेल्याचा पश्चात्ताप होतोय जनतेला! ∆ रस्त्यावर डांबर आहे की चिखलाचा थर?कागदावर कोट्यवधींचा निधी… आणि जमिनीवर बोगस बांधकाम!…

    Read More »
  • राजकीय

    मुखेड-हिब्बट-एकलारा मार्ग देगलूर रस्त्याचे  काम तात्काळ सुरू करण्यासाठी एकलारा येथे शिवसेनेचे होम-हवन आंदोलन.

    मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड–देगलूर मार्गावरील एकलारा ते केरूर दरम्यानचा रस्ता गेल्या १० वर्षांपासून अतिशय वाईट अवस्थेत असून, हा मार्ग गावातील लोकांना धोकादायक ठरला आहे . दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणवाढले असून, गर्भवती महिला, रुग्ण, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवासकरावा लागत आहे. अनेक वेळा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत निवेदने देऊनही रस्त्याच्या कामालासुरुवात झाली नाही. या मुळे बुधवार ९ जुलै रोजी एकलारा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने होम–हवन आंदोलन करण्यात आले मुखेड–हिब्बट–एकलरा मार्ग देगलूर  प्रमुख राज्य महामार्ग रस्ताच काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्यामुळेया मार्गांवरील वाहतूक, प्रवास मोठ्या प्रमाणत नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. हा रस्ता दोनराज्यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. ह्या रस्त्याच्या आजू बाजूला १०० गावच्या वाहतुकीचा प्रश्नरस्त्याच्या अर्धवट कामामुळे उद्भवला आहे रखडलेल्या रस्त्यावरून वाहतूक करताना दुचाकी,ऑटो, यांनाअनेकदा अपघाताचा सामना करावा लागत आहे  अनेक अपघात होऊन मागील काळात नागरिकमृत्यूमुखी पडले आहेत. या मार्गापासून ५ ते १० किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थी व गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना हा रस्ता जवळचा असल्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी अनेक हजारोनागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समस्तनागरिकांच्या वतीने आज एकलरा येथे होम – हवन आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख बबनजी बारसे, सहसंपर्कप्रमुख भागवत जाधव,उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील तालुकाप्रमुख नांदेड उत्तर तालुकाप्रमुख सुनील पाटील, नांदेड शहरसंघटकपिंटू सुनपे , मुखेड तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर, शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, युवासेनातालुकाप्रमुख बालाजी पाटील काटशेव, विधानसभाप्रमुख मन्मथ खंकरे,  विधानसभा संघटक शंकरपिटलेवाड,  विधानसभा समन्वयक सुनीता बाई वडजे,उपतालुकाप्रमुख विजय मंगलगे, युवासेना शहरसमन्वयक योगेश मामीलवाड, शिवराज भुरे, जब्बार शेख, व एकलरा, माऊली, उच्चा हिब्बट, धनज  बोरगाव येथील हजारो नागरिक उपस्थित होते.

    Read More »
  • अधिक

    मुखेड तालुक्यात कृषी विभागाच्या आशीर्वादाने युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकरी हवालदिल

    मुखेड : प्रतिनिधी ०९ जुलै २५  मुखेड तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, आणि यात कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. खत विक्रेते जादा दराने खते विकत आहेत आणि काही ठिकाणीखतासोबत इतर खते घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.  मागील काही दिवासांपासून कृषी सेवा केंद्र चालकांकडून वेगवेगळी कारणे देऊन, युरियाची कृत्रिमटंचाई निर्माण केली जात आहे. मात्र, कृषी केंद्र चालकांना राजकीय पाठबळ असल्यामुळे कोणतीहीठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गुरुवारी अनेक दुकानात फिरूनही युरिया मिळाला नाही. खरेदी विक्रीसंघाचे कार्यालयात युरिया नसल्याने शेतकरी हैराण झालेल्या चित्र मोंढ्यात पाहावयास मिळत आहे. युरिया खताचा भाव २६५ रुपये असून सध्या ५०० एम एल लिक्विड युरिया उपलब्ध असून त्यांची किंमत२२५ आहे. ठोक विक्रेते किरकोळ व्यापारी दुकानदारांना पाहिजे असल्यास लिंकिंग नॅनो युरिया घेतल्यास आम्ही युरिया तुम्हाला देऊ या भूमिकेत आहेत. शहरातील ठोक व्यापारी बफर स्टॉक केल्याने मोढ्या येथील एकूण २५ कृषी सेवा केंद्रापैकी फक्त दोनच दुकानात युरिया उपलब्ध आहे. तर २३दुकानात तब्बल १ महिन्यापासून युरिया सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यानो युरिया शेतकऱ्यांनी घेण्यासाठी शहरात युरिया खताचा भाव २६५रूपये तर बाराहाळी रस्त्यावर व बेरळी रस्त्यावर असलेल्या वेअर हाऊसमधील स्टॉक असलेल्या युरियाखत बाहेर जिल्ह्यातील जळकोट, जांब, उदगीर, देगलूर येथे ४०० रुपये दराने खुलेआम विक्री चालू आहे.  काही खत विक्रेते युरिया खताची जादा दराने विक्री करत आहेत, आणि काही ठिकाणी खतासोबत इतरखते घेण्याची सक्ती केली जात आहे या विषयाकडे तहसीलदार, कृषी अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. गावोगाव प्रचार व माहिती देणे, आवश्यक असताना पंचायत समिती, कार्यालयात कृषी विभाग व तालुकाकृषी अधिकारी हे उंटावरून शेळ्या हाकत आहेत. तालुका खरेदी विक्री एक खत नाही संघात दोन ट्रकयुरिया उपलब्ध झाला होता; पण चार दिवसांत युरिया खताची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहितीमिळाली आहे.…

    Read More »
Back to top button