Sharmik Ekta
-
Uncategorized
मुखेड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेताब शेख तर सचिवपदी राजेश बंडे.
मुखेड / प्रतिनिधी. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्णिंत मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार…
Read More » -
क्राईम
मुखेड तालुक्यातील हरिश्चंद्र तांड्याजवळ एका इसमाचा खून
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील दगडे शिरूर शिवारातील हरिचंद्र तांडाजवळ वन विभागाच्या जागेतील एक दरीत शहरातील फुलेनगर येथे राहणाऱ्या अशोक ईश्वर…
Read More » -
देश-विदेश
रतन टाटा राहिले नाहीत वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन, देशावर शोककळा!
भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडीरुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचीप्रकृती अस्वस्थ होती. प्रत्यक्षात बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी आली. काही तासांनी त्यांनी जगाचानिरोप घेतल्याची बातमी आली. रतन टाटा यांचे जाणे देशाचे मोठे नुकसान आहे. मात्र, देश त्यांना कधीहीविसरणार नाही. त्यांनी देशासाठी अनेक महान गोष्टी केल्या. टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांची सर्वात मोठी भूमिका होती. त्यांनी देशासाठी आणिसर्वसामान्यांसाठी अशी अनेक कामे केली, ज्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. रतन टाटा हे एक उदारव्यक्ती होते आणि संकटाच्या वेळी देशाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असायचे. मी तुम्हाला दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की मी पूर्णपणे ठीक आहे. याआधी सोमवारीही रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती, त्यानंतर काही तासांनी खुद्दरतन टाटा यांच्या X (ट्विटर) हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिले होतेकी माझी काळजी केल्याबद्दल सर्वांचे आभार! मी एकदम ठीक आहे. काळजी करण्याची गरज नाही, मीवयाशी संबंधित आजारांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलो आहे. पण यावेळी तोहॉस्पिटलमधून परत येऊ शकला नाही, आणि कायमचा शेवटच्या प्रवासाला निघाल्याचे दुःख देशालावाटेल. रतन टाटा यांच्या निधनाने श्रमिक एकता न्यूज परिवार आपल्या दुःखात शामिल आहे
Read More » -
राजकीय
मासच्या आढावा बैठकीत नुतन पदाधिका-यांच्या निवडी जाहीर.
संघटन मजबुतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे -हणमंते. मुखेड / प्रतिनिधी. मातंग अस्मिता संघर्ष सेना या सामाजिक संघटनेची दि.०६ आँक्टोबंर रोजी…
Read More » -
राजकीय
५०० रुपयेचा मुद्रांक शुल्क रद्द करून १०० चा मुद्रांक शुल्क कायम ठेवावा
तहसीलदारांकडे शेतकरी कामगार पक्षाची निवेदनाद्वारे मागणी मुखेड प्रतिनिधी:- मंत्रिमंडळाने १०० रुपयेचा मुद्रांक शुल्क (बाँड) रद्द करू ५०० रुपयाचा मुद्रांक शुल्क करण्याचा निर्णयसरकारने घेतलेला आहे तो निर्णय रद्द करून १०० रुपयाचा मुद्रांक शुल्क (बॉण्ड) नियमित ठेवावा अशीमागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. शेतकरीआधीच आर्थिक दृष्ट्या संकटातअसताना सरकारच्या या निर्णयामुळे अजून तो आर्थिक दृष्ट्या खचलाजाईल म्हणून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना शेतकरी कामगार पक्षातर्फ निवेदन देण्यात आले. यावेळीशेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. गोविंद डुमणे, अॅड. रामकृष्ण जाधव, अॅड. शंकर बादावाड हजर होते
Read More » -
Uncategorized
मुखेड पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड तर कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे यांची निवड
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न मुखेड मराठी पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारणी ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख यांच्या…
Read More » -
Uncategorized
मुलींनी सजग व सुदृढ राहणे आजची गरज-डॉ.सौ.रचिता कौरवार.
मुखेड / प्रतिनिधी. मुलींनी आपल्या मनात कोणत्याही गोष्टी न ठेवता त्या आपल्या आई,वडील व भावाकडे व्यक्त केल्या पाहिजेत,सेफ सर्कल ओळखता…
Read More » -
शैक्षणिक
सौ.कमल घोडके (मेनकुदळे) यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.
प्रतिनिधी प्रतिनिधी:- केंद्रीय प्रा.शा. मुखेड केंद्रातील जि.प.प्रा.शाळा शिकारा येथील सह.शिक्षीका सौ.कमल गंगाराम घोडके(मेनकुदळे) हे नियतवयोमानाने नुकतेच सेवानिवृत्त झाले.शिकारा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंचरसिकाबाई बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मुखेडचे गटशिक्षणाधिकारी मा. कैलासहोणधरणे शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कदम, प्रमुख अतिथी डॉ.शिवाजी कराळे शिक्षणविस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, दिलीप देवकांबळे, दिनबंधु बनसोडे, उपसरपंच शितलकुमारइमडे,मुख्याध्यापक श्रीपत राठोड व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकताच सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्नझाला.सौ.कमल घोडके(मेनकुदळे)यांचा सहपतीक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी बालासाहेब कदम यांनी सत्कार मुर्तीच्या कार्याचा गौरव पुर्ण उल्लेख आपल्या मनोगतातूनकेला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थीनी आपल्या आवडत्या शिक्षीका विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्वराज साधू तर आभार नारायण ग्यादलवाड यांनी मानले.कार्यक्रमाच्यायशस्वीतेसाठी केंद्र संकुलातील व जि.प.प्रा.शिकारा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रमघेतले.
Read More » -
सामाजिक
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन
नांदेड प्रतिनिधी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार, पंचायत समिती सभागृह मुखेड येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात…
Read More » -
राजकीय
काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, ज्येष्ठ नेत्यांवर जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेण्याचीजबाबदारी !
मुंबई: विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणूनकाँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दि. 1 ऑक्टोबरपासूनघेतल्या जाणार आहेत ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली असून हे नेते आपल्याला नेमून दिलेल्याजिल्ह्यात जाऊन मुलाखती घेऊन आपला अहवाल देणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. यालाप्रचंड प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस पक्षाकडे एकूण 1688 इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यामान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुणे शहर व पुणे ग्रामीण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण, खा. चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे ठाणेजिल्हा, खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे सांगली व सातारा जिल्हा, मुजफ्फर हुसेन यांच्याकडे अहमदनगर आ. कुणाल पाटील यांच्याकडे नाशिक, माजी मंत्री विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडेमुंबई शहर, अमित देशमुख यांच्याकडे सोलापूर व कोल्हापूर, डॉ. नितीन राऊत यांच्याकडे वर्धा व यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्याकडे परभणी व हिंगोली, डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेड, प्रा. वसंत पुरकेयांच्याकडे अकोला, खा. नामदेव किरसान यांच्याकडे वाशीम, खा. डॉ. कल्याण काळे यांच्याकडे लातूर वबीड, खा. डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे जालना, आ. संग्राम थोपटे यांच्याकडे मुंबई उपनगर, डॉ. वजाहतमिर्झा यांच्याकडे संभाजीनगर, एम.एम. शेख यांच्याकडे धाराशिव, हुसेन दलवाई यांच्याकडे पालघर, शिवाजीराव मोघे यांच्याकडे धुळे व नंदुरबार, सुरेश शेट्टी यांच्याकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड, आ. अभिजीत वंजारी चंदपुर व गडचिरोली, सतीश चतुर्वेदी भंडारा व गोंदिया, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासननाना गावंडे यांच्याकडे बुलढाणा व अमरावती, ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते दिनांक 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन इच्छुक उमेदवारांच्यामुलाखती घेतील व 10 ऑक्टोबर पर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करतील, अशीमाहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
Read More »