Sharmik Ekta

  • Uncategorized

    उंद्री प.दे. येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त रविवारी भव्य पालखी सोहळा !

    आज जागरण तर सोमवारी महाप्रसाद व कुस्त्यांची भव्य दंगल मुखेडतालुक्यातील उंद्री प.दे. येथेश्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आज पासून विविध…

    Read More »
  • शैक्षणिक

    नांदेडमधील 33 केंद्रांवर 1 डिसेंबरला एमपीएससी परीक्षा 

    नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्य शासनाने नोकर भरती मोठ्याप्रमाणात सुरू केली असून याअंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व…

    Read More »
  • शहर

    दुःखद घटना. मुखेड तालुक्यातील हिरानगर तांडा येथील भूमीपुत्र शहीद

    राठोड हे २०२५ मध्ये स्वंय इच्छुक सेवानिवृत्ति होणार होते मुखेड प्रतिनिधी लेह मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या…

    Read More »
  • Uncategorized

    भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर ओबीसी मुख्यमंत्री करायला हवे

    ओबीसी नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांची मागणी मुखेड प्रतिनिधी:-   भाजपाचा डीएनए ओबीसीचा असल्याचे भाजपा व महायुतीचे स्पष्ट बहुमत आलेले असताना  मुख्यमंत्रीओबीसींचा करून  फडणवीसांनी वक्तव्य सिद्ध करावे अशी मागणी ओबीसी नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांनीकेली आहे.      भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस नेहमीच भाजपाचा डीएनए ओबीसींचा असल्याचे वक्तव्य करत असतात. महाराष्ट्र विधानसभानिवडणुकीत कधी नव्हे ते भाजपा प्रणित महायुतीचे राक्षसी बहुमत मिळाले आहे शिवाय महायुतीत अनेकओबीसी आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. अशावेळी फडणवीस यांनी आपले वक्तव्य सिद्धकरण्यासाठी ओबीसी नेतृत्व पुढे आणून मुख्यमंत्रीपद बहाल करावे. अन्यथा फडणवीसांनी ते वक्तव्य केवळमराठा समाजाविरुद्ध ओबीसी समाजाला भडकावून त्यांना भाजपाकडे वळवण्याचे षडयंत्र म्हणून त्यांनाभाजपाकडे वळवण्यासाठी केल्याचे सिद्ध होईल. भाजपा आणि फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा अशाप्रकार चा एकतर्फी विजय महायुतीला मिळालेला आहे अशा वेळेस भाजपाचा डीएनए ओबीसीचा असल्याचेसिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्रीपद ओबीसी नेतृत्वाला देण्यात यावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ओबीसीनेते व ओबीसी जनगणना परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. श्रावण रॅपणवाड यांनी केले आहे.

    Read More »
  • राजकीय

    मुखेड मतदारसंघात आमदार तुषार राठोड यांची ‘हॅट्रिक’ लाडकी बहीण ठरली वरदान

    तालुक्याला लाल दिवा मिळणार काय? मुखेड : नुकत्याच पार पडलेल्या ९१ मुखेड विधानसभा निवडणुकीत भाजपा– शिवसेना महायुतीचे उमेदवारडॉ. तुषार गोविंदराव राठोड यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार हनमंतराव पाटीलबेटमोगरेकर यांचा तब्बल चाळीस हजार मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली तर दुसरीकडे माजीआ. हाणमंत बेटमोगरेकर यांना सलग तीन वेळेस पराभव पत्कारावा लागला आहे. अपक्ष उमेदवार बालाजीखतगावकर हे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेकांनी पैजा लावल्या होत्या. मात्र, मतदारांनी पुन्हाएकदा आमदार राठोड यांच्यावर विश्वास टाकून त्यांना विधानसभेत पाठविले. मुखेड विधानसभा – निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी – ७० टक्के मतदान झाले. त्यामुळे वाढीव मतदानाचा कोणाला कौल – मिळणार याची उत्सुकता वाढली होती. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू – असताना भाजपचे डॉ. तुषारराठोड हे सुरुवातीपासून आघाडीवर राहिले. – राठोड यांनी तिसऱ्यांदा विजय प्राप्त – करून मुखेडविधानसभेवर भाजपचा झेंडा फडकाविला आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजपचे उमेदवार दिवंगत गोविंदराव राठोड हे निवडून आलेहोते. पण, शपथविधी सोहळ्याला जाताना रेल्वे प्रवासात त्यांचे निधन झाल्यानंतर २०१५ च्यापोटनिवडणुकीत डॉ. तुषार राठोड विजयी झाले होते. यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदाआ. राठोड विजयी झाले. २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून डॉ. तुषार राठोड काँग्रेसकडून माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर वअपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांच्यात तिरंग लढत झाली. एकंदरीत मुखेड विधानसभानिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुखेड येथील प्रचारसभेत डॉ. तुषार राठोड यांना अधिकमताधिक्याने निवडून द्यावे, मी त्यांना मंत्री करते असे जाहीर आश्वासन दिले होते यामुळे सुद्धा मतदानाचीटक्केवारी वाढून जवळपास ३८ हजारांच्य मताधिक्याने जनतेने त्यांना निवडून दिले आहे. आता फडणवीसआ. राठोड यांचा आपल्या मंत्रीमंडळात समावेश करतात काय? याकडे बंजारा समाजासह जिल्ह्यातीलमतदारांच्य नजरा लागल्या आहेत.

    Read More »
  • राजकीय

    शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी तर आमदार शहाजी बापू यांचा पराभव

    सांगोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगोला मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतीलबंडखोरीत एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. आबासाहेब देशमुख 25 हजार 384 मतांनीविजयी झाले आहेत. माझ्यासोबत आलेल्या 50 आमदारांपैकी एकजरी पडला तर, मी गावाकडे शेती जाऊन शेती करेन, असेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले होते. पण गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांपैकी शहाजीबापू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सांगोला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचाबालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख या मतदारसंघातून 11 वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. खुद्दशहाजीबापुंनी देशमुखांविरोधात 6 वेळा निवडणूक लढविली होती. पण तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावालागला होता. 2019 ला बाबासाहेब देशमुख यांची वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेशहाजीबापू पाटील यांना संधी चालून आली होती. 2019 च्या निवडणुकीत शहाजी पाटलांचा विजय झालाहोता. यंदाच्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी 1 लाख 16 हजार 280 मते घेत शहाजी बापू पाटीलयांचा 25 हजार 384 मतांनी पराभव केला. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा सांगोला मतदारसंघखेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.

    Read More »
  • सामाजिक

    नांदेड जिल्ह्यात उद्या मतमोजणीलोकसभेसाठी 19 व विधानसभेच्या 165 उमेदवारांचे भविष्य ठरणार

    प्रशासन सज्ज, विद्यापीठाच्या ज्ञानार्जन केंद्रात मतमोजणी किनवट, हदगाव, लोहा तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी पहिली फेरी सकाळी 11…

    Read More »
  • शहर

    मुखेड मतदारसंघात २ लाख १५ हजार ३९९ मतदारांनी बजावला हक्क

    उद्या विद्यापीठात 6 विधानसभा व लोकसभेसाठी मतमोजणी मुखेडः प्रतिनिधी नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्याअनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन तसेच अंमलबजावणी करत निवडणूक व मतदानप्रक्रिया पार पडली असुन मुखेड मतदारसंघात रात्री उशीरापर्यंत मतदारांनी रांगा लावून मतदान प्रक्रियेतसहभाग नोंदवला आहे. विधानसभेसाठी एकुन ७०.१४ क्के मतदान झाले आहे. २ लाख १५ हजार ३९९मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूककामी ३६६ मतदान केंद्रावर २ हजार ४०अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुखेड–कंधार विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून ११ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ७०.१४ टक्के मतदान झाले आहे. मुखेड–कंधार मतदारसंघात ३६६ मतदान केंद्रआहेत. मतदारसंघात १ लाख ५९ हजार ६८५ पुरूष मतदार तर १ लाख ४७ हजार ३९९ महिला मतदार तसेचइतर ०८ असे एकुन ०३ लाख ०७ हजार ९२ मतदारांची संख्या आहे. त्यापैकी २ लाख १५ हजार ३९९मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये १ लाख ११ हजार ८९१ पुरूष मतदार तसेच १लाख ०३ हजार ५०६ महिला तर इतर ०२ मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाचे हक्कबजावले आहेत. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ९१ मुखेड मतदारसंघाचे निवणडणुक निर्णय अधिकारीतथा उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेशजाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण, निवडणुक विभागाचे नायब तहसीलदारजोहरे, नायब तहसीलदार विलास तेलंग, नायब तहसीलदार पांडुरंग गंगनर, गट विकास अधिकारी मुखेड सी. एल.रामोड, गटविकास अधिकारी कंधार महेश पाटील, पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलीसनिरीक्षक भालचंद्र तिडके, निवडणुक विभागाचे लिपीक प्रशांत लिंबेकर, क्यादेव महाडीवाले, मंडळअधिकारी जी.एस. गरुडकर, एस.डी. कुसुमकर, तलाठी सतिश देशमुख, एन.एस. होनराव, राजु सुवर्णकार, सतिष बेदरकर, शेख गौस, बलभिम चावरे, मिडीया कक्षप्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड,. बादेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान यांच्यासह निवडणूक विभाग व पोलिस विभागातील अनेकअधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत. मुखेड विधानसभा निवडणूकी करिता ३६६ मतदान केंद्रावर एकूण २ हजार ४० अधिकारी व कर्मचारी यांचीनियुक्ती करण्यांत आली होती यात पोलीस अधिकारी १०, सीआरपी जवान १००, पोलीस कर्मचारी ३४७, होमगार्ड ३४५, उपविभागीय पोलिस अधिकारी ०१ यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदारसंघात अंपग मतदान केंद्र जि.प.हा. सावरगाव येथे तर सखी मतदान केंद्र गुरुदेव विद्या मंदीर शिवाजीनगर मुखेड, संवेदनशील मतदान केंद्र क्रमाक १६० कोळगाव येथे, युवा मतदान केंद्र जि.प.प्रा.शा. जांब (बु.), मुखेड नगर परिषद येथील हुतात्मा स्मारक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. त्याचबरोबरदि.१२ ते १३ नोव्हेंबर पर्यंत दिव्यांग व वय ८५ वर्षावरील २९६ मतदारांनी तर निवडणूक कर्तव्यावर असलेले १हजार ९९३ अधिकारी व कर्मचारी यांनी १८ नोव्हेंबर पर्यंत टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे. मुखेडविधानसभेच्या निवडणुकीत एकुन ११ उमेदवार आपले नशिब आजमावत असुन या सर्वांचे भवितव्य मतपेटीतबंद झाले आहे. २३ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे मतमोजणी होणार सर्व उमेदवार व मतदारांचे लक्ष आत्ता २३तारखेच्या मतमोजणीकडे लागले आहे.

    Read More »
  • राजकीय

    23 नोव्हेंबरला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 6 विधानसभा व लोकसभेसाठी मतमोजणी

    नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजीमतदान झाले. निवडणूक आयोगाने 21 तारखेला दुपारी जाहिर केलेल्या अंतिम आकडेवारी नुसार नांदेडजिल्ह्याने यावेळी 2019 च्या तुलनेने विक्रमी मतदान केले असून  यावेळी विधानसभेसाठी 69.45 टक्केमतदान झाले आहे. तर लोकसभा पोटनिवडणुकीतही गेल्या वेळेच्या तुलनेत 7 टक्के अधिक मतदान झालेअसून ही टक्केवारी 67.81 आहे. उद्या शनिवार 23 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्ञान स्त्रोत केंद्र ( नॉलेजरिसोर्स सेंटर ) येथे सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरविधानसभा व लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळयावर खोली क्रमांक 102 वखोली क्रमांक 6 याठिकाणी सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी होणार असून सर्व मतयंत्र याठिकाणच्यास्ट्रॉगरुमध्ये पोहोचले आहे. तसेच दुसऱ्या माळ्यावर खोली क्रमांक 202 ते 206 मध्ये लोकसभापोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणच्या स्ट्रॉगरुममध्ये मतयंत्र पोहोचली आहेत. उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये बंद झाल्या असून सीसीटीव्हीच्या निगराणीतठेवण्यात आल्या आहेत. 23 नोव्हेंबरला सकाळी उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदानयंत्र बाहेर काढले जातील व त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. याठिकाणी वेगवेगळे कक्ष करण्यातआले असून उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी देखील थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेची 14 टेबलावर मोजणी होणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी 14 गुन्हीले 6 असे 84 टेबल लोकसभा आणिविधानसभासाठी असणार आहे. अंदाजे 24 ते 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

    Read More »
  • शहर

    उद्या श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त अग्निकुंड व पालखी सोहळ्याचे आयोजन

    मुखेड/प्रतिनिधी:-  मुखेडचे ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी यात्रेस प्रांरभ  झाला असून दि. २१ रोजी पहाटे ४ वा. अग्रिकुंड होणारआहे. या वर्षी निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे कुस्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त महाराष्ट्र सह कर्नाटक, तेलंगानाराज्यातून हजारो भाविक भक्त येतात. या यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे अग्निकुंड. या अग्ग्रीकुंडातीलविस्तवावरून भाविक उघड्या पायाने चालतात. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवारी सायंकाळी श्रीवीरभद्रेश्वर भगवान मंदिरात प्रसाद गुळ (शिरणी) वाटपाचा कार्यक्रम व दि.२१ रोज गुरुवारी पहाटे अग्ग्रीकुंडव पालखी मिरवणूक कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रकाश पाटील बेळीकर यांच्याकडून कर्नाटकातीलपूर्वतांचा कार्यक्रम व अतुल देबडवार यांच्यावतीने फटाक्यांची आतिषबाजी तसेच शिवराज मुगावेयांच्यावतीने विद्युत रोषणाई, यादव गव्हाणे यांच्या वतीने दीप सजावट करण्यात येणार आहे. पौर्णिमेपासून(दि.१५ ते २१ पर्यंत) मंदिरात वीरशैव महिला व पुरुष भजनी मंडळ यांचा दुपारी २ ते ५ या वेळेत भजनाचाकार्यक्रम राहील व रात्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ बारवगल्ली मुखेड यांचा कार्यक्रम राहील. दि.२० बुधवारसायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत स्थानिक कलाकार वीरभद्र मठपती, उत्तमराव वन्नाळे, गोविंदरावकोतापल्ले, दीपक कोतापल्ले, सरिता पुरी, उमाताई कोत्तापल्ले, सुमती भालके, वसंत पाटील, दत्तात्रयनिम्मलवाड, रामदास बत्तेवाड, जयपाल मठपती, पांडुरंग बेळीकर, शेलार रोडगे, वादक संजय उमाटे, सुरेंद्रभद्रे, रविंद्र भद्रे, शिवराज उमाटे, अनुप वन्नाळे, विष्णुदास उमाटे, हरिदास उमाटे, ऋषिकेश इंगोले, बासरीवादक व्यंकटराव हंगरगे, निवेदक शंकरराव मुंडे, प्राचार्य रामकृष्ण बदने, बालाजी इंगोले यांच्या भक्तीगितांचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी पहाटे अग्नि कुंडाचा कार्यक्रम व पालखी मिरवणूक होणार आहे यासर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री वीरभद्रेश्वर भगवान ग्राम देवस्थान व समस्त गावकरी मंडळींच्यावतीने करण्यात आले आहे.

    Read More »
Back to top button