Sharmik Ekta
-
राजकीय
महायुतीच्या सत्तेत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडेलाडकी बहीणही असुरक्षित:- डॉ. श्रावण रॅपनवाड
मुखेड प्रतिनिधी:-महायुती सरकार च्या काळात राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून महायुतीच्या शिवशाहीत लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे सिद्ध…
Read More » -
सामाजिक
सावली फाऊंडेशनच्या वतीने मठ संस्थान परिसरात व्यायाम शाळेची मागणी
खासदार रविंद्र पाटील यांच्या कडून सावली फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक बेटमोगरा प्रतिनिधी:- बेटमोगरा येथील ऐतिहासिक श्री.शिवलिंग बादशाह मठ संस्थान परिसरात व्यायामशाळा मंजूर करण्यातयावा या मागणीचे निवेदन आज सावली फाऊंडेशन च्या शिष्टमंडळाने नांदेड जिल्ह्याचे खासदार मा.रविंद्रपाटील चव्हाण यांना दिले. याप्रसंगी शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे मठाधिपती श्री.सिद्धदयाळ शिवाचार्यमहाराज बेटमोगरेकर यांनी सावली फाउंडेशनच्या कार्याचे, निसर्ग मित्रांच्या दैनंदिन मेहनतीचे व मिळतअसलेल्या यशाची सखोल माहिती खासदार यांना दिली. यादरम्यान खासदार रविंद्र पाटील सावली फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत व्यायाम शाळेच्या प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन देत सावली फाउंडेशनच्या उद्यानातील सर्व झाडांची पाहणी केली. याप्रसंगी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, डॉ.यशपालजी भिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी,धनराज पाटील, बालाजी पाटील,श्रीधर पाटील,डॉ.फारुख शेख,इस्माईल शेख,गणू सावकार अन्सापूरे, मुस्तफा पिंजारी,शमशुद्दीन शेख, आसलम दौलताबादी सह आदींची उपस्थिती होती.
Read More » -
राजकीय
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आज सेलूला राज्य अधिवेशन
नांदेड प्रतिनिधी:- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली असून राज्य भरातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. गुरूवारी सकाळी११ वाजता माकपचे पॉलीट ब्युरो तथा केंद्रीय समन्वयक प्रकाश करात यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. तर दुपारी ४ वाजता हुतात्मा स्मारक सेलू येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता शहरातील टिळक पुतळा येथे अधिवेशनाची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला केंद्रीय समन्वयक, माकप पॉलिट ब्युरो प्रकाश करात, खा. निलोत्पल बसू, डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर आदी संबोधित करणार आहेत. अधिवेशनास कष्टकरी,कामगार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनीउपस्थित रहावे असे आवाहन भाई प्रा. यु. आर. थोंबाळ,रामकृष्ण शेरे, विजय गाभणे, शंकर गिडाम, उज्वला पडलवार, गंगाधर गायकवाड, नसीर शेख यांच्यासह माकप नांदेड जिल्हा समितीच्या…
Read More » -
क्राईम
नांदेडमध्ये भररस्त्यात तरुणावर चाकू हल्ला; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद
दोन्ही हल्लेखोरांना परभणी येथुन ताब्यात घेण्यात आलेची माहिती नांदेड प्रतिनिधी:- नांदेडमध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. गोळीबार आणि हत्येसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी देखील नांदेडमध्ये भयंकर घटना समोर आली. सकाळच्या सुमारास दोन अज्ञात मारेकऱ्यांनीस्कुटीवर थांबलेल्या एका तरुणावर चाकूने वार करुन त्याची हत्या केली. हल्लेखोरांनी पाठलाग करततरुणाच्या मानेवर, पोटात आणि पाठीवर तब्बल दहा ते अकरा खंजर खुपसले. रक्तबंबाळ झालेल्यातरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अमोल भुजबळ हा शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी असून तो एका खाजगी रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास तो स्कुटीवरून गणेशनगरभागातील एका दुकानावर सामान घेण्यासाठी आला होता. तो स्कुटीवर बसलेला होता आणि दुकानदारत्याला सामान देत होता. तो स्कुटीवरुन बसलेला असताना, काही वेळात पाठीमागून काळ्या कपड्याने तोंडझाकलेले दोघे जण धावत आले आणि अमोल बेसावध असताना याच्या मानेवर आणि पाठीवर खंजरने वारकरण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी चाकू मारण्यास सुरुवात केल्यानंतर अमोल तेथून पळ काढू लागला. पण हल्लेखोरांनी त्याचापाठलाग करत जवळपास आठ ते दहा वार जिथे मिळेल तिथे त्याच्या शरीरावर केले. यात अमोलचा जागीचमृत्यू झाला. अमोल भयंकर हल्ल्यानंतर तसाच रक्ताच्या थोराळ्यात रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होता. दोघांपैकी एकाने डोक्यावर हेल्मेट, तर दुसऱ्या एकाने काळा रुमाल तोंडाला बांधला होता. सकाळची वेळअसल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे हल्लेखोरांनी सकाळीच त्याच्यावर बेसावधपणे भीषण वारकेले. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने गणेश नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर हल्लेखोरपसार झाले. मात्र घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताचअतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपाधीक्षक सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचेपोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनीघटनास्थळी धाव घेतली. जुन्या वादातून ही हत्येची घटना घडल्याची माहिती आहे. फरार दोन्ही हल्लेखोरांना परभणी येथुन…
Read More » -
सामाजिक
२८ फेब्रुवारीला यशवंत महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड दि. 25 फेब्रुवारी :- मिळेल ती नोकरी घेऊन सुरुवात करा. एक छोटीशी सुरुवात आपलं करिअर घडू शकते, या संदेशासह…
Read More » -
सामाजिक
नाच गाण्यावर लाखो रुपये खर्च करून महसूल क्रीडा महोत्सवाला निधी देणा-या आमदारांना दिव्यांगाचा पडला विसर :- साळवे
जिल्ह्यातील दिव्यांग निधीसाठी झिजवतात आमदारांच्या ऑफिसच्या पायऱ्या नांदेड प्रतिनिधी :नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात संख्या असून त्यांना…
Read More » -
क्राईम
सावरगाव पी.रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार , एक जखमी
मुखेड प्रतिनिधी:- शहरातील वासुदेव गल्लीतील रहिवासी असलेले दोन युवकांच्या मोटारसायकलला सावरगाव पी. परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होवून यातील एकजण जागीच ठार झाला आहे तर एक जण किरकोळजखमी झाला आहे. दि.२३ फेब्रुवारी रोजी वासुदेव गल्लीतील रहिवासी नागेश कुमार कुंभारकर (४०) आणि माधव धुमाळ (३०) हे दोघेजण मोटारसायकल क्रमांक एम. एच. २२ ए.आर. ८७४५ वर अहमदपूरहुन नातलगाचे अंत्यसंस्कारकरुन मुखेडकडे येत होते. सदर मोटारसायकलला सावरगाव (पी) परिसरात अपघात झाला. या अपघातातनागेश कुमार कुंभारकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर माधव धुमाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. नागेश कुंभारकर यांना जखमी अवस्थेत मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले. अपघात नेमका कसा झाला याबाबत काहीही माहिती कळू शकली नाही. या प्रकरणी वृत्तलिहीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. दरम्यान तालुक्यात फेब्रुवारीमहिन्यात ११ अपघात झाले असून ८ ते ९ व्यक्तींनी मोटारसायकल अपघातात आपला जीव गमावला आहे.
Read More » -
अधिक
आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे
डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार नांदेड दि. २३ फेब्रुवारी : या वर्षी सादर करण्यात आलेला केंद्राचा…
Read More » -
राजकीय
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ – नेते दशरथराव लोहबंदे यांचा शिवसेनेला रामराम !
मुखेड : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनी आपल्यापदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ – नेते, एकलढाऊ नेतृत्व म्हणून – ज्यांची ओळख आहे असे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनीशिवसेनेमध्ये होणारी पक्षांतर्गत मुस्कटदाबी, अपमान, द्वेष, टवाळी या बाबींना कंटाळून आपल्या पदाचाराजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. दशरथराव लोहबंदे यावेळी पत्रकार परिषदेतबोलताना म्हणाले की, संपर्कप्रमुख बबन थोरात यांची पक्षांतर्गत दादागिरी असून प्रामाणिक कार्य करणाऱ्याकार्यकर्त्याला या पक्षात यांच्यामुळे थारा नसल्याचे दिसून येते. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून शिवसेनासंपविण्याचा विडाच काही लोकांनी उचलला असल्याचेही वसंतराव लोखंडे यांनी यावेळी सांगितले. शिवसेना पक्ष चांगला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेला चांगले दिवस येणार आहेत. एकदिवस शिवसेना यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचेल मात्र पक्ष संघटनेतून या झारीतील शुक्राचार्यांना दूरकरावा लागेल, असा आशावादही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केला आहे. १९९५ पासून मीआणि माझ्या कुटुंबातील सदस्य राजकारणात असून आजपर्यंतच्या सर्वच निवडणुका नगरपरिषद असो कीजिल्हा परिषद असो स्वबळावर स्वतःच्या ताकतीवर लढविल्या आणि त्या जिंकल्या आहेत. मला पक्षाचीगरज नाही तर पक्षाला माझी गरज होती परंतु ते करता आले नसल्याची ही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. जनतेला वाऱ्यावर सोडणार ‘नसून गोरगरिबांच्या सहकार्यानेच माझे सामाजिक आणि राजकीय काम सुरूचराहणार असल्याचेही स्पष्ट प्रतिपादन लोहबंदे यांनी यावेळी केले. यावेळी त्यांचे सहकारी पांडुरंग अडगुलवार उपस्थित होते.
Read More » -
सामाजिक
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण
बालेवाडी, पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नांदेड येथील कार्यक्रमात खासदार डॉ. अजित गोपछडे यांची उपस्थिती घरकुलांचे बांधकाम गतीने होण्यासाठी…
Read More »