Sharmik Ekta
-
राजकीय
मुखेड – कंधार विधानसभेची काँग्रेस पक्षाची उमेदवारी बेटमोगरेकर यांना जाहीर
मुखेड प्रतिनिधी:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाची महाविकासआघाडीत काँग्रेस ला जागा गेली यात माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना दि. २६ रोजीरात्री ११ च्या सुमारास उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडी कडून अनेक जण रिंगणात होते. यात काँग्रेसकडून माजी आमदार हणमंतराव पाटीलबेटमोगरेकर, डॉ. त्र्यंबक दापकेकर यांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत होती. यात बेटमोगरेकर यांनी शेवटच्याक्षणी बाजी मारत तिकीट आपल्या पारड्यात टाकण्यात त्यांना यश आले. माजी जिप सदस्य संतोष राठोड यांनी सुध्दा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेनेला जागासोडण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे दिसून आले. मुखेड मतदारसंघात काँग्रेस कंधार भाजप अपक्ष अशीरंगत होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे वैसे असल्याने भाजपसाठी हीलढाई सोपी नसली तरी जातीय समीकरण पाहता व विकासाच्या प्रश्नावर राजकीय लढाई झाल्यास मतदारकोणाच्या बाजूने कौल देणार हे आत्ताच सांगणे कठीण होईल असे दिसते.
Read More » -
महाराष्ट्र
शेतीसाठी विहीर खोदताय, मग असं मिळवा 4 लाख रुपये अनुदान
पुणे:- अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांना विहीर खोदाईसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात दीड लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे…
Read More » -
Uncategorized
मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथे भूकंपाचे हादरे; भूगर्भातून दोन मोठे आवाज होवून अनेकांची घरे हादरली
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु. येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते पावणे तिनच्या दरम्यानभूगर्भातुन एक मोठा आवाज येऊन अनेकांची घरे हादरत भूकंपाचा धक्का बसल्याने आंबुलगा व परिसरातभितीचे वातावरण पसरले आहे. आंबुलगा येथे भूगर्भात झालेल्या मोठ्या आवाजाने घरे हादरत असल्याचेलक्षात येताच हे भूकंप आहे असे म्हणत गावकरी घरातून बाहेर येत एकच गलका केला. आंबुलगा येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १४.४३ वाजता व १५.१३ वाजता दोनवेळा भूगर्भातून आवाज येऊनसौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रानी नोंद केल्याचे सांगण्यात येतआहे. या भूकंपसदृश्य हादऱ्याची तीव्रता रिष्टर स्केलवर अनुक्रमे १.५ व ०.७ अशी नोंदविण्यात आलेलीआहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून १२ किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला असून या धक्क्यामुळे कुठलीहीजिवीत व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र जिल्हाधिकारीकार्यालय नांदेड यांनी दिली आहे. मात्र या भूकंपाच्या हादऱ्यामुळे आंबुलगा सह परिसरात भितीचे वातावरणपसरले आहे.
Read More » -
Uncategorized
उद्या पासुन मुखेड-शिर्डी लालपरी धावणार
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड ते शिर्डी आणि शिर्डी ते मुखेड राज्य परिवहन महामंडळाची लालपरी सुरू होणार असून प्रवाशांनी याबससेवेचा फायदा घेण्याचे आवाहन मुखेड आगार प्रमुख सुभाष पवार तथा बस स्थानक प्रमुख मिलिंदकुमारसोनाळे यांनी केले आहे. मुखेड येथून लोहा–पालम– गंगाखेडपर्यंत जाण्यासाठी मुखेड येथून धर्माबाद आगाराची दररोज एकच गाडीआहे. प्रवाशांना थेट लोहा किंवा पुढे जाण्याचे असेल तर दुपारी ३:३० वाजेपर्यंत वाटबघत बसावे लागत होते. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आगार प्रमुख सुभाष पवार यांनी वरिष्ठांच्या परवानगीनेमुखेड–कंधार–गंगाखेड– परळी माजलगाव–गेवराई–शेवगावमार्गे शिर्डी बस चालू करण्याचा निर्णय घेतलाआहे. सदरील गाडी शनिवारपासून मुखेड येथून सकाळी ९ वाजता व शिर्डी येथून सकाळी ९ वाजता नियमित बससुटणार आहे. सदरील बसमुळे ऐन दिवाळी सणाच्या निमित्त येणाऱ्या व जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांची मोठीसोय होणार आहे. मुखेड आगार प्रमुखांनी मुखेड ते शिर्डी आणि परत शिर्डी ते मुखेड नियमित बस सेवा सुरू करण्याचा निर्णयघेतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार हे मात्र निश्चित आहे. तसेच मुखेड आगाराची मुखेड–नांदेड–जिंतूरजाणारी गाडी नियमित आहे. प्रवाशांना मुखेड ते नांदेड व नांदेड ते पुढे जिंतूर जाण्यासाठी गाड्या उपलब्धआहेत. त्यामुळे मुदखेड जिंतूर जाणारी बस ही नांदेड ऐवजी लोहा गंगाखेडमार्गे चालू करण्यात यावी, अशी प्रवासीवर्गातून मागणी होत आहे.
Read More » -
राजकीय
काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ही आहेत 48 उमेदवारांची नावे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखेर काँग्रेसने आपली 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून अनेक दिग्गज…
Read More » -
सलगरा पोस्टवर १५ लाखांची विदेशी तर ३ लाखांची देशी दारुसह दोन वाहने केली जप्त
मुखेड प्रतिनिधी:- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोकड रक्कम,अवैध दारू,नेण्यावर निर्बंध आहेत. निर्बंध असताना देखील मुखेड तालुक्यातील सलगरा या ठिकाणी आचारसंहिता पथकाने दारुची वाहतूककरणारे दोन वाहने पकडले असून त्यात असलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाईबुधवारी दुपारी करण्यात आली. एम.एच.२६–सीएच. ०८२४ या क्रमांकाचे वाहन सलगरा चेक पोस्टवरुन जात असताना पथकाने अडविले. यावाहनात रॉलय स्टॅग, इम्पेरियल ब्ल्यू यासह इतर कंपन्यांची १५ लाखांची विदेशी दारु होती. चालकाकडेमालाच्या बिलाची व दारु बंदी अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीच्या पत्राची विचारणा केली असता बील दाखविण्यातआले. त्यानंतर दारुचे हे वाहन जप्त करण्यात आले. तर दुपारी ५ वाजेच्या सुमारास एम.एच.२६–एडी. ७६६३या वाहनाची तपासणी केली असता त्यात ३ लाख रुपयांची देशी दारु आढळून आली. चालकाकडेकागदपत्रांची मागणी केली असता चूकीची कागदपत्रे दाखविण्यात आली. त्यामुळे दारुचे हे वाहनही जप्तकरण्यात आले असून मुखेड पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे. नोडल ऑफिसर संजीव सुरवसे, एम.एम. लष्करे, बी.पी. सूर्यकार, एन.एस. दोसलवार, डी. के. मोरे, आकाशकुंटूरवार यांनीही कारवाई केली. दरम्यान आचारसंहितेमुळे जिल्ह्याच्या सीमा भागात तपासणी नाकेउभारण्यात आले असून या ठिकाणी वाहनांची तपासणी होत आहे
Read More » -
शहर
मुखेड मतदारसंघात काल आणि आज ४७ अर्जाची विक्री
उमेदवारी दाखल करण्यासाठी अनेकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त निश्चित केला आहे. तर काही जणांनीत्यापूर्वीचा शुभमुहूर्त शोधण्यासाठी ज्योतिषांकडे धाव घेतली आहे मुखेड प्रतिनिधी:- मुखेड–कंधार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २२ ऑक्टोबर मंगळवारपासून प्रक्रिया सुरु झाली. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर नामनिर्देश पत्र दाखल करण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या १५व्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी विविध पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जबरदस्त चुरसदिसून येत आहे.दि.२२ रोजी मंगळवारी पहिल्या दिवशी गोविंद दादाराव डुमणे, गोपनर, शिवशंकरनागोराव,बालाजी नामदेवराव खतगावकर, पवन विरभद्र कॅदरकुंटे,रावसाहेब दिगंबरराव पाटील ५ लोकांनी ९ अर्जाची विक्री तर आज दि २३ रोजी लक्ष्मण बालाजी तेलंग, सचिन विठ्ठलराव गायकवाड, अनिल अंतेश्वरबनसोडे, परशुराम दत्ता कदम, सचिन गोवर्धन चव्हाण, हनुमंत राव अंगद मामीलवाड, नेवलेकर हनुमंतगंगाधर, गोविंद राठोड नागोराव, जितेंद्र दशरथ वाघमारे, प्रकाश चांदोबा गवलवाड, अहिल्याबाई हनुमंतमामीलवाड, अनिल अंतेश्वर बनसोडे, अनिल तेजराव शिरसे, खंडेराव हैबत्ती हसनाळकर, यादव बळीरामकांबळे, सोमवारे लक्ष्मण माधवराव,मारोती जाधव असे १७ लोकांनी ३८ अर्जाची विक्री केली आहे. मात्रएकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याची माहिती माहिती निवडणूक विभागातून प्राप्त झाली आहे. दि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून निवडणूक लढवू इच्छुकांकडूननिवडणुकांसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे आपल्या उमेदवारीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन कसा दाखल करावयाचा याबाबत माहितीघेण्यासाठी धावपळ सुरू झालीय. दि.२२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत शासकीयसुट्या वगळून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरुझाली आहे. दि. २२ रोजी एकूण ९ तर दि २३ रोजी ३८ उमेदवारी अर्ज विकल्या गेले. मात्र एकानेही बुधवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. तर काही उमेदवारांनी मात्र ज्योतिषाकडून मुहूर्तही काढून ठेवले आहेत विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आदर्शआचारसंहितेचे पालन केले जात आहे. कुठल्या राजकीय पक्षांकडून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघात निवडणुकीचे चित्र काय असणार हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे.
Read More » -
विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेची सुरुवात
* सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार * नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर नांदेड :…
Read More » -
शहर
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; हदगाव तालुक्यात केंद्रबिंदू
नांदेड : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 06:52 मिनिटांनी भूकंपाचे…
Read More » -
शैक्षणिक
नजीर शेख युजीसी नेट उत्तीर्ण
नांदेड/प्रतिनिधी:- सामाजिक कार्यकर्ते व लेखक शेख नजीर यांनी युजीसी नेट परीक्षा पास केली. यापुर्वीच महाराष्ट्र सेट पासकेले. त्यांनी सेट व नेट इतिहासात पास केले. श्री शेख हे देळूब बु. गावचे असून आई–वडील नसल्याने कष्टकरीत शिक्षण घेतले. अथक परिश्रमामातून यश संपादन केले. आई नंतर मोठी बहिणीने त्यांचे पालन पोषण केले. मावशीच्या घरी राहून ते शिकत होते. शेख यांचेप्राथमिक शिक्षण देळूब गावी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण राजाबाई हायस्कूल पार्डी येथे झाले. बी.ए. अर्धापूर तर एम. ए. नांदेड शहरात झाले. सातवी ते बारावी शिक्षणासाठी चार किलोमीटर पायी तरबी.ए. साठी दहा किलोमीटर सायकलीवर जाऊन शिक्षण घेतले. वडिलांचे छत्र बालपणी हरवले व काहीवर्षांतच आई गेली. पुढे ते नांदेडला मावशी व बहिणीच्या घरी राहून अभ्यास करू लागले. लहानपणी आईसोबत ते शेतात मजुरीला जात पुढे शेळी पालन करत शिक्षणही घेतले. सेट नेट दोन्ही पास झाल्यानेमहाराष्ट्रातील थोरामोठ्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या यशात बहिण, मावशी, गुरूजनात प्रा. साईनाथ, जगदीश कदम, अल्ताफ हुसेन, मित्र लक्ष्मण कदम, फारूख अहमद आदींचे मार्गदर्शन व योगदान आहे.
Read More »