Sharmik Ekta
-
महाराष्ट्र
पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
अहिल्यानगरमध्ये 23 कोटींचे दागिने जप्त ठाणे:- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणे सोबतच पोलिसांच्या संयुक्त गस्त पथकाच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जात…
Read More » -
शहर
९१ मुखेड विधानसभा एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी ०६ जणांनी घेतली माघार
मुखेड प्रतिनिधी:- राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला याचा निकाल लागणार…
Read More » -
सामाजिक
जिल्ह्यात जमावबंदी,शस्त्रबंदी आदेश
नांदेड : नांदेड जिल्ह्यात 3 नोव्हेंबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 17 नोव्हेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी…
Read More » -
शहर
मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी २४ उमेदवारांची १७ नामनिर्देशनपत्र वैध व ७ नामनिर्देशनपत्रे अवैध
मुखेड प्रतिनिधी:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमानुसार ९१ मुखेड कंधार विधानसभा मतदार संघासाठी दि. २४ ते २९ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीतकालावधीत २४ उमेदवारांची एकूण ३५ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. पैकी छाननी मध्ये एकूण ७ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहेत. १७ उमेदवारांचे वैद्य नामनिर्देशन पत्र २८ एवढे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया ९१ – मुखेड कंधार मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक…
Read More » -
अधिक
रानडुकराच्या भ्याड हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील लोभा तांडा कोडग्याळ शेतकरी शेतात खरिप हंगामातिल मशागतिचे काम करित असताना अचानक पणे सुसाट वेगाने सुटलेल्या…
Read More » -
राजकीय
मुखेड विधानसभेसाठी २४ उमेदवारांचे ३५ नामनिर्देशन पत्र दाखल
• दि ३० ऑक्टोंबर रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाणनी ;उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीना उपस्तिथ राहण्याचे आव्हान मुखेड : प्रतिनिधी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी दि.२९ रोजी मंगळवारी १३ उमेदवारांचे १९ नामनिर्देशन पत्रप्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ९१–मुखेड –कंधार विधानसभेसाठी दि.२४ ऑक्टोंबर पासून शेवटच्या २९ ऑक्टोंबर रोजी पर्यंत एकुण १२८ फॉर्म विक्री झाले होते.यातील २४ उमेदवारांनी ३५ नामनिर्देशन पञ दाखल केले आहेत. दि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटची मुद्दत होती…
Read More » -
नऊ उमेदवारांचे अकरा नामनिर्देशन पत्र दाखल
आज अर्ज दाखल करण्याचे शेवटची मुद्दत मुखेड : प्रतिनिधी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी दि.२८ रोजी सोमवारी नऊ उमेदवारांचे ११ नामनिर्देशन पत्रप्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र भरणा करण्याच्या पाचव्या दिवशी तेरा जणांना २२नामनिर्दे शन पत्र विक्री करण्यात आले आहेत. आज तारखेपर्यंत एकूण १२६ नाम निर्देशन पत्र विक्रीकरण्यात आले आहेत. आज दि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटची मुद्दत असून ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागेघेता येणार आहेत. दि. २८ रोजी नऊ उमेदवारांचे ११ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. यामध्ये यादव बळीराम कांबळे, गोविंददादाराव डुमणे, सचिन गोवर्धन चव्हाण, श्रीहरी राजाराम बुगडेमवार, प्रदीप धर्माजी इंगोले, बालाजी नामदेवखतगावकर, तुषार गोविंदराव राठोड, रुक्मीनबाई शंकर गीते, परशुराम दत्ता कदम यांचा समावेश असल्याचेनिवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले
Read More » -
महाराष्ट्र
अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख
सकाळी 9.30 वाजेपासून कार्यालय सुरू असतील नांदेड प्रतिनिधी :- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर…
Read More » -
क्राईम
मुखेड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल
मुखेड : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यातगटविकास अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध मुखेडपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार दि. २५ रोजी सायंकाळी घडली. मुखेड पंचायत समिती कार्यालय परिसरात बचत गटाचे कार्यालयात अभियान व्यवस्थापक नंदकिशोरवसंतराव मार्गे व संतोष दाजी सोनवणे हे आचारसंहिता भंग करत बचत गटाच्या महिलांना साड्या, सन्मानपत्र लखपती योजना माहिती रजिस्टर इत्यादी साहित्य वाटप करत होते. हा प्रकार शुक्रवार दि.२५रोजी पंचायत समिती मुखेडच्या बचत गटाच्या कार्यालय आवारात सायंकाळी घडला. दोघेजण मिळूनउपरोक्त साहित्य वाटप करत असल्याचे आढळून आले. यामुळे संबंधितांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचेस्पष्ट झाले. गटविकास अधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख चंद्रशेखर रामोड यांनी दिलेल्याफिर्यादीवरून नंदकिशोर वसंतराव मार्गे व संतोष दाजी सोनवणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
Read More » -
राजकीय
मुखेड – कंधार विधानसभेची काँग्रेस पक्षाची उमेदवारी बेटमोगरेकर यांना जाहीर
मुखेड प्रतिनिधी:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाची महाविकासआघाडीत काँग्रेस ला जागा गेली यात माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना दि. २६ रोजीरात्री ११ च्या सुमारास उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडी कडून अनेक जण रिंगणात होते. यात काँग्रेसकडून माजी आमदार हणमंतराव पाटीलबेटमोगरेकर, डॉ. त्र्यंबक दापकेकर यांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत होती. यात बेटमोगरेकर यांनी शेवटच्याक्षणी बाजी मारत तिकीट आपल्या पारड्यात टाकण्यात त्यांना यश आले. माजी जिप सदस्य संतोष राठोड यांनी सुध्दा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेनेला जागासोडण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे दिसून आले. मुखेड मतदारसंघात काँग्रेस कंधार भाजप अपक्ष अशीरंगत होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे वैसे असल्याने भाजपसाठी हीलढाई सोपी नसली तरी जातीय समीकरण पाहता व विकासाच्या प्रश्नावर राजकीय लढाई झाल्यास मतदारकोणाच्या बाजूने कौल देणार हे आत्ताच सांगणे कठीण होईल असे दिसते.
Read More »