Sharmik Ekta

  • Uncategorized

    धर्मांची भिंत नाही, माणुसकीचा पूल: पुण्यात पावसात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर अविष्कार

     “धर्म माणसांना वेगळं करत नाही, मनं जोडली गेली पाहिजेत.” पुणे : पावसाच्या तडाख्यामुळे एक लग्न धोक्यात आलं होतं, पण माणुसकीच्या ओलाव्याने तो सोहळा अविस्मरणीय झाला. पुण्यातील वानवडी परिसरात मंगळवारी संध्याकाळी हिंदू विवाह सोहळ्याला अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळ उडाला. खुल्या लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेला विवाह अक्षरश: अडचणीत आला होता. मात्र, याच क्षणी धर्मापेक्षा मोठ्या असलेल्या एका भावनेने – सहजीवनाच्या – एका सुंदर उदाहरणाची साक्ष पुणेकरांनी घेतली. पावसामुळे विवाहस्थळी पाणी साचले, पाहुणे पळापळ करू लागले आणि मुहूर्त जवळ येत होता. अशावेळेस शेजारच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या मुस्लिम रिसेप्शनने माणुसकीचा हात पुढे केला. कोणतेहीधार्मिक वा सामाजिक भेद न करता त्यांनी हिंदू विवाहासाठी आपला मंच खुले दिले. कवडे आणि गलांडे पाटील कुटुंबीय जेव्हा त्या मुस्लिम कुटुंबियांच्या नातेवाईकांकडे मदतीसाठी गेले, तेव्हा त्यांना कुठलाही विचार न करता ‘हो‘ उत्तर मिळालं. दीड तासासाठी पूर्ण रिसेप्शन हॉल हिंदूविवाहासाठी खुला करण्यात आला. तिथे चि. सौ. कां. संस्कृती आणि चि. नरेंद्र यांचा विवाह विधिपूर्वकपार पडला. मंगलाष्टकाच्या गजरात, साक्षीदार निसर्ग आणि उपस्थित सर्व धर्मीय पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहएक नवा संदेश देऊन गेला – “धर्म माणसांना वेगळं करत नाही, मनं जोडली गेली पाहिजेत.” या प्रसंगाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही विवाहसमारंभांचे नवविवाहित जोडपे आणि नातेवाईकांनीएकत्र फोटो काढले, गोडधोड भोजनात सहभागी झाले, आणि एका क्षणापुरतं का होईना – पण “भारतहा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे” याचं जिवंत उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. पाऊस हा अडथळा न ठरता, तो एका नव्या सुरुवातीचा पूल ठरला. आणि माणुसकीच्या या प्रसंगाने पुन्हाएकदा दाखवून दिलं – “धर्म वेगळे असले तरी, आपुलकी आणि मदतीची भावना सगळ्यांना एकत्र आणू शकते.”

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड मधील दोन विविधघटनेत वीज पडून १ म्हैस व ५ शेळ्यांचा मृत्यू

    तालुक्यातील दोन विविधघटनेत गावांमध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एक म्हैस व पाच शेळ्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी जांब (खु.) येथील शेतकरी गणेश शंकरराव गोंड यांच्या मालकीची म्हैस वीज पडून जागीच मरण पावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत तग्याळ येथील शेतकरी मनोहर शंकर गोपनर यांच्या ५ शेळ्यांवर वीज पडल्याने मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळ वारेवाहून पावसास सुरूवात झाली. वादळी वाऱ्याने ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या झाडांचे तर काही घरांवरील टिनपत्रे उडाली. तहसीलदार राजेश जाधव यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही घटनांचा पंचनामा करून अहवाल वरीष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. 

    Read More »
  • सामाजिक

    महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे नांदेड विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेस प्रारंभ

    कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसी प्राधिकरणाला केल्या विविध सूचना तीन महिन्यानंतर हस्तांतरणाची कार्यवाही अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी केली…

    Read More »
  • सामाजिक

    मांजरा नदीपात्रातुन दिवस रात्र अवैध रेती उत्खनन; महसूल अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

    बिलोली,देगलूर,मुखेड महामार्गवरून होते क्षमते पेक्षा जास्त अवैध रेतीची वाहातुक मुखेड प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रात गेल्या काही महिन्यांपासून अवैध रेतीउत्खनन आणि वाहतुकीचा धंदा खुलेआम सुरू आहे. जेसीबी मशिन्सच्या सहाय्याने रेतीचे अवैध उत्खननआणि क्षमते पेक्षा जास्त  रेती वाहतूक सर्रास सुरू आहे बिलोली,देगलूर,मुखेड महामार्ग वरून रात्रीच्याअंधारात व सकाळी पहाटे रेती…

    Read More »
  • शैक्षणिक

    जि.प.मुलींचे हायस्कूलचा ९९.४६ टक्के निकाल;सेमी माध्यमचा १०० टक्के.

    •प्रणिताने मिळविले ९८.२० टक्के,९७ टक्केच्या ४ तर ९५ टक्केच्यावर ८ मुलींनी मारली बाजी. मुखेड / प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

    Read More »
  • शैक्षणिक

    दहावीच्या परिक्षेत अरमान शेखला मिळाले ९९.०० टक्के गूण

    शाळेत तिसरा क्रमांक पटकाविण्याचा मिळाला मान मुखेड – माध्यमिक शिक्षण मंडळा मुखेड अंतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अरमान अस्लम शेख हिने ९९.००% इतक्याउच्च गुणवत्तेसह घवघवीत यश संपादन केले आहे. अरमानच्या या यशामुळे संपूर्ण शेख कुटुंबासह शाळेचा, शिक्षकांचा आणि गावकऱ्यांचा अभिमान उंचावला आहे. अरमान हा सरकारी वकील अस्लम शेख यांचा चिरंजीव असून तिच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाची वर्षाव होत आहे.  अरमान ने ९९.०० टक्के गुण  मिळविले आहे.यात त्याला मराठी विषयात ९७,हिंदी विषयात ९६, इग्लिंश९६, गणित १००, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९९ व सामाजिकशास्त्रे ९४ गुण मिळाले  तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस ‘द ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल‘ कडून आणि समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. अरमान हा…

    Read More »
  • शैक्षणिक

    दहावीच्या परिक्षेत श्रेया वाघमारेला मिळाले ९८.६० टक्के गूण

    मुखेड / प्रतिनिधी.     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल दि.१३ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला.या निकालात मुखेड शहरातील ब्राईटस्टार इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रेया संजय वाघमारे हिने ९८.६० % टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यशसंपादन करीत ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचा यश मिळविला आहे या यशाबद्दल श्रेयाचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.    नुकतच दिनांक १३ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल व विश्व हिंदु परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे याची कन्या श्रेया वाघमारे या विद्यार्थ्यांनीने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ९८.६० टक्के गुण  मिळविले आहे.यात त्याला मराठी विषयात ९७,संस्कृत विषयात ९७, इग्लिंश ९३, गणित १००, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९६ व सामाजिकशास्त्रे ९६ गुणमिळाले आहेत. श्रेयाने या यशाचे सर्व श्रेय शिक्षक, शिक्षिका,आजी,आई,वडील व मार्गदर्शन करणाऱ्या…

    Read More »
  • सामाजिक

    मौजे केरुर येथे  शूरवीर छावा…’ छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

    •नियोजित स्मारक स्थळाचे अनावरण मुखेड प्रतिनिधी:-  शत्रु देखील मरतांना ज्यांच कौतुक करून गेला असे धर्मवीर  छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तालुक्यातील मौजे केरूर येथे  उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराजांच्या प्रतिमेचेपूजन करून नियोजित स्मारक स्थळाचे अनावरण करण्यात आले. दि १४ मे रोजी मौजे केरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गोविंद शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व नियोजित जागेचे अनावरण समस्त केरूर वासियाच्या वतीने करण्यात आले स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून येणाऱ्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजानी अखेरपर्यंत लढा देत स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली लोककल्याणकारी योजनांद्वारे प्रजेचे हित जोपासले. अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे बुद्धी आणि शोर्याचा अदभूत संगम असणाऱ्या एकही युद्धनहरणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर गिरीधर पाटील यांनी प्रकाशझोत टाकला. याप्रसंगी किसन पाटील,गिरीधर पाटील ,गजानन पाटील ,दत्ता पाटील ,महेश पाटील ,दिपक पाटील ,विष्णूशिंदे ,हानमत शिंदे ,सम्रत पाटील  ,शेषराव पाटील ,महेश शिंदे ,हनुमंत शिंदे ,वेंकट शिंदे ,राजेश शिंदे,दीपक शिंदे ,दीपक कानडे ,संतोष शिंदे ,ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते 

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड तालुक्यात वसूर येथे विज पडून ६५ वर्ष वृद्ध महिलेचा मृत्यू 

    मुखेड प्रतिनिधी :- १४ मे  महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे अस्मानी संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. गत दोन दिवसांपासून मुखेड तालुक्यात विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. मुखेड शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. दि १४ मे रोजी मुखेड तालुक्यातील वसुर येथे  सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता शेषाबाई कामिन शिंदे…

    Read More »
  • सामाजिक

    नांदेड बसस्थानक उद्यापासून मुळ जागी सुरु होणार !

    नांदेड प्रतिनिधी:-एसटी महामंडळाच्या नांदेड मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंतच्या रस्त्यांची अंत्यतदुर्दशा झाली होती. याच रस्त्याच्या मजबुतीकरणासह फुटपाथ, पथदिवे आदी कामांसाठी मध्यवर्ती बसस्थानकाचे १३ एप्रिल रोजी नवीन कौठा भागातील मोदी मैदान येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेहोते. मात्र या तात्पुरत्या बस स्थानकात प्रवाशांना कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. यासह सुरक्षा वाऱ्यावर आली होती. मोवाईल, पाकीट चोरी, वाटमारी सारखे प्रकार दररोज होत आहेत. त्यात नादेड शहरात येण्यासाठी आणि शहरातून बस स्थानकाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची मोठी आर्थिक लूट सुरू होती. या सर्व नरकयातनांमुळे प्रवांशी त्रस्त झाले होते. त्यामुळे आता हेबस स्थानक मूळ ठिकाणी कधी स्थलांतर होईल, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. बस स्थानकाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम दोन, तीन दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचेकामही यादरम्यान करण्यात आले. मात्र सिमेंट रस्त्याच्या मजबुती करणासाठी आवश्यक असणारी क्युरिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे या तीन दिवसांच्या कालावधीत क्युरिंग करण्यात आली. तर अन्य कामांनाही गती देण्यात आली. या भुनषंगाने रस्त्यासह सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत एसटी महामंड व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची दि. १४ रोजी सकाळी बैठक झाली. याबैठकीत झालेल्या कामाची माहिती देण्यात आली. यानंतर कौठा येथील स्थलांतरित बसस्थानकात प्रवाशांना होणारा त्रास आणि असुविधा लक्षात घेता उद्या दि. १५ मे पासून एसटीचे मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा नांदेड शहरातील मुळ जागेवरून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर एसटीच्या विभागीय नियंत्रकांनी जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना मध्यवर्ती बसस्थानक शहरातील मुळ जागेवरून सुरू होईल. येथून प्रवाशांची वाहतूक करावी तसेच दि. १४ मे रोजी नांदेड येथेमुक्कामी येणाऱ्या सर्व फेऱ्या शहरातील बसस्थानकात मुक्कामी पाठवाव्यात अशा सुचना दिल्या आहेत. सोबतच प्रवास भाड्यात झालेली वाढ वा घट पुर्ववत करण्यात यावी, अशी सुचनाही विभाग नियंत्रकांनीकेली आहे.

    Read More »
Back to top button